शाहरुख खान - सर्वाधिक विवादित व्यक्तिमत्त्व || व्यक्तिविशेष || खासमराठी
१) किंग खान नावाने ओळखले जाणाऱ्या शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर, १९६५ रोजी झाला, त्याचे वडील ताज मोहम्मद खान एक स्वातंत्र्यसेनानी होते आणि त्यांची आई लतीफा फातिमा मेजर जनरल शाहनवाज खान यांची मुलगी होती.
२) शाहरुख खान यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबो स्कूल येथून केले. जेथे ते क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक जीवन आणि नाट्य कला या विषयांत पारंगत होते. यानंतर त्यांनी हंसराज महाविद्यालयातून अर्थशास्त्र पदवी आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन प्राप्त केले.
३) १९९१ मध्ये खान त्याच्या आईवडिलांच्या निधनानंतर दिल्लीहून मुंबईला आला. १९९१ मध्ये त्यांनी गौरी खानबरोबर हिंदू प्रथानुसार लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत - एक मुलगा आर्यन (जन्म १९९७) आणि एक मुलगी सुहाना (जन्म २०००) आणि मुलगा अब्राहम.
४) शाहरुख खान यांनी दिल्लीतील थिएटर अॅक्शन ग्रुपमध्ये नामांकित नाटक दिग्दर्शक बॅरी जॉनकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. १९८८ मध्ये खान यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात दूरदर्शन सीरियल "फौजी" पासून केली होती, ज्यात त्यांनी कमंडो अभिमन्यु रायची भूमिका केली होती.
५) बॉलिवूडमधील त्यांचा पहिला अभिनय बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोषित झालेल्या “दिवाना” चित्रपटात होता. या चित्रपटासाठी, त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार मिळाला. १९९८ मध्ये करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ त्या वर्षाचा सर्वात मोठा हिट म्हणून घोषित झाला
६) शाहरूख खान यांनी ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांना १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारे ते दिलीप कुमारसह दुसरेच अभिनेते आहे.
७) २००५ साली त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचे ते सह-मालक आहेत. भारतीय प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचे देखील ते सह-मालक आहेत.
८) २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूख खान यांना जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले, तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्यांचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला.
९) खूप गरीब परिस्थितीमधून यश मिळवलेला हा लोकांचा खूप प्रिय कलाकार आहे . त्यांचे चाहते फक्त भारतात नसून अख्या जगभर आहेत.
अशा या खूप प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्याच्या जन्मदिन निमित्त खासमराठी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.
📌🚩 *खासमराठी* चे असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
टिप्पणी पोस्ट करा