#या_जीवनाच_काय_करु_? | वैचारिक ।। Khas Marathi


PART- 1


माझ्या युवा मित्रांनो,

तुमचा जन्म 1990 च्या आसपास झाला. त्याच वेळी GLOBALIZATION आलं. भारतात उदारीकरण झालं. तुमच्यासोबत सोबतच हे नवं परिवर्तन वाढलं. आज त्याचे अनेक चांगले परिणामही दिसत आहेत . पूर्वी महाराष्ट्रातल्या तरूणांना भाकरी आणि नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती . एकदा B.A. , B. COM , झालं की कुठे तरी शिक्षक होणं, बँकेत किँवा पोस्टात क्लार्क होणं आणि रिटायर झाल्यावर पुण्यात 2 खोल्यांचा फ्लँट घेणं, पेन्शन घेणं अन पर्वतीला चकरा मारता मारता एक दिवस मरुन जाणं महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाच हे स्वप्न होतं.

० आज तुम्हाला माधुकरी मागावी लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन , असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. तुमच्या खिशात मोबाईल आहे, कानात हेडफोन आहे अन तुमच्या हातात लँपटाँप आहे. जगात कुठेही जाण्याचा तुमच्यात आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास तुम्हालाच नाही, तर 12000 Km पार करुन अमेरिकेपर्यँत तुमचा दरारा पसरला आहे. थाँमस फ्रीडमनने लिहिलं आहे , ''आज अमेरिकेतील आई वडिलांना आपल्या मुलांना सांगावं लागतं . . . . . .अरे, मुलांनो अभ्यास करा, नाही तर भारतातली मुलं तुमचे जाँब्ज घेऊन जातील. "

जागतिक सुपरपाँवर तुम्हाला घाबरते, एवढा बदल गेल्या 20 वर्षात झाला आहे. ही महाराष्ट्रातली भारतातली नवी सुपरपाँवर कशी जगते आहे ?

To be continued . . . . .


#या_जीवनाच_काय_करु?


PART-2


INDIAN EXPRESS च्या 1ल्याच पानावर त्रिवेँद्रमची 1 ठळक बातमी आली होती. Sujit कुट्टन नावाचा एक तरुण मुलगा व त्याची आई या दोघांचा हसरा फोटो अन बातमीची हेडलाईन -

"Kept in dark about his fathers death , He रेसेस टू विन."

त्रिवेँद्रममध्ये प्रांतपातळीच्या शर्यती आयोजित केल्या आहेत . सुजित हा धावपटू आहे. तो जिँकण्यासाठी तयार करतोय त्याचे वडील हार्ट अँटकने हाँस्पिटलममध्ये भरती केले गेले आहेत. शर्यतीदरम्यान मन विचलित होऊ नये म्हणून त्यांच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली नाही. तो रेसमध्ये धावला आणि त्याने रेस जिँकली. विजयी सुजित कुट्टनचा हसरा चेहरा पाहिला आणि मला प्रश्न पडला- SUJIT कुट्टनचे वडील ICU मध्ये जेव्हा एकटे मरत असतील तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? सुजीतने कुठं असायला हवं होतं ? तो कशासाठी धावत होता? ते पदक जिँकून त्याने काय मिळवलं . ?

आपण सगळेच सुजित कुट्टन आहोत. आपलं काही तरी मरतयं आणि आपण मात्र रेस धावतो आहोत.

#कशासाठी?

To be continued . . . .


PART - 3


" राजू को कितने मिले ? "


आपलं जीवन कसं झालं आहे? मूल जन्माला येतं. दोन तीन वर्षाँच नाही झालं, तर चांगल्या केजीमध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरु होते. तिथे निवडप्रकिया आहे. लहान मूल पुरेसं हुशार आहे की नाही याची खात्री करायला मुलाची परीक्षा होते. चांगल्या रीतीने त्याने परीक्षा द्यावी , म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने त्यांच्या 2 वर्षाँच्या मुलाला ट्युशन लावली. इथून स्पर्धा सुरु होते. चांगली शाळा, चांगले मार्क , चांगली नोकरी . . . .T.V. वर एक जाहिरात पाहिली.

मुलगा धावत घरी येतो. म्हणतो, '' आई, आई, आज परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळाले!"

ती म्हणते, "लेकिन राजू को कितने मिले ?"

त्या आईला मुलाच्या आनंदाचा मागमूसही नाही.
'या स्पर्धेत तू कितवा आहेस ?' एवढाच तिचा प्रश्न . आज ही स्पर्धा आपल्या मागे कायमची लागली आहे.

०जी मित्राला देखील शत्रू म्हणून बघते, तिला स्पर्धा असे म्हणतात. जी 'मलाच सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे' असं म्हणते , तिला स्पर्धा असे म्हणतात. आपल जन्मापासून मृत्यूपर्यँतच जगण स्पर्धामय झालंय. पुढे चांगली नोकरी पाहिजे, चांगला पगार व प्रमोशन मिळाल पाहिजे. चांगला पगार मिळाला की चांगल 2 मजली घर मिळालं पाहिजे. यश मिळाल की एक बायकोदेखील हवी. एक चांगली बायको किँवा चांगला नवरादेखील कमवावा लागतो. तेदेखील एक पझेशन. हे करता आलं की, एखादी फाँरेन टूर करावी वाटते. काँम्पिटिशन / कन्झमशन हेच जर सगळ जीवन असेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ उरला?
अस झालं, तर जीवन एक सजा ठरेल.

To be continued . . . . .

PART- 4


पुढची 40 वर्ष तुमची आहेत.
आयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की आजच हे जग मला मान्य नाही.

JASHA JAGAT ME JANMALA ALO,
TASHA JAGAT ME MARNAR NAHI.

हे जग मी बदलून जाईन.
माझं आयुष्य खूप अमूल्य आहे.

पैशांसाठी मी माझ आयुष्य विकणार नाही,
मी भोगला जाणार नाही.

मी जेव्हा विकायला तयार होतो, तेव्हा मी भोगला जातो.

मी माझ्या जीवनाला एक हेतू, 1 प्रयोजन प्रदान करेन.
जिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन .
जिथे गरज नाही तिथे गर्दी करुन मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने