आपण कोरोना व्हायरसला रोखू शकतो का ? । Marathi Special ।। खास मराठी
आपण कोरोना व्हायरसला रोखू शकतो का ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी |
कोरोना व्हायरस ( Corona Virus ) ज्याला सार्स-सीओवी-२ सुध्दा म्हनले जाते आणि त्यामुळे होनार्या रोगाला कोरोना व्हायरस डिसीइज कोविड-१९ सुध्दा म्हनतात . ते खर तर सुरु झाले डिसेंबर २०१९ च्या पहिल्याच आठवड्यात . कोरोना व्हायरस ( Corona Virus ) ची पहिली बातमी ही चीनमधील वुहान शहरातील सीफूड मार्केट मधुन मिळाली. या मार्केट मधे समुद्रातील जलचर तसेच प्राण्यांपासुन बनवलेले प्रोडक्ट विक्री केले जात होते . जसे कि कुत्रे , चिकन , डुक्कर , साप , वटवाघुळ सगळे एकाच ठिकानी . याच चीन मधील वुहान शहराला कोरोना व्हायरस फैलाव होण्याच सुरुवातीच शहर मानल जात. गोष्ट अशी आहे कि कोरोना व्हायरस हा सर्वात पहिला प्राण्यांमध्ये पहायला मिळाला . या सर्व प्रकारच्या प्राण्यांना एकसाथ ठेवले गेले ज्यामुळे प्राण्यांमधील व्हायरस हा माणसांमधे फैलाव होन्याच्या संभावना वाढल्या. हेच २०१९ च्या डिसेंबर महिन्यात पहावयास मिळाले.
आपल्या मना मध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात जसे कि कोणत्या प्राण्यामुळे हा कोरोना व्हायरसचा फैलाव मानवांत झाला असावा ? तर विशेष तज्ञांच्या अनुसार हा व्हायरस वघवाघुळांमुळे माणसांत पसरला व प्रथम एका व्यक्तिला त्याचे संक्रमण झाले आणि त्यानंतर बाकिच्या व्यक्तिमधे तो पसरत गेला जे त्या प्रथम व्यक्तीच्या संपर्कात आले होते. अशाप्रकारेच एक मोठी चेन बनत गेली. चीन मधे या कोरोना व्हायरस ने हाहाकार माजवला . वाढता प्रादुर्भाव पाहुन ,१ जानेवारी २०२० या दिवशी चिन मधील वुहान शहर बंद करण्यात आले . चिनच्या विशेष तज्ञांनी जेव्हा या व्हायरस च्या जेनेटिक रचनेचा अभ्यास केला तेव्हा त्यांना समजले कि कोरोना व्हायरस व वटवाघुळांमधील विषाणुमधे समानता आढळली आणि त्यांनी निकष काढला कि हा व्हायरस वटवाघुळांमधुन आलेला आहे. दुसर्या काही जनरल मेडिकल वायरोलोजी तज्ञांच्या अनुसार हा व्हायरस त्याच मार्केट मधे विक्री केल्या जानार्या कोरोना सापांमधुन आलेला आहे. तर काही जनांच्या मते हा व्हायरस अनेक प्राण्यांमधुन आलेला आहे. जसे कि साप , वटवाघुळ व आणखी काही प्राणी जे मार्केट मधे विक्री केले जायचे. पन खूप सार्या संशोधना नंतर ही कोणी खात्रीनीशी सांगु नाही शकले कि हा व्हायरस कोठुन आला. कोरोना व्हायरसच्या फैलावा नंतर लोकांमधे त्याची लक्षणे दिसुन येवु लागली.
आपण कोरोना व्हायरसला रोखू शकतो का ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी |
चिन मधील डॅाक्टर ली वेन्लीघी यांच्याकडे सर्वप्रथम कोरोना व्हायरस ने पछाडलेल्या रुग्नांना पाठवण्यात आले. त्यांनी केलेल्या काही परीक्षणांनुसार असे सांगितले कि हा एक नवीन व्हायरस आहे जो आजपर्यंत कोणत्याच माणसांमध्ये पहायला मिळाला नाही आणि त्याच्या बद्दल सखोल माहिती उपलब्ध नाही. डॅाक्टरांनी लोकांना जागरुक राहायला सांगितले कारण या व्हायरस चा प्रसार खूप तेजीने होनार होता . त्यानंतर डॅाक्टर ली यांना अटक करन्यात आली कारण होते कि ते लोकांमध्ये भितीचे वातावरन फैलावत आहेत. पन त्यांच्या अटके नंतर जे काही भयानक वास्तव पहायला मिळाले ते जगाच्या इतिहासात नमुद केले गेले. वुहान शहरात हजारो लाखो माणसांत हा व्हायरस तेजीने पसरत गेला या व्हायरस बद्दल सर्वात पहिला निष्कर्ष काढनार्या डॅा. ली यांना सुद्धा कोरोना व्हायरस ने पछाडले आणि ७ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांचा मृत्यु झाला. चिनने डॅा. ली यांना अटक न करता त्यांचे कार्य त्यांना करु दिले असते तर हा व्हायरस तितका पसरला नसता. २०२० सालच्या फेब्रुवारी - मार्च मधे कोरोना व्हायरस जगभरात पसरला .
मार्च ११ , २०२० या दिवशी WHO ( World Health Organization ) ने अधिकृत महामारी घोषित केली WHO च्या वेबसाइट अनुसार आजपर्यंत साडे सात लाख लोक कोरोना व्हायरस ने पीडित असल्याचे समजते तर एकुन जवळ जवळ दीड लाख लोक बरे झाले तसेच ३२ हजार लोकांचा मृत्यु झाल्याचे समजते. तुमच्या आसपास वावरनार्या व्यक्तीला जर खोखला , ताप ,कफ झाला असेल तर असे समजु नका कि त्याला कोरोना झालाय तर तो साधा खोखला ही असु शकतो. जर अशा खोखल्या मुळे एखाद्याला खूपच त्रास होत असेल आणि त्या प्रकृति काही वेळानी ढेपाळत चालली असेल तेव्हा मात्र अशा व्यक्तीने जवळ्या हॅास्पिटल मध्ये जावुन चाचणी करने आवश्यक आहे.
बॅक्टेरिअल इंफेक्शन बॅक्टेरिया मुळे होनारा जसे कि घसा , नाक , कान या प्रकारच्या इंफेक्शन एंटिबायोटिक ने बरा करन्यात येतो पन वायरल इंफेक्शन जसे कि सर्दी , इंफ्लुएंजा ,वाराफोड्या , एड्स ,डेंग्यु , कोरोना व्हायरस यांच्यावर कोणते ही औषध उपलब्ध नाही , त्यांना ट्रिटमेंट ने ठिक करता येवु शकते पन कोरोना व्हायरस असा आहे कि त्याच्यावर कोणत्याच ट्रिटमेंट चा परिणाम होत नाहिये. तुमची इम्युनो सिस्टीम ( रोग प्रतिकारक शक्ती ) जितकी मजबुत असते तितका धोका कमी असतो. हेच कारण आहे कि एखादा कोरोना व्हायरस रुग्ण रिकव्हर होतो म्हणजे ठीक होतो. अशा काळात आपण विशेष काळजी घेतली पाहिजे , रोग प्रतिकारक व पोषक आहार घेतला पाहिजे . खूपच गरज असल्यास बाहेर पडावे पण चेहऱ्याला मास्क लावावा . बाहेरच्या कोणत्या हि व्यक्तीशी बोलताना विशिष्ट अंतर ठेवायला विसरू नका . खूप साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांना बळी पडू नका.
" कोरोना व्हायरस आणि भारत "
कोरोना व्हायरस जगभरात पसरत आहे आणि तो भारतात हि येणार याची आशंका होतीच . भारतातील पहिला कोरोना बाधित रुग्ण हा केरळ राज्यात सापडला कोरोना संक्रमित हा एक विद्यार्थी होता . तिथून बाकीचे शहरात फैलावत गेला. कोरोना व्हायरस भारतात येण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना बाधित फॉरेन व्यक्ती विना टेस्ट केल्या भारतात प्रवेश करणे . जसे कि पुणे , सांगली , इस्लामपूर या ठिकाणी बाहेर देश्यात असणाऱ्या काही व्यक्ती भारतात परतल्या त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाली . देशातील सगळ्यात जास्त रुग्ण व मृत्यू झालेले रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. कोरोनाचा प्रभाव बाकीच्या राज्यात झपाट्याने वाढत आहे त्यामळे भारत सरकारने लोकडाऊन चे आदेश दिले.आता पर्यंत भारतात कोरोना व्हायरस च्या १०२४ केसेस आल्या असून त्यातील २७ रुग्ण मृत्यूमुखी पडले तर ९५ जण ठीक झाले आहेत .
आपण कोरोना व्हायरसला रोखू शकतो का ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी |
भारतातील पहिले कोरोना व्हायरस परीक्षण किट हे मायलैब डिस्कवरी ची रिसर्च आणि डेवलपमेंट प्रमुख वायरोलॉजिस्ट मीनल डाखवे भोसले ( Minal Dakhave Bhosale ) यांनी तयार केले . या किटच्या साहाय्याने संशयित व्यक्ती चे परीक्षण निकाल दोन ते तीन तासात मिळू शकतात. काही बातम्यांच्या अनुसार बाळाला जन्म देण्याच्या आधी काही तास एकसारखे काम करून त्यांनी हे किट विकसित केले व ते बाजारात आणण्यात आले. मीनल यांच्याद्वारे तयार केलेले किट हे एकावेळी १०० सॅम्पल चे परीक्षण करू शकते आणि त्या किट ची किंमत १२०० रुपये आहे तर विदेशातून मागवले जाणारे किटची किंमत हि ४५०० रुपये असून त्याचे परीक्षण निकाल येण्यासाठी ५ ते ६ तास लागतात .
आपण कोरोना व्हायरसला रोखू शकतो का ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी |
पुण्यातील भारतीय वैज्ञानिकांनी हा अदृश्य व्हायरस कसा दिसतो याचे चित्रीकरण केले आहे हे मिक्रोस्कोपिक असून यामध्ये कोरोना व्हायरस स्पष्ट दिसतो . हे चित्रीकरण भारतातील केरळ मधील पहिला कोरोना रुग्नाच्या घश्यातील सॅम्पल घेऊन संशोधन केले गेले. अजून पर्यंत या व्हायरस चा इलाज शोधण्यात जगातील वैज्ञानिकांना यश आलेले नाही त्यामळे कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात न येणे व सरकारने सांगितलेले उपाय व नियम पाळणे गरजेचे आहे. तरच आपण या कोरोना व्हायरस चा वाढत रोखू शकतो .
लक्षणे :
लक्षणे विकसित होण्यापूर्वी १ ते १४ दिवसांपर्यंत लोक व्हायरसने आजारी असू शकतात. कोरोनाव्हायरस रोगाची सर्वात सामान्य लक्षणे ( कोविड -१९ ) म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. बहुतेक लोक ( सुमारे 80% ) विशेष उपचारांची आवश्यकता न घेता या आजारापासून बरे होतात.अधिक क्वचितच, हा रोग गंभीर आणि अगदी घातक देखील असू शकतो. वृद्ध लोक आणि इतर वैद्यकीय परिस्थिती ( जसे दमा, मधुमेह किंवा हृदय रोग ) असलेले लोक गंभीर आजारी पडण्याची अधिक शक्यता असू शकतात.कोरोना बाधित लक्षणे अनुभवू शकतात :
१. खोकला२. ताप
३. थकवा
४. श्वास घेण्यास त्रास ( गंभीर प्रकरणे )
कोरोनाव्हायरस आजार रोखण्यासाठी सध्या कोणतीही लस नाही (कोविड -१९) आपण स्वत: चे संरक्षण करू शकता आणि इतरांना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करू शकता जर आपण :
विषाणूला दूर ठेवण्यासाठी हे करा :
२) जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येते तेव्हा आपले नाक आणि तोंड एखाद्या डिस्पोजेबल ऊतक किंवा फ्लेक्स्ड कोपर्याने झाकून ठेवा .
३) अस्वस्थ लोकांशी जवळचा संपर्क (1 मीटर किंवा 3 फूट) टाळा .
४) आपण अस्वस्थ वाटत असल्यास घरातच रहा आणि घरातील इतरांपासून स्वत: ला अलग ठेवा .
करू हे अजिबात करू नका :
कोरोना व्हायरस आजार रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही ( सीओव्हीआयडी -१९ ). श्वास घेण्यास मदत करण्यासाठी लोकांना सहाय्यक काळजी घ्यावी लागेल.
स्वत: ची काळजी अशी घ्या :
१) विश्रांती घ्या आणि झोपा.
२) स्वतःला उबदार ठेवा.
३) भरपूर पातळ पदार्थ प्या .
४) खोलीतील ह्युमिडिफायरचा वापर करा किंवा घसा खवखवणे आणि खोकला कमी होण्यास गरम शॉवर घ्या .
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले ? आणि कोरोना वायरस बद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास कॉमेंट करून सांगू शकता तसेच जनजागृतीसाठी हे आर्टिकल तुम्ही सोशल मीडिया वर देखील शेयर करू शकता. तर मित्र मैत्रिणींनो कोणत्याही अफवांना बळी पडू नका व शक्यतो घरीच राहा ,मास्कचा वापर करा. हि पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा . धन्यवाद .
टिप्पणी पोस्ट करा