नवीन मोबाइल घेताय मग या ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात | Technology || Khas marathi
नवीन मोबाइल घेताय मग या ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात | तंत्रज्ञान || Khasmarathi |
आज या २१ व्या शतकात राजीव गांधी यांनी केलेले भाकीत सत्य होतंय असं म्हणण्या पेक्षा सत्य झालय असं म्हणणं योग्य असेल . ते म्हणाले होते कि , भारतातील प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याचा स्वतःचा मोबाइल फोन असेल. आज ज्याच्याकडे मोबाइलल फोन नसेल अशी एकही व्यक्ती नसेल, मोबाइल फोनच्या जाळ्यामुळे शहर शहरांना तसेच खेडी शहरांना जोडली गेली आणि त्यामुळेच औद्योगिक विकालासाला चालना मिळाली. माणसांना सुख सुविधा कमी वेळेत मिळू लागल्या .अर्थातच काय माणसाचे जीवन सोपे करून टाकले.
नवीन मोबाइल घेताना तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा आयटी विभागाशी संबंधित व्यक्तीला विचारत असालच पण त्यांनी दिलेला सल्ला नेहमी फायदेशीर असेलच असे नाही त्यामुळे काही टेकनॉलॉजी संदर्भातील गोष्टी जाणून घेणं खूप मह्त्वाच आहे. काही वेळेस असं घडत कि लोक महागडे मोबाईल्स विकत घेतात पण ते फायदेशीर ठरत नाहीत मग पश्चाताप करत बसतात, जे लोक स्मार्ट असतात त्यांना नक्की माहित असत कि कोणत्या किमतीतील कोणता मोबाइल घेणं योग्य आहे जो मोबाइल कमी पैशात जास्त वैशिष्ट्ये (फिचर्स ) देईल.
सर्व प्रथम तुम्ही तुमचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते पाहिले पाहिजे . उदाहरणार्थ तुम्ही मोबाइलचा वापर कोणत्या गोष्टीसाठी सर्वात जास्त फोटोग्राफी,गाणी ऐकण्यासाठी ,सोसिअल एप्प्स वापरणेसाठी किंवा गेम खेळण्यासाठी करता . हे एकदा का निश्चित केले कि तुम्हाला समजेल कि कोणत्या विभागातील मोबाइल तुम्हाला घ्यायचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि तुम्ही जो मोबाईल घेणार आहेत तो तुम्हाला १. ५ वर्ष किंवा २ वर्ष वापरायचा आहे कारण मोबाइल कंपन्या इतक्या घाईने आपले नवीन फीचर्स लाँच करतात कि एक - दोन वर्षात तुम्हाला तुमचा मोबाइल बदलावाच लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल कि असं का ? तर उत्तर असेल तुमच्या मोबाइल ची सिस्टिम(हार्डवेअर) नवीन फीचर्स(सॉफ्टवेअर) वापरण्यासाठी सक्षम नसतात.
पुढील गोष्टी तुम्ही मोबाईल घेताना जरूर पाहिल्या पाहिजेत :
१) मोबाइल स्क्रीन ची साइझ :
नवीन मोबाइल घेताय मग या ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात | तंत्रज्ञान | Khasmarathi |
आजकाल बाजारात ३.५ इंच , ४ इंच , ४.७ इंच,५.१ इंच,५.५ इंच,५.७ इंच स्क्रीन साईज चे मोबाइल तसेच टॅबलेट फोन्स (१० इंच) उपलब्ध आहेत .आता हे तुमच्यावर अवलंबून आहे कि तुम्हाला कोणती स्क्रीन साईज आवश्यक आहे , जस कि तुम्ही सोसिअल मीडिया जास्त वापरता तर तुमच्यासाठी एक तर टॅबलेट फोन अथवा ५.५ इंच ते ५.७ इंच चा मोबाइल घेणे जरुरीचे असेल , तुम्ही गाणी जास्त ऐकत असाल तर ४ ते ४.७ इंच चा मोबाईल व तसेच तुम्ही खूप प्रवास करत असाल तर नेहमी लहान ते माध्यम साईज चे मोबाइल घेणे उत्तम असेल जेणे करून तुमच्या खिशात मोबाइल सहजरित्या सामावला पाहिजे. सरासरी ५.५ इंच चे मोबाइल घेणे लोक जास्त पसंद करतात.
२) रॅम (RAM) आणि प्रोसेसर :
आता हे रॅम आणि प्रोसेसर म्हणजे मोबाइलचे हृदयच समजल पाहिजे. मोबाइल घेताना या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. रॅम चा अर्थ असा होतो कि (Random Access Memory) तुमच्या मोबाइलमध्ये जे काही अँप्स आहेत ते सहजरित्या चालायचे (Run) असेल तर व तुम्ही मल्टिटास्किंग (एका पेक्षा जास्त एप्स एका वेळी वापरणे) करत असाल तर तुम्हाला जास्त रॅम असलेला मोबाइल घ्यायला हवा. बाजारात सध्या २gb ,३gb ,४gb तसेच ६ & ८gb मोबाईल उपलब्ध आहेत. मोबाइल चे वेग (स्पीड) हे प्रोसेसर वर अवलंबून असते .प्रोसेसर जितका चांगला आणि नवीन असेल तर तुमचा मोबाइल स्मूथ आणि वेगाने काम करेल. आज बाजारात नवीन स्नॅपड्रॅगोण(snapdragon) ८३५, ८२१,८२०,८०५ संस्करण(Versions) उपलब्ध आहेत तसेच मीडिया टेक(Mediatech) चे संस्करण उपलब्ध आहेत. आता अगदी नवीन व वरचे (High level) रॅम आणि प्रोसेसर त्या व्यक्तीनी घेतले पाहिजे जे मोबाईल चा जास्त वापर करतात जस कि गेम खेळण्यासाठी , फोटोग्राफी ,सोसिअली वापरतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि रॅम व प्रोसेसर एका वर्ष जुना नसावा.
३) कॅमेरा :
मोबाइल घेताना सर्व प्रथम पाहिली जाते ती गोष्ट म्हणजे कॅमेरा. मोबाईल कॅमेराच्या बाबतीत एक गोष्ट अशी कि तो किती मेगापिक्सेल(Megapixel) व अँप्रेचर तपासा. इथं एक गोष्ट लक्षात घ्या जास्त मेगापिक्सेल म्हणजे चांगला मोबाइल हे विधान चुकीचं आहे. कॅमेरा सेटिंग मध्ये मोड तपासा ,जस कि कलर , एच डी आर , मॅन्युअल मोड. आजकाल बाजारात ८ मेगापिक्सेल , १२ मेगापिक्सेल ,१३ मेगापिक्सेल ,२१ मेगापिक्सेल व ४८ मेगापिक्सेल चे मोबाइल उपलब्ध आहेत. जर तुम्हाला फोटोग्राफी ची आवड असेल तर मागचा कॅमेरा १३ मेगापिक्सेल च्या वरचे जे मोबाइल असतील ते घेतले पाहिजेत सोबत कॅमेरातील पर्याय अपरेचेर ,शटर स्पीड,कलर मॅनुअली मोड वर ठेवून दोन-चार क्लिक घेऊन तपासले पाहिजेत. आज काल सेल्फी चा ट्रेंड चालू आहे तर कॅमेरा असा हवा कि सोबत फ्लॅश असावा. सरासरी लोक मागचा १२-१३ मेगापिक्सेल व पुढचा ८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला मोबाइल निवडतात. बाजारात ३-४ कॅमेरे असलेले मोबाईल उपलब्ध झाले आहेत आता हे ३-४ कॅमेरे का दिले असतील याचा विचार लोक कधीच करत नाहीत. इथं सांगायचं तर त्यात मुख्य कॅमेरा एकच असतो बाकीचे २-३ कॅमेरे मोडस असतात जस अप्रेचर ,फोकस ,कलर ,सॅच्युरेशन ,लाइट समायोजित करतात .
४) बॅटरी :
आज काल बॅटरी बॅकअप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे . आपण दिवसातले ५-६ तास एकसारखे मोबाइल वापरत असू तर आपल्या मोबाइलची बॅटरी हि कमीत कमी ३००० ते ३५०० हजार एमएएच असावी. जर तुम्ही गेम खेळात असाल तर ३५०० एमएएच वरची घ्यावी , ३००० एमएएच च्या खालची बॅटरी असलेला मोबाईल तुम्ही घेताय तर तुम्हाला दिवसातून दोन वेळा बॅटरी चार्ज करावी लागेल . प्रवास , गाणी,खेळ व फोटोग्राफी करणाऱ्या लोकांनी ह्या गोष्टी खास करून लक्ष्यात ठेवल्या पाहिजेत.
५) स्पीकर :
नवीन मोबाइल घेताय मग या ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात | तंत्रज्ञान || Khasmarathi |
स्पीकर हे मोनो व स्टिरिओ प्रकारचे असतात ,मुख्यतः जर तुम्ही स्पीकर वर विडिओ बघत असाल , विडिओ कॉलिंग ,मोठ्याने गाणी ऐकत असाल तर तुम्ही स्टिरिओ प्रकारचा मोबाइल घेतला पाहिजे.जर तुम्ही हेडफोन वर ऑडिओ ,म्युझिक ऐकत असाल तसेच सरासरी लोक ३.५ एम एम जॅक असणारा मोबाईल विकत घेतात.
६) सिम स्लॉट्स व मेमरी कार्ड :
सिंगल सिम ,ड्युअल सिम ,हायब्रीड सिम असलेले मोबाइल आज बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही घेणाऱ्या मोबाइलची वाढीव (एक्सटेंडेड) मेमोरी हि जास्तीत जास्त ६४ gb असायला हवी तसेच इंटर्नल मेमरी हि ३२ gb असायला हवी. आजकाल लोक खूप म्युझिक ऐकतात , विडिओ बघतात ,फोटोग्राफी करतात त्यासाठी जास्त मेमरी स्टोरेज असणे गरजेचे असते.
७) सेवा केंद्र (सर्विस सेंटर) :
८०% लोक हे बघतच नाहीत कि आपण जो मोबाइल घेतोय त्या कंपनीचे सेवा केंद्र आहे कि नाही ?, आपल्या शहरात ती सेवा देतात कि नाही ? जर तुमचा मोबाईल फोन हमी कालावधी (वॉरंटी पिरियड) मध्ये असेल आणि तुमचा मोबाइल खराब झाला तेव्हा तुम्हाला सेवा केंद्राची गरज भासते त्यामुळे या गोष्टीं कडे लक्ष्य द्यावे.
टिप्पणी पोस्ट करा