रोहित  शर्मा द्वी शतकांचा बादशाह ।। rohit sharma birthday special ।।व्यक्तिविशेष ।। खासमराठी 


जर्सी नंबर ४५ , रो- हिट शर्मा द्वी शतकांचा बादशाह ।। व्यक्तिविशेष ।। खासमराठी
रोहित शर्मा यांचा ३० एप्रिल रोजी वाढदिवस ( Happy Birthday Rohit Sharma )

          जर्सीचा रंग निळा , जर्सीचा नंबर ४५ , धडधाकट शरीरयष्टी , तो हिट मॅन नावाने ओळखला जातो  , कशाचाही विचार न करता बिनधास्त खेळतो तो , आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे , हा खेळला कि टीम मॅच जिंकते हे जणू समीकरण होऊन गेलेय. वरील हे सर्व वर्णन करत असताना आपल्या समोर एक वक्तिमत्त्व उभं राहत ते म्हणजे रोहित शर्मा (rohit sharma)  " हिट - मॅन " रोहित बॅटिंग करत असताना जर एखादा उसळता चेंडू त्याने पूल केला तर समजायचे चेंडू मैदानाबाहेर असणार... पूल करणे हा त्याचा आवडला शॉट ( टोला ) आहे. रोहितसमोर बडे बडे नावाजलेले क्रिकेटपटू सुद्धा ओव्हर करायला घाबरतात आणि तो जर खेळण्याचा लयीत असला तर सांगायलाच नको अख्या टीमची संख्या रन्स तो एकटा उभारून देतो रन्स चा डोंगर... !!  सर्व फॉरमॅट मध्ये सर्वात जास्त षटकार  ( sixes ) मारणाऱ्या रोहित शर्माचा ३० एप्रिल रोजी वाढदिवस ( Happy Birthday Rohit Sharma ).... !!


          रोहितचे संपूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा ( Rohit Gurunath Sharma )असून त्याचा जन्म ३० एप्रिल, १९८७ (वय: ३६) रोजी बनसोद, नागपुर, महाराष्ट्र येथे झाला . त्याची आई पूर्णिमा शर्मा या विशाखापट्टणमच्या होत्या , त्यामुळे त्यांना तेलगू भाषाही माहित आहे. त्यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे एका स्टोअरहाऊस परिवहन कंपनीत काळजीवाहू Caretaker म्हणून काम करायचे.  परंतु घरगुती खर्चासह त्यांचे शिक्षण आणि शिक्षणाची काळजी घेण्यासाठी पुरेसे उत्पन्न नव्हते. म्हणूनच रोहित शर्मा हे लहानपणीच आजी आजोबा आणि काका यांच्यासह बोरिवलीमध्ये राहत होते. सुट्यांमध्ये तो त्याच्या पालकांना भेटायचा, जे डोमविबली येथे एकाच खोलीत राहत होते. त्यांना एक छोटा भाऊही आहे. विशाल शर्मा, जो त्याच्या पालकांसमवेत राहत होता. रोहित लहानपणा पासूनच क्रिकेटचे चाहते होते.


          लोक त्याला सामना खेळण्यासाठी बोलवायचे. लोकांच्या घरातील खिडकीच्या काचा त्यांच्या शॉट्सने फोडल्यामुळे ते देखील प्रसिद्ध होते. एकदा, याबद्दल पोलिसांत तक्रार सुद्धा गेली होती . तथापि, क्रिकेटचा प्रेमी रोहित शर्मा आपल्या काकाच्या सहकार्याने 1999 मध्ये क्रिकेट कॅम्पमध्ये सामील झाला. तेथील प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांना शाळा बदलून स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत जाण्यास सांगितले. तेथे ते स्वत: प्रशिक्षक होते आणि उत्तम क्रिकेट सुविधा देखील तेथे उपस्थित होती . वयाच्या 20 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली, विश्लेषकांनी रोहितची फलंदाजीची कौशल्ये पाहिल्यानंतर आणि त्यानंतर लवकरच त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. 23 जून 2007 रोजी तो आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दिसला. 2013 मध्ये तो भारतीय एकदिवसीय संघाचा सलामीचा फलंदाज ठरला आणि तेव्हापासून तो सलामीवीर फलंदाज म्हणून कामगिरी करत आहे.


          rohit sharma वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. तर २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके ठोकली . त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१३ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १७७ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले, व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

जर्सी नंबर ४५ , रो- हिट शर्मा द्वी शतकांचा बादशाह ।। व्यक्तिविशेष ।। खासमराठी
रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत. ( सौर्स - ट्विटर )

          रोहितने १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण केल्या.तसेच रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत जसे २०९ , २६४ , २०८*. आणि २०-२० मध्ये 4 शतके केली आहेत. अनेक विक्रम त्याचा नावावर आहेत ,त्याने २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी२० मध्ये ३५ बाँल मध्ये जलद शतक ठोकणारा तो  जगात दुसरा क्रिकेटपटू ठरला.रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे.आणि रोहित शर्मा हा महाराष्ट्रीयन आहे याचा महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे.रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.

 rohit sharma record 



          रोहित शर्माने २००८ च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्ससाठी ७५०,००० अमेरिकन डॉलर्ससाठी प्रथम करार केला होता. २००८ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू होता आणि त्याने ३६.६२ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या. यामुळे 2006 च्या आयपीएलमध्ये त्याला काही सामन्यांमध्ये केशरी टोपी ( Orange Cap ) घालण्याची संधीही मिळाली. 

 Rohit Sharma as  a captain record 


FORMAT MATCHES WON
TEST 6 4
ODI 26 19
T20I 51 39
IPL 149 81
२०११ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये रिकी पॉन्टिंगने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे . रोहित 200८ ते 2010 या काळात डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता, तर २०११ पासून तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असून २०१३ , २०१५ , २०१७ आणि २०१९ ,२०२० मध्ये पाच  वेळा  संघ जिंकला व आपलं नाव आयपीएल ट्रॉफी वर कोरले. याशिवाय रोहितच्या नेतृत्वात दोनदा चॅम्पियन्स लीग टी -२० जिंकसचदेह  सोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगी हि आहे तीच नाव समायरा शर्मा.





हे आर्टिकल तुम्ही वाचायला हव : विराट कोहली | व्यक्तीविशेष  || खासमराठी


           


खालील विडिओ तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प स्टेटस ला ठेवू शकता . 



रोहित शर्माच्या ३४ व्या वाढदिवशी, चला त्याच्या कारकिर्दीतील मनोरंजक आकडेवारी आपण पाहूयात :



१) रोहित शर्मा विश्वचषक इतिहासातील पहिला खेळाडू आहे ज्याने एकाच स्पर्धेत 5 शतके ठोकली आहेत.


२) इंग्लंडमध्ये सलग तीन वनडे शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू आहे. 2019 वर्ल्ड कपमधील भारताच्या शेवटच्या तीन लीग सामन्यात त्याने शतके  झळकावली .


३) कसोटी क्रिकेटमध्ये षटकारासह दुहेरी शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रांची कसोटी दरम्यान त्याने हि कामगिरी केली होती .


४) रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 208 धावा केल्या. कर्णधाराने दुहेरी शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. तत्पूर्वी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधार म्हणून दुहेरी शतक झळकावले.


५) कसोटी मालिकेत रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. गेल्या वर्षी ( २०१९ )दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एकूण 19 षटकार लगावले होते.


६) तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा भारतासाठी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. त्याने कसोटीत 13, एकदिवसीय सामन्यात 16 आणि टी -20 आंतरराष्ट्रीय डावात 10 षटकार लगावले आहेत.


वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्स संघाने आपल्या कर्णधार " रोहित शर्मा " यांना ट्विटर वर दिलेल्या शुभेच्या . 




          मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने