जीवनतंत्र - " बल ( Power ) " ।। वैचारिक ।। खासमराठी 

जीवनतंत्र - " बल ( Power ) " ।। वैचारिक ।। खासमराठी 

#जीवनतंत्र - 3


               ३. बल ( Power )


       " शक्ती जीवन है , निर्बलता मृत्यू है ! विस्तार जीवन है, संकुचन मृत्यू है ! प्रेम जीवन है, द्वेष मृत्यू !"

           
          अशी स्वामी विवेकानंद यांची एक छानशी Quote आहे ... !


          पहिल्या भागात झालेल्या  स्वतःची ओळख या आर्टिकल नंतर आपण दुसऱ्या भागात बलबुद्धी बद्दल थोडासा Intro घेतलेला , आता आपण तिसऱ्या भागात POWER बद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी समजून घेणार आहोत...!


          तस मी सांगत असलेल्या बऱ्याच गोष्टी विमानाखालून जाऊ लागल्याच तर निदान दोन ते तीन वेळा वाचण्याचे कष्ट नक्की घ्या ! इच्छा असेल तरच हं !! असो !


          मित्रांनो, तुम्हाला कोणी कधी सांगितले असेल अथवा नसेल, माहिती असेल अथवा नसेल, मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवून देऊ शकतो की तुम्ही तुमच्या Highest Possible Strength ला कधीच ओळखू शकत नाहीत !!

Click - Here : Hysterical_strength


          वरील link वरील फक्त Examples जरी read केले तरी समजून जाताल की त्या Normal असणाऱ्या व्यक्तींमध्ये अचानक आपल्या मुलांना वाचवण्यासाठी अख्खी कार उचलून धरण्याची ताकद कुठून येते ??


          मग त्यांच्यात इतकी ताकद कुठेतरी नक्की होतीच ना ??


          खरं तर आपल्यात जितकी क्षमता नैसर्गिकरित्या आहे त्याची ना आपल्याला शाळेत  जाणीव करून दिली जाते न बाहेरील जगात, बाकी आपल्याला ती कधी समजली तरी कळतंय पण वळत नाही असेच होत असतं !!


          नेमक यामुळेच वाघ असून देखील आपण पूर्ण आयुष्य मेंढी बनून जगण्यात धन्यता मानत असतोत !!


          ताकद असेल तर सगळं काही मिळवता येतं .... फक्त या ताकदीला बुद्धीची जोड देता यायला हवी !! बुद्धी बद्दल नंतर पाहणारच आहोत सध्या फक्त ताकदीबद्दल सांगतो....


        सद्गुरू नावाचे एक योगी आहेत त्यांचे बरेच video आणि तत्सम material Internet वर उपलब्ध आहे ... असच चुकून एक video पाहिला होता Inner Engineering  असं नाव असलेला तो खूप आवडला ते थोडंस माझ्या भाषेत सांगतो -


"Engineering शब्द का मूल अर्थ क्या है ? किसी भी चीज को संभव बनाना .... हम उसे सबसे efficient तरिके से बनायेंगे.... !"


          म्हणजे एखादी गोष्ट कमीत कमी खर्च कमीत कमी साधनां-संपत्तीचा वापर करून कमीत कमी वेळेत करत असतोत तेव्हा ती इंजिनीरिंग चा एक शानदार नमुना असेल !


    मग आपलं शरीर तर या भूतलावरील सर्वात अत्याधुनिक सर्वात प्रगत अशी मशीन नाहीये का ?


        मग जर आपण 12 तास काम केल्यानंतर 12 तास झोपेत रहात असूत तर हा प्रकार एखादी गाडी 12 तास प्रवास केल्यानंतर 12 तास गॅरेज मध्ये पडून राहात असल्या सारखी नाहीये का बरं ?


        तरीपण आजचं आपलं विज्ञान आपल्याला हे सांगत आहे की सामान्य माणसाला 8 ते 10 तास झोपेची गरज असते..... कुठेतरी विचार करून बघा खरच कुठेना कुठेतरी चुकत आहे !!


       ताकदीच्या बाबतीत देखील आपल्या कळत नकळत आपल्या मनात अशाच चुकीच्या अवधारणा भरल्या गेल्या आहेत....सर्वप्रथम त्या दूर करा !!


        तुम्ही किशोर वयीन असाल अथवा तरुण आहात  तर सर्वप्रथम तुम्ही तुमची शरीर नावाची मशीन बेहतर से बेहतरीन बनवण्याकडे लक्ष द्या.... 6 पॅक ... झिरो फिगर असल्या yz पणापेक्षा ' निरोगीपणा '.... याकडे लक्ष द्या....!


उगी चार पोरांमध्ये मारामाऱ्या आणि पोरींना इम्प्रेस करण्यासाठी बॉडी बिल्डिंग करत असाल तर कुठेतरी चुकताय भावांनो ....     

         आयुष्य आपलं आहे तर इतरांना दाखवण्या पेक्षा स्वतःच्या नजरेत भरण्यासाठी, भरभरून जगण्यासाठी हवं ते करा....बाकी तयारी सर्वच गोष्टींची ठेवायची इतकंच !!


         मूळ विषयाकडे परत जाऊ... शक्य तितके , ताकदवान बना, बलवान बना....


          ताकदीचे पण प्रकार असतात... तर फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक ताकद देखील तितकीच महत्त्वाची आहे... किंबहुना मानसिक ताकदीचेच पारडे नेहमी जड असते !


आता या दोन्ही प्रकारात ताकदवान बनायचं तरी कसं ??


          लोकांसारखं उठा व्यायाम करा असे सांगण्यापेक्षा मी एक छोटा प्रयोग सांगतो .... रोज सकाळी दुपारी केव्हापण एक विशिष्ट वेळ ठरवा सोबत एक मित्र/मैत्रीण  ठेवा .... एक विशिष्ट वेगाने धावत धावत एक विशिष्ट अंतर पार करा.... जिथे दम लागेल आता आपण यापुढे धावू शकत नाही असं वाटेल ती नोंद एका कागदावर घ्या......


१ दिवस नव्हे तर चांगला 15-30 दिवस हा उपक्रम करा..... तुम्हाला 31 व्या दिवशी स्पष्ट जाणवेल की पहिल्या दिवशी पेक्षा तुमची ताकद प्रचंड प्रमाणात वाढली आहे....


          याचा अर्थ अथवा हे सांगण्याचं तात्पर्य काय ? तर तुम्ही आयुष्यात कधीपण तुमची ताकद वाढवू शकतात.... जितका जास्त सराव कराल तितकी जास्त ताकद मिळत जाईल.... जितका जास्त आळशी पणा कराल तितक्याच प्रमाणात ही ताकद कमी कमी होत जाईल.... !!


           मग आजपासून तुमच्या मशिनला अधिक ताकदवान बनवायला सुरुवात करा.... खासकरून ज्या ज्या कृती तुम्हाला दररोज कराव्या लागतात .... मग चालणे असेल बोलणे असेल... अभ्यास करणे असेल .... गाणे म्हणणे असेल.... प्रत्येक कृती साठी तुमच्या शरीराला अधिकाअधिक सक्षम करत चला..... ही छोटीशी गुंतवणूक जोपर्यंत जगाल तोपर्यंत फक्त नफा देणारी ठरेल ....!


बाकी .... बुद्धी बद्दल पुढच्या आर्टिकलमध्ये बोलू  :)


मित्रानो हि पोस्ट आवडली असल्यास तुम्ही ती  प्रिय जणांशी शेयर करू शकता आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगू शकता . खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असते . 


~ लेखक : S.J.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने