CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA reCAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खास मराठी

CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी 

          तुम्ही तुमच्या आयुष्यात केव्हाही कोणत्याही संकेतस्थळाला भेट देत असता आणि कोणत्याही संकेतस्थळावर खाते उघडता किंवा गुगलवर खात बनवता. तेव्हा तुम्हाला वर दाखवलेल्या चित्राप्रमाणे कॅप्टचा दाखवला जातो . पण तुम्ही कधी विचार केलात कि हा कॅप्टचा ( CAPTCHA ) का दाखवला जातो ? यामागचा हेतू व तंत्रज्ञान काय आहे ? का सारखे सारखे हे दाखवून तुमचा वेळ वाया घालवला जातो ? हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात.


          IRCTC चे नाव तुम्ही ऐकलेच असेल. भारतात जेवढ्या पण रेल्वे आज धावत आहेत त्यांच्या तिकिटांचे रिजर्वेशन याच संकेतस्थळावरून केले जाते. या संकेतस्थळावर  तत्काळ असा विभाग आहे ज्यामध्ये तुम्हाला तिकिटांचे रिजर्वेशन एक दिवस आधीच मिळते. ११ वाजता स्लीपर चा तत्काळ उघडते तर १० वाजता AC चे तत्काळ उघडते. आता तुम्हाला तत्काळ चे रिजर्वेशन करायचे आहे तर तुम्ही १० वाजता किंवा ११ वाजता वाट पाहाल आणि जेव्हा ११ वाजता तात्काळ उघडेल त्या क्षणी तुम्ही संकेतस्थळावर जाल , रेल्वे निवडाल ,तुमची सर्व माहिती भराल आणि तिकिटाचे पैशे भराल. या सर्व स्टेप करण्यासाठी तुम्हाला ३-४ मिनिटे नक्कीच लागतील पण तुमच्या आधी कोणीतरी हे सर्व स्टेप्स केल्या तर सर्व तिकिटे त्याला मिळून जातील. आणि तुमच्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही . समजा तुम्ही एक प्रोग्रामर आहेत तुमचं कोडींग मध्ये डोकं चालत तर तुम्ही एक स्क्रिप्ट लिहू शकता , बोट किंवा रोबोट बनवू शकता. आता तुम्ही तुमच्या स्क्रिप्ट मध्ये रिजर्वेशन करायच्या सर्व स्टेप्स समाविष्ट कराल त्यानंतर तुम्हाला ११ वाजायची वाट पाहायची आहे जसे ११ वाजतील तेव्हा तुम्हाला हि स्क्रिप्ट रन करायची आहे . ती स्क्रिप्ट संकेतस्थळावर जाऊन रेल्वे निवडून , सर्व माहिती देऊन पैशे भरेल . जी तिकिटे रिजर्व करण्यासाठी तुम्हाला ३-४ मिनिटे लागायची तेच काम आता तुमची स्क्रिप्ट काहीच सेकंदात जसे १० - १२ सेकंदात करेल.

CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी
CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी 

          ऑनलाईन स्क्रिप्ट आणि रोबोट यांना रोखायचे कसे ? तसेच त्यांना ओळखले कसे जाऊ शकते कि ती एक स्क्रिप्ट आहे कि रोबोट आहे ? अशाने सर्वांचा तोटा होणार होता आणि लोकांसाठी तिकिटे मिळणे कठीण होऊन जाईल या विचाराने सगळ्या जगातील संकेतस्थळांना डोकेदुखी बनत चालली होती . रोबोट आणि स्क्रिप्टला रोखण्यासाठी एक नवे तंत्रज्ञान पुढे आले . तेच  कॅप्टचा ( CAPTCHA ) . कॅप्टचा हा शॉर्ट फॉर्म असून त्याला लॉन्ग फॉर्म आहे कॉम्प्लेटली ऑटोमेटेड पब्लिक टुरिंग टेस्ट टू टेल कॉम्पुटर ह्यूमन अपार्ट ( Completely Automated Public Turing test to tell Computer Human Apart ) याला तंत्रज्ञानाला यासाठीच बनवण्यात आलं होत कि ज्या स्क्रिप्ट ,रोबोट संकेतस्थळे खराब करत आहेत , लाखो नवीन खाती बनवली जात आहेत. मोठ्या प्रमाण स्पॅमिन्ग होत आहे यांच्यावर रोख लावला जाईल. या तंत्रज्ञानामुळे ओळखले जाऊ शकते कि वापरकर्ता एक स्क्रिप्ट आहे, कि रोबोट आहे कि, एक मनुष्य आहे.

CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी
CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी 

          २००३ ला CAPTCHA हे तंत्रज्ञान आणण्यात आले यामध्ये तुम्हाला  काही वेडी वाकडी अक्षरे व अंक दाखवले जातात  जे स्क्रिप्ट किंवा रोबोट वाचू शकत नाहीत फक्त मनुष्य ते वाचून सबमिट करू शकतो अश्याने ऑनलाईन स्क्रिप्ट, रोबोट यांचावर आळा बसला. त्यानंतर काही काळाने लोकांनी असा विचार केला कि वेडी वाकडे अक्षरे अंक दाखवण्यापेक्षा काही तरी अर्थपूर्ण अक्षरे दाखवू याच विचारातून या CAPTCHA तंत्रज्ञानाला ऍडव्हान्स केले गेले आणि नवे तंत्रज्ञान उदयास आले ते म्हणजे reCAPTCHA . यामध्ये त्यांनी बाजारातील सर्व पुस्तके स्कॅन केली. अजून एक तंत्रज्ञान इथे वापरले गेले ते म्हणजे OCR. OCR चा   फुलफॉर्म ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन ( Optical Character Recognition ) हे असे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये तुम्ही दिलेल्या चित्रातील अक्षरे ,अंक , शब्द कॉम्पुटरला वाचता येतात . आता रिकॅप्टचा बनवणाऱ्यानी पुस्तके स्कॅन केली आणि कॉम्पुटरला दाखवली आता त्यांना असं जाणवलं कि काही अक्षरे वाचण्यात ते असमर्थ होते ती अक्षरे त्यांनी reCAPTCHA मद्ये वेडी वाकडी करून समाविष्ट केली.


          २००९ साली गूगल आले , गूगलला ही त्याच समस्यांना समोर जावं लागलं. सर्च इंजिन ,स्पॅमिन्ग ,लाखो हजारो खाती जीमेल वर बनवली जाऊ लागली रोबोट आणि स्क्रिप्ट वापरून , मोठ्या प्रमाणात डाटा सर्व्हरला साचू लागला . या संकटाला आळा  घालण्यासाठी गूगलने reCAPTCHA  कंपनीला विकत घेतले. काही कंपन्या कॅप्टचा भरून देण्याचे काम करू लागल्या त्याचा बदल्यात त्यांना पैशे मिळू लागले.  वारंवार अक्षरे आणि अंक , शब्द भरणे लोकांसाठी त्रासदायक बनले होते, जेव्हा हे गुगलला कळले तेव्हा त्यांनी रिकॅप्टचाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे No CAPTCHA - reCAPCHA तंत्रज्ञान आणले गेले.

CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी
CAPTCHA , reCAPTCHA व No CAPTCHA काय आहे , जाणून घ्या त्या मागचे तंत्रज्ञान ।। खासमराठी 

          No CAPTCHA - reCAPCHA तंत्रज्ञान आपल्याला गुगलच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते. यामध्ये  I'm not a robot असे लिहलेले असते आणि त्याच्या खाली आपल्याला टिक करण्यासाठी सांगितले जाते. ते जेव्हा हिरव्या रंगाचे होते तेव्हा समजून जा कि तुम्ही पुढे जाण्यासाठी पात्र आहात. आता असा प्रश्न पडेल कि हे टिक स्क्रिप्ट किंवा रोबोट हि करू शकते मग याचा उपयोग काय ? तर समजून घ्या कि जेव्हा तुम्ही टिक करता तेव्हा तुमची सर्व माहिती गूगलकडे जाते ज्यामध्ये तुमचा आयपी ऍड्रेस (IP Address) , लोकेशन (Location), देश , राज्य ,शहर माहिती सामाविष्ट असते. तुमच्या माऊसच्या कर्सर ची हालचाल वर , खाली , आडवे , तिरके तसेच तुम्ही त्या पृष्ठावर किती वेळ थांबलात , किती वेळा पृष्ठ वर खाली स्क्रोल केला गेला. हि सर्व माहिती गुगलच्या सर्व्हरकडे पाठवली जाते. मशीन लर्निंगद्वारे त्या माहितीचे विश्लेषण केले जाते आणि मगच तुम्हाला पुढे पाठवले जाते पण त्याला १०% तरी वाटलं कि स्क्रिप्ट किंवा रोबोट आहे तेव्हा तुम्हाला पुन्हा चित्रे दाखवली जातात उदाहरणार्थ कार ,हॉटेल , बस ,सिग्नल इत्यादी.


          मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही कधी असा कॅप्टचा कोड भरला आहे ? हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता.... धन्यवाद !!     

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने