महाराष्ट्र शासन माझी कन्या भाग्यश्री योजना 2019 | Sarkari yojana || Khas Marathi 


माझी कन्या भाग्यश्री योजना 2019 ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. ही सरकारी योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट्य म्हणजे गर्भपात थांबविणे व मुलींमध्ये शिक्षणाचा दर वाढवणे होय.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र गर्भपात प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करेल.  या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील मुलींना मदत दिली जाईल. मुलींना उच्च पातळीचे शिक्षण, व इतर मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी सरकार या योजने अंतर्गत कार्यरत आहे.

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्यातील मुली आर्थिकदृष्ट्या बळकट व त्यांचे भविष्य उज्वल व स्वावलंबी होण्यास मदत होईल. 1 जानेवारी 2014 नंतर जमलेल्या सर्व मुलींना या योजनेचा फायदा घेता येईल. राज्यात सध्या मुलींचे प्रमाण 1000 मुलांपैकी 894 केवळ आहे. मुलींचा जनमदार वाढवणे, मुलगी ओझे नसून लक्ष्मी आहे हा संदेश समाजात पोहोचवणे हे माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट आहे.

योजना दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या परिवारासाठी असून, महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांच्या पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता करण्यात आलेल्या तरतुदी.

अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असणे आवश्यक.
पूर्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक होते.
परंतु आता ही मर्यादा वाढवून 7.5 लाख एवढी करण्यात आली आहे.


योजनेअंतर्गत मिळणारा लाभ खालीलप्रमाणे.

महिला मुलीच्या जन्मानंतर आपण नसबंदी केली तर, या योजनेनुसार सरकारतर्फे तुम्हाला 50000 रुपयांची मदत दिली जाईल.
दोन मुली जन्माला आल्यावर नसबंदी केली तर, सरकार तर्फे दोन्ही मुलींना 25-25 हजार रुपयांची मदत दिली जाईल.
कुटुंबातील पहिल्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार असून योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मुलगी 18 व्या वर्षानंतर देखील अविवाहित असेल व तिची 10वी पूर्ण झालेली असेल तर व्याजासह संपूर्ण रक्कम दोन हप्त्यांमध्ये मुलींना दिली जाईल.
या योजनेंतर्गत या योजनेचा लाभ मिळणार्‍या मुलीच्या आईचे संयुक्त खाते राष्ट्रीयकृत बँकेत असले पाहिजे. तसेच जोधा अंतर्गत त्यांना अपघात विमा म्हणून 100000 रुपये तसेच ओव्हर ड्राफ्टसाठी 5000 रुपयांची मदत सरकारतर्फे मिळेल.


माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म 

या योजनेचा ऍप्लिकेशन फॉर्म व सर्व मार्गदर् तुम्हाला एकाच pdf मध्ये मिळून जाईल, ते डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा - Download Form

फॉर्म डाऊनलोड झाल्यावर त्याची प्रिंट काढून भरलेला फॉर्म नजीकच्या अंगणवाडी सेविका कडे सादर करावा. 

मुलींचा जन्म दर वाढविणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेणे या योजनेचे उद्दीष्ट असल्यामुळे नक्कीच या योजनेचा लाभ घ्या व इतरांपर्यंत ही होऊन पोहोचवा.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने