औषधाने नव्हे अशा घरगुती उपायांनी करा सर्दीवर मात | आरोग्यम || खासमराठी  

औषधाने नव्हे अशा घरगुती उपायांनी करा सर्दीवर मात | आरोग्यम || खासमराठी
औषधाने नव्हे अशा घरगुती उपायांनी करा सर्दीवर मात | आरोग्यम || खासमराठी

                 हिवाळा आला की थंडी आठवते आणि थंडी म्हणाल तर सर्वात आधी थंडीमुळे होणारे आजार आणि त्यामुळे घ्यावी लागणारी काळजी म्हणून स्वेटर मफलर अशा गोष्टी आठवतात. यात सर्वात जुनाट व अनेकांसाठी खुपदा प्रचंड प्रमाणात डोकेदुखी ठरणारा आजार म्हणजे सर्दी .

               मात्र ही सर्दी अनेकदा घेतलेल्या औषधांनी कमी होण्या ऐवजी वाढतानाच दिसते, मात्र आजीबाईच्या बटव्यातील आम्ही सांगत असलेले उपचार एकदा अवश्य करून पाहिले तर नक्कीच तुम्हाला सर्दीमुळे होणाऱ्या त्रासामध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल .


डॉक्टरांचा असा विश्वास आहे की या हंगामात सर्दी टाळण्यासाठी आपण उबदार कपडे घालतो, परंतु थंडीचा परिणाम टाळण्यासाठी, शरीराला बाहेरून तसेच आतून देखील गरम राहणे आवश्यक आहे .

या आजारांपासून बचाव करण्यासाठी अनेक घरगुती उपचारांचा अवलंब केला जाऊ शकतो. थंडीत लवंगा, तुळस, काळी मिरी आणि आल्यापासून बनविलेले चहा खोकला, सर्दी, सर्दीसाठी 'रामबाण औषध' म्हणून कार्य करते .

औषधाने नव्हे अशा घरगुती उपायांनी करा सर्दीवर मात | आरोग्यम || खासमराठी
औषधाने नव्हे अशा घरगुती उपायांनी करा सर्दीवर मात | आरोग्यम || खासमराठी


१) नाकातील श्लेष्मकलेला शोफ होतो आणि ग्रंथी वाढून मोठया प्रमाणात स्राव तयार होतो. स्रावाच्या प्रकाराप्रमाणे नाकातून पाणी गळत असल्यास त्याला नाक गळणे म्हणतात .



२) सर्दीचे दोन प्रकार पडतात संक्रमणजन्य सर्दी आणि अ‍ॅलर्जीमुळे होणारी सर्दी .



३) नेहमीच्या सर्दीची सुरूवातीची सर्व लक्षणे अनेक प्रकारच्या व्हायरसांच्या संक्रमणामुळे उद्भवतात. सुरूवात एकाएकी होते. नाकात गुदगुल्या झाल्यासारखे वाटून शिंका येतात .



४) नाक व घसा कोरडा पडून दाह किंवा वेदना जाणवते. डोके जड होते व डोळ्यांची जळजळ सुरू होते. नंतर नाकातून पाण्यासारखा स्राव मोठया प्रमाणात वाहू लागतो .



५) अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या अधिहर्षताजन्य सर्दीत नाक व डोळ्यांची खाज, शिंका व डोळ्यांतून पाणी गळणे, नाक चोंदणे, डोके जड येणे इ. लक्षणे दिसतात .



६)  व्हायरसजन्य सर्दीसाठी प्रतिव्हायरस औषधे उपलब्ध नसल्याने व या प्रकारच्या सर्दीचा कालावधी ठराविक असल्याने फक्त लक्षणानुसार उपचार ( नाकातून पाणी गळणे कमी होण्यासाठी) करावे लागतात .



७) श्वसनाचे व्यायाम व प्राणायाम, मोकळी स्वच्छ हवा, अतिदमट किंवा अती कोरडी हवा व कोंदट जागी काम करणे टाळावे .



८) सर्दीजनक व्हायरस सतत बदलत असल्याने त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधक लसनिर्मिती शक्य झालेली नाही .



९) वारंवार सर्दी होत असल्यास किंवा नेहमीच्या उपचारांनी बरी होत नसल्यास नाक-कान-घशाच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी .


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !



📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥     

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने