Babita Phogat Statement on Twitter || Tablighi Jamaat || Marathi news


                            भारतामध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये स्टार कुस्तीपटू आणि भाजपा नेता Babita Phogat यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या Tablighi Jamaat आणि Nizamuddin मरकझ बाबत Twitter वर ट्विट केले, आणि त्यांनतर त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. या Tweet नंतरच्या सोशल मीडियावर त्या बर्‍यापैकी ट्रोल होत आहेत. बबीता यांनी आता एक व्हिडिओ शेअर करून आपल्या विरोधकांना उत्तर दिले.

             संपूर्ण जगात चीनपासून एक समस्या उद्भवली ती म्हणजे कोरोना विषाणूचे संक्रमण भारतामध्ये सुद्धा याचे मोठ्या प्रमाणावर आक्रमक होताना दिसत आहे. हे आश्चर्यजनक आहे की १४ हजार जण आता पर्यंत संक्रमित झाले आहेत आणि आतापर्यंत ४८० लोक मरण पावले आहेत.


Babita Phogat Statement on Twitter || Tablighi Jamaat || Marathi news
Babita Phogat Statement on Twitter || Tablighi Jamaat || Marathi news
(सौर्स : गुगल)

         
              Babita Phogat म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी मी ट्विट केले होते. त्यानंतर, काही लोक सोशल मीडियावर चुकीचे संदेश देऊ लागले, शिवीगाळ करीत आणि कॉल करून मारण्याची धमकी देत होते. मी त्यांना सांगत आहे की तुमचे कान उघडा आणि ऐका आणि तुमच्या डोक्यात बसवून घ्या. मी जायरा वसीम नाही , ज्या  तुमच्या धमक्या ऐकून घरी बसेन. मी  Babita Phogat आहे, देशासाठी लढत आहे आणि यापुढेही झगडत रहाणार आहे.

           Babita Phogat पुढे म्हणालया की, ज्यांना सत्य ऐकण्यास त्रास होत आहे, त्या लोकांनी आणखी एक गोष्ट ऐकली पाहिजे की त्या नेहमी सत्य बोलतील आणि सत्य लिहित राहतील. तुम्हाला सत्य ऐकायला आवडत नसेल तर एकतर तुमची सवय बदला किंवा सत्य ऐकण्याची सवय लावून घ्या. Babita Phogat यांनी लिहिलेल्या  Tweet मध्ये कोरोना व्हायरस ही भारताच्या नंबर दोनची एक मोठी समस्या आहे तर जमाती अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत, असे म्हटल आहे.


           Twitter वरील Tweet ला प्रत्युत्तर देताना स्वरा भास्कर म्हणाल्या कि , "बबीता जी, ही आकडेवारीही तपासून पाहा. या लाखो भाविकांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे का ? कृपया यावरही भाष्य करा ! आणि दिल्ली पोलिसांनी हा कार्यक्रम करण्यास तबलीगी जमातीला परवानगी का दिली . हा प्रश्न उपस्थित करा !  तरी आम्ही तुमचे चाहते आहोतच . "

            Babita Phogat यांच्या कारकीर्दीबद्दल बोलले तर त्यांनी देशासाठी २०१४ साली राष्ट्रकुल खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. बबिता या नुकत्याच भारतीय जनता पक्षात सामील झाल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट फोगट बहिणींवर बनला होता.


          मित्रानो हि पोस्ट  तुम्ही तुमच्या प्रियजणांशी शेयर करू शकता आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगू शकता . खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असते . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने