अनुकूलन || वैचारिक || खासमराठी
#खासमराठी©
डायनासोर पासून सरड्यापर्यंत सर्व प्राण्यांचा अभ्यास तुम्हाला एकच गोष्ट सांगेल ... परिस्थिती नुसार स्वतःत बदल केलात तर आणि तरच तुमचा निभाव लागू शकतो!!
व्यवसाय असेल, आयुष्य असेल , प्रेम असेल, मैत्री असेल, करिअर असेल अथवा काहीही आणि कोणतीही गोष्ट लक्ष देऊन बघा तुम्हाला वेळोवेळी बदल करावेच लागतात!!
खासकरून जगात इतके बदल घडत असताना काही मोठया मोठ्या कंपनी अक्षरशः बंद पडल्या आज ही बंद पडत आहेत... तर काहींनी त्यांचा व्याप आणि यशाचा आलेख प्रचंड विस्तार करत वर वर नेला आणि करतच आहेत.... का? असं दोघांकडे सर्व काही असताना एक जण प्रगती करतो तर एक जण मागे पडतोय... का घडत आहे असं??
विचार करा .... 'योग्य बदल'. एकमेव उत्तर...! ज्यांनी ज्यांनी वेळ काळ परिस्थिती पाहून स्वतःत - त्या त्या क्षेत्रात योग्य बदल केले आहेत ते आज टॉप ला आहेत!
तुम्ही आज कुठेही असाल ... कितीही कष्टप्रद आयुष्य जगत असाल.... कितीही लोकं तुम्हाला नावे ठेवत असतील.... आशेचा कोणताच सूर्य नव्हे साधा किरण देखील तुम्हाला दिसत नसेल तर थोडं धावपळ करणं थांबवा!!
अनुकूलन || वैचारिक || खासमराठी |
स्वतःत काय काय बदल करणे आवश्यक आहे... तुमचे प्रतिस्पर्धी काय काय करत आहेत... त्यांना काय केल्यानंतर असं यश भेटलं आहे याचा अभ्यास करा... त्यांचा द्वेष करण्या ऐवजी त्यांची आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून स्वतःत सुद्धा असे योग्य बदल करा.... !
हे योग्य वेळी केलेले योग्य बदलच तुमचं आयुष्य पुनश्च एकदा यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील...! प्रयत्न करा... अभ्यास करा .... स्पर्धेचं युग आहे.... शक्यतांच जग आहे टिकत रहा....शिकत रहा ...थांबू नका आणि हो खासमराठी सारखंच स्वतःत आणि स्वतःच्या मनस्थिती आणि परिस्थितीत योग्य वेळी अतिशय योग्य असे बदल करा!!
आम्ही स्वतः हे अनुभवत आहोत... आम्ही देखील शिकत आहोत.... 4-5 मित्रांनी मिळून पाहिलेलं एक छोटं स्वप्न रोज नवं नवं यश अनुभवत आहे... एक दिवस नक्कीच आम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न परिपूर्ण होईल... कारण आम्ही योग्य वेळी योग्य बदल करत आहोत...!
आमच्या सोबत तुम्ही सुद्धा असे बदल करा .... काय माहिती 5 वर्षांनंतर तुम्हाला तुमचं आयुष्य आजच्या या एका निर्णयामुळे एका निवडीमुळे एका वेगळ्या उंचीवर जगायला अनुभवायला मिळेल !! 🙂
टीप :- वरील शब्दांकन हे खासमराठी © आहेत !
~ S.J.
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Click here Khasmarathi
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
हे तुम्ही वाचायला हवं :
१) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
२) पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो ?
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
हे तुम्ही वाचायला हवं :
१) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
२) पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो ?
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा