Mobile Slow झालाय ? काम करत नाही ? || SD Maid System Cleaning Tool || Technology
मित्रानो आज आपण पाहणार आहोत आपल्या अँड्रॉइड मोबाईल ला कसे क्लीन करायचे , म्हणजेच आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वारंवार नवीन नवीन सॉफ्टवेअर अँप्लिकेशन डाउनलोड करत असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज नसते तेव्हा आपण त्याला डिलीट किंवा अनइंस्टॉल सुद्धा करतो. पण जेव्हा आपण एखाद्या अँप्लिकेशन ला डिलीट किंवा अनइंस्टॉल करतो तेव्हा त्याचे खूप सारे फाइल्स असतात जे तुमच्या मोबाइलमध्ये साचून राहतात आणि हेच मूळ कारण आहे तुमच्या Android mobile slow होण्याचे. तर मित्र आणि मैत्रिणींनो आम्ही तुमच्यासाठी असं एक अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत . SD Maid System Cleaning Tool जे तुमच्या Mobile मधील अनावश्यक फाइल्स ( कचराच म्हणावं लागेल ) डिलीट किंवा इरेज करू शकतो . त्यासाठी तुम्हाला हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचावं लागेल तरच तुमच्या लक्षात येईल कि कशाप्रकारे हे अँप्लिकेशन काम करते आणि तुम्हाला ते वापरन्यास सोपे जाईल.
Mobile Slow झालाय ? काम करत नाही ? || SD Maid System Cleaning Tool || Technology |
मोबाईल क्लिनर - Mobile Cleaner अँप चे नाव आहे एसडी मेड - SD Maid system cleaning tool , जे तुमच्या मोबाईलची कार्य करण्याची क्षमता व गती वाढवेल तसेच तुमच्या मोबाईल मधील अनावश्यक साचलेल्या फाइल्स (कचरा) साफ करेल व मोबाइल मधील मेमरीची स्पेस (जागा) वाढवेल. या अँप्लिकेशन मुळे मोबाईलचे हँग होणे तसेच मेमरी फुल होणे यांसारख्या अडचणी निघून जातील. हे मोबाइल अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले - Google Play store स्टोअरमध्ये जाऊन एसडी मेड - SD Maid सर्च करावे लागेल चित्रात दाखवल्याप्रमाणे ते दिसेल तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहे किंवा या आर्टिकल च्या शेवटी त्या अँप्लिकेशन ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ते तुम्ही डाउनलोड - Download करू शकता.
हे आर्टिकल तुम्ही वाचल पाहिजे मोबाईल फोनच्या बॅटरी का फुगतात ?
एसडी मेड सिस्टिम क्लिनिंग टूल हे अँप डाउनलोड केल्यानंतर ते उघडा. (Open करा) तुम्हाला चित्रात दाखवल्या प्रमाणे एक फलक ( Interface )दिसेल. डावीकडे कोपऱ्यात तीन रेघा दिसतील हे या अँप चे सेटिंग आहे. त्यामध्ये सर्व सेटिंग आहे जसे एक्सप्लोरर ( Explorer ) ,सर्चर ( Searcher ) ,अँप कंट्रोल ( App Control).... इत्यादी . या अँप्लिकेशन च्या दोन खासगोष्ठी आहेत ज्या या अँप्लिकेशन ला बेस्ट बनवतात. हे अँप्लिकेशन दुसऱ्या क्लिनर अप्लिकेशन पेक्षा वेगळे आहे जसे कि अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर वर तुम्हाला खूप सारे क्लीनर अँप भेटतील जे डाउनलोड करून तुम्ही फाइल्स डिलीट करू शकता पण तुम्हाला सांगावस वाटत कि असे खुपच कमी अँप्स आहेत जे तुम्हाला कॉर्पसेफाईंडर - CorpseFinder फिचर देतात. हे एक असे फिचर आहे जे तुम्हाला तुमच्या मोबाइल मधील साचलेला अप्लिकेशन डेटा शोधून साफ करण्यात मदत करते जे अप्लिकेशन तुमच्या मोबाइल मधून डिलीट केले गेले आहेत.
कॉर्पसेफाईंडर ( CorpseFinder ) :
कॉर्पसेफाईंडर ( CorpseFinder ) |
कॉर्पसेफाईंडर ( CorpseFinder ) या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करावयाचे आहे , ते केल्यानंतर एक नवा फलक उघडेल ज्यामध्ये स्कॅन ( Scan ) आहे, हे अँप्लिकेशन स्कॅन करायच्या आधी ते तुमच्या कडून परमिशन मागते त्यासाठी आपल्याला नेक्स्ट व ऑलोव करावे लागते कारण ते तुमच्या मोबाईल फोन मधील मीडिया ऍक्सेस करू शकेल. त्यासाठी नेक्स्ट व ऑलॉव करा. ते केल्यानंतर अँप्स विथ युसेज ( Apps with Usage ) फिचर सुरु होईल जे तुमच्या मोबाईल मध्ये कोण कोणते अँप्स व गोष्टी आहेत हे सांगेल. त्यामधील एसडी मेड ऑप्शन वर क्लीक करून परमिशन द्या म्हणजे ते ऑफ असेल त्याला ऑन करा. हे सर्व केल्यानंतर पाठीमागे या ( back करा ) सेटअप असेल त्याला डन ( Done ) करा. आता हे अँप्लिकेशन तुमच्या मोबाईल मधील एस डी कार्ड (SD Card) ला सर्च करेल तसेच तुमच्या मोबाईल मधील अनावश्यक फाइल्स व फोल्डर्स ला सर्च करेल जे तुमच्या मोबाईल मधील जागा घेत आहेत. हि क्रिया पूर्ण झाल्यानंतर अँप तुम्हाला एकूण साचलेला डेटा दाखवेल जो तुम्हाला डिलीट बटन दाबायचे आहे ज्यामुळे डेटा फाइल्स साफ ( इरेज ) होतील .
डुप्लिकेट्स ( Duplicates ) :
या अँप्लिकेशन चे दुसरे खास फिचर म्हणजे " डुप्लिकेट्स ( Duplicates )" हे फिचर तुमच्या मोबाइल मधील असलेल्या डुप्लिकेट्स म्हणजेच एकच फाईल किंवा इमेजेस , विडिओ , ऑडिओ दोन तीन ठिकाणी जमून राहतात , उदाहरणार्थ व्हाट्सअँप वरून एकच इमेज वारंवार पाठवली जाते त्यामुळे तुमच्या मोबाइलची जागा विनाकारण भरत राहते. हे डुप्लिकेट फिचर ह्या अश्या सर्व फाइल्स शोधून डिलीट करावयास मदत करते ज्यामुळे तुमच्या मोबाईल मधील जागा फ्री होते. हे दोन फिचर तुमच्या मोबाईल मधील जागा वाचवतातच शिवाय याच्यामुळे तुमच्या मोबाईल ची गती व कार्य करण्याची क्षमता वाढवतात.
Mobile Slow झालाय ? काम करत नाही ? || SD Maid System Cleaning Tool || Technology |
अँप कंट्रोल - App Control च्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या अँप्लिकेशनला कंट्रोल करू शकता . तसेच सिस्टिम क्लीनर - System cleaner हे तुमच्या संपूर्ण मोबाइल स्कॅन करून डिटेक्ट करेल व क्लीन करून टाकेल. एक्सप्लोरर - Explorer याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या स्टोरेज ला एक्सप्लोर करू शकता. तसेच ओव्हरव्हिव - Overview फिचरने तुम्ही तुमच्या मोबाइलचा सर्व अवलोकन ( ओव्हरव्हिव - Overview ) तपासू शकता. अशाप्रकारे हे अँप्लिकेशन ( Application ) आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे .
मित्र आणि मैत्रिणींनो या आर्टिकल मधून आपण शिकलोत कि एसडी मेड ( SD Maid ) सिस्टिम क्लिनिंग टूलच्या साहाय्याने कसे मोबाईल साफ करायचे व त्याची सर्व क्रिया. या अँप्लिकेशनचे प्रो संस्करण ( Version ) आहे जे पेड ( Paid ) आहे , ते आपण विकत घेऊ शकता किंवा हेच फ्री संस्करण वापरू शकता. तर हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो . तुम्हाला असेच खासमराठी तंत्रज्ञान ( टेकनॉलॉजी - Technology ) विषयक माहिती हवी असल्यास खासमराठी तंत्रज्ञान विभागात पाहू शकता. धन्यवाद !!
एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
SD Maid for Android - APK Download: Download SD Maid apk 4.15.8 for Android. A maid for your Android, to keep it clean & tidy.
टिप्पणी पोस्ट करा