रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ? जाणून घ्या ।। आरोग्यम । खासमराठी
रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ? जाणून घ्या ।। आरोग्यम । खासमराठी |
भारतच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे . असे होत असताना खूप जन मृत्युमुखी पडत आहेत आणि काही जण ठीक होत आहेत आता तम्ही विचाराल कि या रोगावर औषधच नाही तर ते कसे बरे होत आहेत. तर तुम्हाला सांगावस वाटत कि ते बरे होण्याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे त्यांची इम्युनिटी सिस्टिममध्ये झालेली सुधारणा . तुमच्या शरीरातील इम्युनिटी सिस्टिम जितकी ताकतवर असते तेवढे तुम्ही निरोगी असता . (Rogpratikarak-Shakti-kashi-Vadhvavi)
इम्युनिटीला मराठीमध्ये रोग प्रतिकारशक्ती म्हणतात. हे शरीरास कोणत्याही प्रकारच्या सूक्ष्मजीवांविरूद्ध (रोगास कारणीभूत असणारे जीवाणू, विषाणू इ.) विरूद्ध लढा देण्याची क्षमता देते, यामुळे आपल्या शरीरास रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती मिळते.बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. या आजारपणास कारण बॉडी इम्युनिटी चांगली नसणे हे असते.
खाद्यपदार्थ शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ताजे फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात आणि शरीराला विविध आजारांपासून वाचवते. संशोधकांचा असा विश्वास आहे की आहार, व्यायाम, वय, मानसिक ताण आणि इतर कारणांवर देखील रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो, त्याव्यतिरिक्त प्रतिकारशक्ती वाढविण्याचा एक सामान्य स्वस्थ जीवनशैली हा एक चांगला मार्ग आहे.
या लेखाद्वारे आपण आज रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याविषयी जाणून घेणार आहोत .
सर्वप्रथम प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, आरोग्यदायी जीवनशैली निवडावी लागेल . रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आरोग्याशी संबंधित काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे. प्रतिकारशक्ती बरोबरच आपल्या शरीरातील प्रत्येक भाग खालील सूचनांच्या मदतीने अगदी प्रभावी मार्गाने कार्य करण्यास सुरवात करेल.
या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे :
१) पौष्टिक भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि कमी संतृप्त चरबीयुक्त आहार घ्या.
२)आपले वजन संतुलित ठेवा.
३) आपण अल्कोहोल पित असाल तर कमीतकमी ते सेवन करा.
४) जेवण करण्यापूर्वी आपले हात धुवा.
५) आपली वैद्यकीय तपासणी नियमितपणे करा.
६) धूम्रपान करू नका.
७) दररोज व्यायाम करा.
८) आपला रक्तदाब सामान्य ठेवा.
९) जेवण बनवण्यापूर्वी हात धुवा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ नये.
१०) पुरेशी झोप घे फायद्याचे आहे .
रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हे करा :
१) व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई एक प्रकारचा शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो दाह ( जळजळ ) प्रतिबंधित करते तसेच शरीरातील लढणार्या पेशींमध्ये वाढ करते . उदाहरण - भोपळा, गाजर, पिवळा आणि लाल कॅप्सिकम, गोड बटाटा अशा भाज्या व फळे - आंबा, जर्दाळू, संत्रा, पपई, खरबूज, द्राक्षे यांचे सेवन करावे.
रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ? जाणून घ्या ।। आरोग्यम । खासमराठी |
२) आपल्या संतुलित आहारासाठी संपूर्ण धान्य, सोललेली डाळ, रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. दूध किंवा दुधाचे पदार्थ नियमित अंतराने घेतले पाहिजेत. बदाम, अक्रोड, शेंगदाणे आहारात वापरा तसेच दररोज 2-3 लिटर पाणी प्यावे .
३) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसूण आहारात वापरला पाहिजे . लसूण वापरल्याने अल्सर आणि कर्करोग सारख्या आजारांपासून बचाव होतो.
४) ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, म्हणून याचा उपयोग शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, वजन आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जातो.
५) हळदमध्ये असे गुणधर्म आहेत जे कर्करोगापासून अल्झायमर पर्यंतच्या गंभीर आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, हळदीतील कर्क्युमिन घटक शरीराच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
६) निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे हृदय, रक्तदाब, शरीराचे वजन आणि विविध प्रकारचे रोग, त्याविरुद्ध लढायला मदत करते . उदाहरण : सायकल चालवणे , नृत्य , योग , खेळ खेळणे .
७) नवजात बालकांसाठी आईचे दुध हे रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी रामबाण आहे. जे बालकास एलर्जी, ताप, जुलाब आणि इन्फेक्शन यापासून बचाव करण्यास मदत करते .
८) शरीरास इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी विटामिन सी अत्यंत फायदेशीर असते. लिंबू आणि आवळा विटामिन सी ने परिपूर्ण भरलेले आहेत. त्यामुळे यांचे नियमित सेवन करावे.
९) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही सेवन करावे , ते पचन शक्ती व्यवस्थित करण्यासाठी देखील महत्वाचे ठरते.
१०) इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी ड्राय फ्रुट्स उपयोगी ठरतात यामध्ये फाइबर, जिंक, मिनरल्स आणि लोह असते.
मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? आणि पुढचे आर्टिकल तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका . हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता. खासमराठी नेहमीच तुमच्यासाठी रोचक माहिती घेऊन येत असते. धन्यवाद .
टिप्पणी पोस्ट करा