Red Sparrow Movie || Movie Review


          १५ फेब्रूवारी २०१८ रोजी प्रदर्शित झालेला Red sparrow हा चित्रपट उत्तम आहे अस म्हणावा लागेल. ६.९ करोड USD बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५. १६ करोड USD कमावले . red sparrow imdb रेटिंग १० पैकी ६.६ असून हा चित्रपट Action / Thriller प्रकारात मोडतो. red sparrow movie ला गुगलच्या अहवालानुसार ८१% लोक पसंती देतात. 

Red Sparrow Movie || Movie Review
Red Sparrow Movie || Movie Review

Awesome !!! 💝💝💝💝💝


         ज्यांना IB, RAW, ISI या आणि इतर अशा प्रत्येक वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख गुप्तहेर संस्था,  संघटना आणि इतर अनेक गोष्टी ज्यामध्ये smartness कुचून कुचून ठासून भरलेला असतो अशा गोष्टींची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा चित्रपट नक्कीच एक प्रकारची मेजवानी  ठरेल!!


         Adult things  + Thrill + Romance + Smartness + Dialouges या सर्व गोष्टींमध्ये स्वतःचीच एक उंची या चित्रपटामध्ये अनुभवायला मिळाली .... माहीती नाही पण ही लोकं खरच मानसशास्त्र, भाव , भावना यांच्या इतकं पलीकडे कसं जातात.... हि विचार करण्यासारखी आणि माझ्यासाठी तरी अतिशय कमालीची गोष्ट वाटते!!

         
          'एखाद्या व्यक्तीची नेमकी गरज अथवा त्याच्या आयुष्याचा अपूर्ण भाग शोधायचा तो अपूर्ण भाग आपण स्वतः बनायचं आणि मग ती व्यक्ती आपल्याला अगदी हवं ते न मागता देते!!'


         'आपलं शरीर हि आपल्या देशाने पोसलेली आणि वाढवलेली संपत्ती आहे त्यामुळे स्वतःला कधीपण आपल्या छोट्या 'लाज-लज्जा-शरम' याच्या पलीकडे जाऊन देशासाठी याचं कधीपण बलिदान द्यावं!'


         अशाप्रकारचे, अतिशय मस्त जबरदस्त अगदी समुद्राच्या खोलीइतकं ज्ञान सामावलेले वाक्य यात ओतले गेले आहेत... even practically  - Wanted [Hollywood] सारखंच एक training एक brainwashing आपल्यात किती बदल घडवू शकते हे देखील एक नंबर पद्धतीने practically दाखवलं आहे!!


         कहाणी ला तर तोडच नाही .... एक साधी सामान्य अशी मुलगी , जिचं इतर लोकांसारखं 9-5 सोडून आयुष्य ढकलत ढकलत जगणाऱ्या लोकांपेक्षा dancer बनून स्वातंत्र्य उपभोगण्याचं एक सामान्य आयुष्य जगायचं स्वप्न असतं , अशी एक मुलगी जिच्यावर आजारी आईचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी  असते.... जिचे वडील वारलेले असतात ....... तिचा काका एक  अतिशय जबाबदार पद धारण केलेली आणि रशियन म्हणजे अर्थातच कट्टर देशभक्त असलेली व्यक्ती ....... या सामान्य मुलीला फॉरेइग्न Intelligence service (SVR) मध्ये कशाप्रकारे आणतो .... अक्षरश: तिला वेश्या बनण्याची Training तिथेच दिली जाते ...RED SPARROW अशाच सर्व मुलींना ज्या अशाप्रकारच्या इतर परराष्ट्रीय संघटना आणि त्यात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवून देऊ शकत (वेळप्रसंगी आपलं शरीर/जीव पण देऊन) त्यांना RED SPARROW म्हणलं जातं!!


.... बाकी सगळं काही देशासाठी असलं तरी ..... यात गोम अशी असते की ज्यांचं काम पूर्ण होतं एकतर त्यांना जीव द्यावा लागतो अथवा कोणीतरी त्यांचा जीव घेतोच .........


           मात्र  या कहाणी मध्ये एका CIA agent ची माहिती मिळवण्याच्या mission वर गेलेली हि सुंदरतेने आणि तितकीच innocent वाटलेली आणि शेवटी तितकीच  खतरनाक red sparrow झालेली ललना सर्वांना अगदी तिच्या सख्ख्या काकाला कशी पुरून उरते हे सगळं पाहणं एकदम कमालीच आहे ...... !!!


        #Note:- Adult scene आजपर्यंत जितके पाहिले ,  त्यापेक्षा या movie मध्ये सर्वोत्तम आहेत !! हां इथेपण अर्धवटच सगळे कार्यक्रम असले तरी त्या त्या वेळी श्वास आपोआप रोखला जातो इतकं making भारी आहे!!!


       So एकटं असतानाच बघा इतकच !! बाकी story जराशी lengthy वाटते but believe me it worth's your patience !!!!


Rating by S.J. :-     10/11*


~ S.J. 




          मित्र आणि मैत्रिणींनो आपण Red sparrow movie review पाहिला.  पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर  तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने