मोकळ्या वेळेत बनवा चिमण्यांसाठी घरटे । Marathi Special ।। खास मराठी 

मोकळ्या वेळात बनवा चिमण्यांसाठी घरटे । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी
मोकळ्या वेळात बनवा चिमण्यांसाठी घरटे । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी 

          चिमणी सर्वात लहान आणि सुंदर पक्षी आहे. जुन्या काळात बहुतेकदा तो झाडे आणि घरांच्या छतावर बसलेला आढळयांचा , परंतु आता तो क्वचितच कुठेही दिसतो. झाडे तोडल्यामुळे आणि हानिकारक कीटकनाशकांमुळे , वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या प्रजाती अदृश्य होत आहेत. चिमणीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते .


           लोकडाऊन काळात मी चिमण्यांसाठी घरटी बनवली. मी नेहमीच चिमण्यांसाठी घरावर तांदूळ किंवा चिरमुरे भिजवून ठेवतो . तसेच आमच्या घरासमोरच्या अंगणात विविध प्रकारची झाडे लावली आहेत उदा कलमी आंबा , अंजीर ,पेरू,लिंबूचे झाड व फुलझाडे आहेत . नारळाच्या करवंटीमध्ये थोडे तांदूळ घालून ते लिंबूच्या झाडाच्या फांदीला लट्कवतो तसेच प्लॅस्टिकच्या बिनकामी डब्यात पाणी भरून चिमण्यांना पिता येईल अशा ठिकाणी ठेवतो.


           काही दिवसांपूर्वी आमच्या घराच्या अंगणातील शेडचा पोगर मध्ये एक चिमणी घर करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा मला सुचलं कि आपण यांच्यासाठी का करू शकतो तर मी एक मोकळा खोका (साधारण चप्पल ठेवतात तो ) तो घेतला. आणि बनवू लागलो चिमण्यांसाठी घरटे. असे घरटे तुम्ही घरीच बनवू शकता. कसे बनवायचे हे खाली सांगेन.

साहित्य : 

एक मोकळा खोका , 

खाकी किंवा पांढरा रंग सोडून कोणता हि रंगाचा कागद  , 

गम किंवा फेविकॉल , 

कात्री , 

पेन्सिल आणि कटर इत्यादी . 


कृती : 


१) एक रिकामा आयताकृती खोका घ्या . 

२) तो खोका वरचा भाग सोडून , जिथून जिथून निघू शकतो त्या ठिकाणी चिकट पट्टीने पॅक बंद करा . 

३) खाकी रंगाचा कागद संपूर्ण खोक्याला फेविकॉल ने चिटकवा . 

४) इथे एक गोष्ट लक्षात ठेवा पांढरा कागद वापरू नका कारण चिमण्या चमक असणाऱ्या गोष्टीकडे कधीच आकर्षित होत नाहीत. त्यामुळे पांढरा रंगाचा कागद वापरू नका . 

५) आयताकृती खोक्याला ४ सेमी ची त्रिज्या घेऊन एका बाजूला गोल आखा व कात्रीने अथवा कटर ने वर्तुळ कापा.

६) आता वरचा पॅक बंद न केलेला भाग चिटकवून बंद करा. 

आता आपलं काम झालेलं आहे. 

मोकळ्या वेळात बनवा चिमण्यांसाठी घरटे । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी 

          आता आपल्याला असं ठिकाण शोधायचं आहे जिथे चिमण्या किंवा पक्षी येतात , त्या ठिकाणी हा खोका लावावा. पहिल्या एक दोन दिवस चिमण्या त्या खोक्या जवळून फिरतील त्यांना जेव्हा सुरक्षित वाटेल तेव्हाच त्या खोक्याला घर समजतील.


           सध्या तरी असे दोन तीन घरटी मी बनवली आहेत आणि एका घरट्यात काळी चिमणी राहते तर दुसऱ्या घरट्यात पांढरी चिमणी राहते , छायाचित्र समाविष्ट केले आहे . तसेच मी चिमण्यांसाठी फीडर पण बनवले आहेत.


          कस आहे ना मित्रांनो , आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो . निसर्गाचा समतोल राखला गेला तरच मानवजातीसाठी फायदेशीर आहे. नाहीतर आता आपत्ती होताना दिसत आहेत. मुळात आता चिमणी सारखा इवलासा जीव दुर्मिळ होत आहे या परिस्थितीत त्यांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने मी हे सर्व करत असतो, मित्रानो एक हात पुढे घ्या आणि तुम्ही सुद्धा बनवा असे चिमण्यांसाठी घरटे. तुम्ही बनवलेल्या घरट्यात चिमणी घर करेल ना ते पाहून तुमच्या मनाला खूप समाधान व आनंद मिळेल याची मी खात्री देतो.


          मित्र आणि मैत्रिणींनो हि कलाकृती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा . खासमराठी नेहमीच तुमच्यासाठी रोचक माहिती घेऊन येत असते. धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने