जीवनतंत्र - " स्वतःची ओळख " ।। वैचारिक ।। खासमराठी 


जीवनतंत्र - " स्वतःची ओळख " ।। वैचारिक ।। खासमराठी 

#खासमराठी_उपदेश


[ विशीतल्या तरुणांनासाठी लिहित असलेल्या या मालिकेला " जीवनतंत्र " असं नाव देत आहे जेणेकरून प्रत्येक भाग तुम्हाला वाचायला सोप्पा जाईल ! ]

By #SJ

#जीवनतंत्र -

         १. " स्वतःची ओळख "


          मोठमोठ्या लोकांच्या ओळखी सांगणारे तुम्हाला अनेक जण भेटतील मात्र, स्वतःची ओळख असणारे फार कमी लोकं असतात ! होय अगदी लाखात एकच !!


          जे पण माझे प्रिय अनोळखी मित्र मैत्रिणी असतील त्यांना माझा पहिला उपदेश म्हणा, सल्ला माना अथवा सांगणं समजा हेच असेल की सर्वप्रथम स्वतःला ओळखा !


          तुम्ही 9 वीत असाल अथवा 12 वीत शिक्षकवृंद तुम्हाला जी काही ओळख देत असतील मग ते तुम्ही 'ढ', हुशार, अशी असेल अथवा मग मित्र परिवार तुम्हाला जी ओळख देत असेल ती "जिगरी", वैरी, गैरी, अथवा मग जी ओळख तुम्हाला घरची मंडळी देत असतील , "प्रेमळ", खडूस, वकटं, चांगला , etc etc.


          ही सगळी विशेषण म्हणजे त्यांच्या नजरेत आपण कळत नकळत निर्माण केलेली आपलीच ओळख असते.... पण मग स्वतःच्या नजरेत तुम्ही कसे आहात ??


          आपल्या सर्व कांड कर्माचे साक्षीदार आपण स्वतःच असतोत त्यावरून जर तुम्ही स्वतःची ओळख समजून घेत असाल तर मात्र तुम्ही स्वतःला फक्त असच एखादं दुसरं विशेषण लावून घ्याल...मी चांगला आहे मी वाईट आहे....मी अभ्यासात ढ आहे मी अतिहुशार आहे वगैरे वगैरे.....जी चूक लाखभर लोकं करतात ती चूक तुम्ही करू नका !!


तुम्ही मठ्ठ , हुशार, चांगल्या वाईट, सुंदर, खडूस इत्यादी पेक्षा फार फार पल्याडचे कोणीतरी आहात....


तुम्ही आज ठरवलंत तर कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीच्या नजरेत कित्येक पट आजच्या पेक्षा चांगले बनू शकतात अथवा वाईट सुद्धा.... मात्र त्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखणं अतिशय गरजेचं आहे !!


          स्वतःची ओळख जेव्हा आणि जितकी प्रामाणिक पणे तुम्ही करून घ्याल तेव्हा आणि तितक्याच प्रमाणात तुम्ही तुम्हाला हवी तशी हवी असेल तेव्हा तुमची ओळख बनवू शकता!


        बाकी सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगणं हेच असेल की, सर्वप्रथम स्वतःला ओळखा....तुम्ही जे कोणी आहात जसे कुणी आहात जिथेपण असाल अगदी आहात तसे स्वतःला विचारा "नेमकं, मी आहे तरी कोण ?"


          इतरांच्या नजरेचा काडीचाही विचार न करता स्वतःला विचारा मी आहे तरी कोण ?


          जेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल तेव्हा तो क्षण खरच "युरेका" Moment असेल....


          तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही आजपर्यंत स्वतःला जे कुणी समजत होतात ती फक्त एका बाहेरच्या जगाची ओळख आहे.... तुमच्या नावापासून ते जाती धर्म गाव सगळं काही फक्त बाहेरची ओळख आहे..तुम्ही या सर्वांपेक्षा प्रचंड वेगळे आहात !!


          जेव्हा तुम्हाला तुम्ही कोण आहात हे जाणवेल तेव्हा तुम्हाला जे बनायचं आहे ते  बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही....म्हणून सर्वप्रथम स्वतःला ओळखा स्वतःसोबत मैत्री करा स्वतः मध्ये काय चांगलं काय वाईट आहे याचा शोध घ्या.....


आज आपल्या प्रवासाचा पहिला दिवस आहे म्हणून इतकच !!


पुढचा भाग " बल बुद्धी " वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 


 मित्रानो हि पोस्ट आवडली असल्यास तुम्ही ती  प्रिय जणांशी शेयर करू शकता आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगू शकता . खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असते . 


~ लेखक : S.J.

2 टिप्पण्या

  1. सर खालील लिंक वर क्लिक करा ,
    तुम्हाला पुढचा लेख भेटेल किंवा वैचारिक विभागात पाहू शकता
    https://tinyurl.com/ybmfnrtu

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने