शेळीपालन : शेतीला जोडव्यवसाय | शेती || KhasMarathi
जगप्रसिद्ध, शेअर बाजारातील सर्वोत्तम गुंतवणूकदार वॉरेन बफेट म्हणतात, 'तुमची सर्व अंडी एकाच बास्केट मध्ये ठेऊ नका.' अगदी शेतकरी बांधवांनी देखील सर्व गुंतवणूक शेतीत करण्याऐवजी शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष द्यायला हवं!!
शेळीपालन : शेतीला जोडव्यवसाय | शेती || KhasMarathi |
आपल्याइकडील शेतकरी बांधवांनी आपली सर्व गुंतवणूक फक्त शेतीमध्ये करण्याऐवजी शेतीपूरक व्यवसायांकडे देखील एक संधी म्हणून बघायला हवं!
खासमराठी मधील 'शेती' या सदरात आपण शेती अर्थात कृषी सोबतच अनेक साऱ्या कृषीपुरक व्यवसायांची ओळख करून घेणार आहोत! हा आमचा एक नवीन उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना समर्पित आहे....!
आज आपण शेळीपालन या शेतीला असलेल्या जोडव्यवसायाबाबत माहिती घेणार आहोत, चला तर मग तुम्ही जे शोधत आहात ती सर्व माहिती आपण इथे घेऊया!
शेळीपालन दोन प्रकारे करता येतं.
१. बंदिस्त शेळीपालन
२. अर्धबंदिस्त शेळीपालन
शेळीपालन : शेतीला जोडव्यवसाय | शेती || KhasMarati
अगदी कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन होय.
१. बंदिस्त शेळीपालन :-
नावाप्रमाणेच शेळ्यांना चरण्यासाठी शेतात/जंगलात चरण्याकरिता न सोडता त्यांना विशिष्ट ठिकाणी बंदिस्त करून त्यांचं संगोपन करण्याच्या पध्द्तीला बंदिस्त शेळीपालन असे म्हणतात!
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस अशा जनावरांपेक्षा वेगळी असते , शेळ्या प्रत्येक झाडा झुडपाचे कोवळे कोवळी शेंडे खातात.
त्यामुळे झाडांची वाढ खुंटते तसेच या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज पसरलेला आहे आणि तो काही प्रमाणात खराही आहे.
जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते हे विशेष आहे.
२. अर्धबंदिस्त शेळीपालन
अर्धबंदिस्त शेळीपालनात शेळ्यांना चराऊ कुरणांच्या उपलब्धतेनुसार पाच ते सहा तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन त्यांचे संगोपन करण्यात येते.
या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहाराचा खर्च बंदिस्त शेळीपालनाच्या तुलनेत 60 ते 70 टक्के कमी होतो.
खासकरून बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा असतो अशा ठिकाणी अर्धबंदिस्त शेळीपालन शक्य होते.
शेळीपालन| शेती || खासमराठी |
शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही शेळीपासून उत्त्पन्न काय घेणार आहात? कारण शेळी ही दूध , मांस व कातडी तसेच काही जातीच्या शेळ्यापासून लोकर देखील मिळते.
यातील तुमच्या महत्त्वाच्या उत्पन्नानुसार कोणत्या जातीची शेळी, शेळीपालनासाठी घ्यायची ते ठरवावे लागेल!
आता शेळ्यांच्या जातींबद्दल माहिती घेऊया :-
१. दुग्ध उत्पादन देणाऱ्या शेळ्या:-
बारबेरी, जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी.
यात अजून एक महत्त्वाची जाती येते ती म्हणजे सानेन जी बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त असते.
२. लोकरी उत्पादन देणाऱ्या शेळ्या :-
अजमेरी, बिटल, उस्मानाबादी, सुर्ती.
३. विदेशी आणि झटपट वाढ असणाऱ्या शेळ्या :-
अंगोरा, सानेन ,टोने,बर्ग,अल्पाईन,एम्लोन्यूबियन.
या सर्व सुधारित जाती आहेत!
४. मांस उत्त्पन्न देणाऱ्या शेळ्या :-
◆ बोएर : बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त
◆ कोकण कन्याळ: अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त
◆ उस्मानाबादी : अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त
यातील बोयर जातीच्या शेळया आफ्रिकेत आढळतात.
त्या खूप वजनदार असून या जातीतील नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो इतके असते.
५. मांस व दूध दोन्हीं उत्पादनासाठी उत्तम जाती :-
■ संगमनेरी : अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त
■ सिरोही : अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त
६. लोकरी उत्पादनासाठी प्रसिद्ध शेळी :- पश्मिना जातीच्या शेळीपासून दूध मांस सोबतच लोकर सुद्धा मिळते.
आपल्याकडे शुध्द जातीच्या शेळया वापरायच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्यात!
मात्र तरी देखील संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.
भारतात शेळ्यांचे महत्त्व
संपूर्ण जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया आहेत, त्यातील 123 दशलक्ष शेळया एकट्या भारत देशात आहेत.
भारतातील एकूण दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध तर 45 ते 50 टक्के मांस आणि 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.
▪ भारतात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते.
अशाच आपल्या भाषेत फक्त शेतीच नव्हे तर , शिक्षण , आरोग्य, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या माहिती साठी खासमराठी या आपल्या आवडत्या आणि सर्वोत्तम खास मराठी संकेतस्थळाला नेहमी भेट देत रहा!!
धन्यवाद!!
टिप्पणी पोस्ट करा