संख्या व संख्या प्रकार |अंकगणित | Spardha pariksha 


               नमस्कार मित्रांनो, आमच्या मागील लेखात तुम्ही लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता यावर लेख वाचला असेलच, नसेल तर नक्की वाचा.


             आपण आता अंकगणित विषयाची तयारी करून घेणार आहोत तर अंकगणित विषय सगळ्या विषयांच्या मानाने सोपा आहे. तसेच त्या विषयात पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो फक्त त्यात आकडेमोड करताना काळजी घ्यावी लागते नाहीतर खूप थोड्याश्या चुकांमुळे तुमचं स्वप्न भंग होऊ शकतो.


              तर चला मग अंकगणित विषयातील आपण पहिला धडा - संख्या आणि संख्या प्रकार यावर माहीती घेणार आहोत तसेच प्रश्न कसे येतात तेही पाहणार आहोत.

संख्या व संख्या प्रकार |खासमराठी
संख्या व संख्या प्रकार |अंकगणित | स्पर्धा परीक्षा ||  Khasmarathi

संख्या व संख्या प्रकार

 नैसर्गिक संख्या -नैसर्गिक संख्या म्हणजेच धन पूर्णांक संख्या असही म्हणू शकतो .
                              तर त्या कोणत्या तर 1,2,3,4,5 ......या संख्याना आपण नैसर्गिक संख्या अस म्हणू शकतो.

2)  पूर्ण संख्या -पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरू होतात
           
                           0,1,2,3,4,5....या संख्याना पूर्ण संख्या म्हणतात नैसर्गिक संख्यामध्ये फक्त 0 नसतो एवढाच फरक आहे नैसर्गिक अणि पूर्ण संख्या मध्ये आहे.

3)  पूर्णांक संख्या  - पूर्णांक संख्या  ह्या ......-3,-2,-1,0,1,2,3....ह्या अश्या आहेत.

                                त्यात धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक अश्या असतात
                                               धन पूर्णांक म्हणजे 1,2,3,4...
                                                   ऋण पूर्णांक -1,-2,-3...

4) अपूर्णांक संख्या - ज्या संख्या अंश छेद रुपात लिहिता येतील अश्या संख्याना अपूर्णांक संख्या असे म्हणतात
                                     उदा.1/2 ,3/4,5/6,8/9...

5) परीमेय संख्या-
             ●सर्व पूर्णांक पारिमेय संख्या असतात
                       उदा , 8 = 8/1 =16/2

                ●सर्व अपूर्णांक परिमेय संख्या असतात
                         1) 2/3,3/2   2) -2/3,-3/2

                     ●धन पारिमेय संख्या 1) 2/3, 5/6.   2) -2/-3

      ●ऋण परिमेय संख्या -2/3,-5/6

6) सम संख्या

          ज्या अंकाच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक किंवा ज्या संख्येला 2 ने भाग जातो असतील त्यास सम संख्या म्हणतात.

उदा- 22,64,50,46,68 ह्या संख्याना सम संख्या म्हणतात.



7) विषमसंख्या-

ज्या संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 यांपैकी एखादा अंक असतो किंवा त्या संख्येला भाग जाऊन बाकी 1 उरते.अश्या संख्याना विषम संख्या म्हणतात.



8) मूळ संख्या -

मूळ संख्येला 1 किंवा ती संख्या या खेरीज दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. उदा.13,17,19


9) संयुक्त संख्या-

मूळ संख्या नसलेल्या संख्याना संयुक्त संख्या असे म्हणतात..उदा 4,6,8,9,10,12...


10) जोडमूळ संख्या -

(3,5)(5,7)(11,13) ज्या मूळ संखेमध्ये 2 चा फरक असतो त्यास जोडमूळ संख्या असे   म्हणतात.

11) सहमूळ संख्या-

(8,9),(6,7),(11,12),(12,35)


12) अपरिमेय संख्या -  √2,√3,√5...

ज्या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर अनंत अनावर्ती असते त्यास अपरिमेय संख्या म्हणतात..

हे संख्याचे सगळे प्रकार आहेत.

 तर मित्रांनो तुम्ही हे न विसरता अभ्यास करा आणि दुसऱ्या कुठल्या विषयावरती तुम्हाला अडचण असेल तर कंमेंट करा आम्ही त्याविषयी लिहू धन्यवाद.

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.

पोलिस भरती Police Bharti 2019 लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती | KHASMARATHI



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने