Don't Put All Your Eggs In One Basket | Warren Buffet || वैचारिक || Marathi


" Don't put all your eggs in one basket


        वाक्य तसं पाहिलं तर फार छोटं आहे पण जेव्हा जगातील सर्वात Best Investor हे वाक्य बोलतो तेव्हा त्याला विशेष अर्थ प्राप्त होतो ! 

      तुम्ही एखाद्या कंपनीत 8 तास काम करणारे एखादे सामान्य व्यक्ती असाल...अथवा त्याच कंपनीचे मालक...एखादी गृहिणी असाल....अथवा विद्यार्थी अन्यथा स्वतःच एखादे Investor .... अथवा मग अजून कोणीही असाल तरी वरील वाक्य तुम्हाला खूप काही नक्की शिकवून जाईल !! 

    ज्याप्रमाणे कधी कधी संपूर्ण समुद्रापेक्षा एक ग्लास पाणी तुमची पूर्ण तहान भागवतं तसच काहीसं या वाक्यात खोलवर दडलेलं आहे !!

Don't Put All Your Eggs In One Basket | Warren Buffet |
Don't Put All Your Eggs In One Basket | Warren Buffet |

     सरळ सोप्या मराठीतच सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं आहे "तुमची सर्व अंडी एकाच बास्केट मध्ये ठेऊ नका!"  
       आता तुमच्या पैकी प्रत्येकाची  अंडी वेगळी असतील आणि बास्केट देखील.... उदा. तुम्ही जर एखादे investor असाल तर तुम्ही जेवढा पैसा गुंतवणार आहात 'तो पैसा' म्हणजे तूमची 'अंडी' आणि जर ती तुम्ही एखादयाच कंपनीच्या Shares मध्ये गुंतवणार असाल तर ते 'shares' म्हणजे तुमचे 'बास्केट'. 
        
    काही जणांना वाटेल Investors च्या बाबतीत हे लागू पडेल पण सर्वांना हा नियम कसा लागू होईल? तर बघा... तुम्ही योग्य प्रकारे विचार केलात तर हा नियम सगळीकडे लागू असलेला दिसेल! 

       तुम्ही Engineering चे विद्यार्थी असाल आणि 4 वर्ष फक्त Engineering च्या Exams, Practicals, Assignments , Submissions यातच घालवणार असाल तर तुम्ही तुमची सर्व अंडी एकाच बास्केट मध्ये गुंतवत आहात.... पण बघा  आज Engineering च्या क्षेत्रात सर्वात जास्त बेरोजगारी आहे....ज्यांनी 4 वर्ष आपली अंडी ...आपली मेहनत Engineering च्या बास्केट मध्ये गुंतवली ते एकतर त्या क्षेत्रात ते जिथे कुठे असतील ते त्या क्षेत्राच्या Rate नुसारच जगत असतील! 

    एखाद्या general जॉब वर असतील तर तितकीच payment मिळवत असतील! 

    मात्र, ज्यांनी ज्यांनी Engineering करताना फावल्या वेळात short Film making, स्पर्धा परीक्षा  अशा त्या क्षेत्राला सोडून असो अथवा Artificial Intelligence , Machine Learning ... अशा त्या क्षेत्राला निगडीत असलेल्या 'बास्केट' मध्ये आपली 4 वर्ष गुंतवली असतील त्या job सोबतच त्यांच्या त्या त्या क्षेत्रात फक्त पैसाच नव्हे तर प्रगती नावलौकिक समृद्धता कमावत असणारच!! 


     इंजिनीरिंग चे विद्यार्थी हा नेहमीच चर्चेचाच नव्हे तर प्रत्येकाच्या जिवाभावाचा विषय असतो म्हणून ते उदाहरण इथे दिलं आहे , मात्र प्रत्येक जणांच्या आयुष्यात अशीच काही अंडी असतात आणि अशीच वेगवेगळी बास्केट सुद्धा.... 

    आपलं आयुष्य आपला वेळ ही देखील आपली अंडी च आहेत ही अंडी संपूर्ण आयुष्य एकाच बास्केट मध्ये गुंतवून ठेवायची की मग प्रत्येक नवनवीन ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकत हसत खेळत प्रत्येक बास्केट मध्ये एक एक करत जगायची ते तुम्हीच ठरवा!

मी तर कधीपण हेच मान्य करेन , 
"Don't put all your eggs in one basket" 

Warren Buffet यांच्या special 7 Quotes आणि त्यांच्याविषयी अधिक सविस्तर पणे जाणून घ्यायचं असेल तर खालील link ला नक्की Visit द्या :- 

#Famistan :- Warren Buffet Most Successful Investor

सोबतच हा लेख तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं मत देखील बिनधास्तपणे Comment करायला विसरू नका :) 


~S.J


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने