ल.सा.वि ( LCM ) आणि म.सा.वि ( HCM ) कसा काढावा ? || Spardha pariksha 


          मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही Spardha pariksha ची तयारी करत असाल तर तुमच्या अभ्यास क्रमात लसावि - LCM  आणि मसावि - HCM कसा काढावा हा भाग नक्कीच असणार. तर मित्रांनो आपण या लेखातून lasavi आणि masavi बाबत शिकणार आहोत ते अगदी lasavi masavi example in marathi भाषेत सोप्या व विशिष्ट क्लुप्त्या वापरून . तुम्हाला आम्ही खात्री देतो कि एकदा तुम्ही या लेखातून शिकलात तर ते कधी विसरणार नाहीत. चला शिकुयात


ल.सा.वि ( LCM ) आणि म.सा.वि ( HCM ) कसा काढावा ? || Spardha pariksha
ल.सा.वि ( LCM ) आणि म.सा.वि ( HCM ) कसा काढावा ? || Spardha pariksha

ल.सा.वि. ( लघुत्तम साधारण विभाज्य ) LCM :-


1) ल.सा.वि. LCM - लघुत्तम सामाईक विभाज्य म्हणजे दोन किंवा अधिक संख्याचा सामाईक असणारा विभाज्य
    उदा. 15 ÷ 3 = 5 आणि 15 ÷ 5 = 3 , 15 हा 3 आणि 5 यांचा सामाईक विभाज्य आहे .

2) विभाज्य म्हणजे ज्याला पूर्ण भाग जातो ,बाकी उरत नाही असा भाज्य
     उदा. 3 च्या विभाज्य संख्या 3 , 6 , 9 , 12...

3) ल.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी मोठी संख्यांच असते.


4) lasavi example in marathi :

12 आणि 16 चा अवयव पद्धतीने लसावी कसा काढतात हे आपण पाहू.

   12 = 2 × 2 × 3

   16 = 2 × 2 × 2 × 2

असे त्यांचे भाग पडतात

ल.सा.वी = सामाईक अवयव × असमाईक अवयव
            = (2 × 2) × (3 × 2 × 2) = 4 × 12 = 48


तर 12 आणि 16 चा ल.सा.वि  48 आला.



म.सा.वि. ( महत्तम साधारण विभाजक ) HCM :-



1) म.सा.वि HCM :- महत्तम सामाईक विभाजक (पूर्ण भाग जाणारा भाजक)
    उदा . 270 ÷ 9=30 तर 9 हा 270 चा विभाजक आहे.

2) म.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी लहान संख्याच असते.

3) masavi example in marathi :

32 आणि 48 चा म.सा.वि  अवयव पद्धतीने कसा काढतात हे आपण पाहू

32 = 2 × 2 × 2 × 2 × 2

48 = 2 × 2 × 2 × 2 × 3

म.सा.वि = समाईक अवयवांचा गुणाकार
       
             = 2 × 2 × 2 × 2
             = 16



महत्वाची सूत्रे :


1) ल.सा.वि× म.सा.वि ÷ पहिली संख्या = दुसरी संख्या

2) दोन संख्याचा गुणाकार ÷ ल.सा.वि = म.सा.वि

3) दोन संख्याचा गुणाकार ÷ म.सा.वि = ल.सा.वि

4) ल.सा.वि × म.सा.वि = दोन संख्याचा गुणाकार

5) ल.सा.वि ÷ म.सा.वि = असामाईक अवयव

6) म.सा.वि × मोठा असामाईक अवयव = मोठी संख्या

7) म.सा.वि × लहान असामाईक अवयव = लहान संख्या

8) अपूर्णांकाचा म.सा.वि = अंशाचा म.सा.वि ÷ छेदाचा ल.सा.वि

9) अपूर्णांकाचा ल.सा.वि = अंशाचा ल.सा.वि ÷ छेदाचा म.सा.वि


 ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वासोबत  'SHARE' करायला विसरू नका. !



                   
     📌🚩  खासमराठीचे असेच दर्जेदार लेख, दैनंदिन घडामोडी तसेच इतर अनेक नवनवीन गोष्टी थेट आपल्या WhatsApp  वर मिळवण्यासाठी आजच  📱 ९२८४६७८९२७ या क्रमांकावर आपले व आपल्या जिल्ह्याचे  संपूर्ण नाव पाठवून " JOIN ME " असा  WHATSAPP MESSAGE पाठवा. !

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने