चमत्कार.. चक्क झाडाच्या आत लागली केळी.. || Marathi special


          आपल्या आजूबाजूला अश्या काही घटना घडताना दिसतात कि ते जाणून घेतल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो . मग तारांबळ उडते प्रश्नाची आणि त्या गोष्टीबद्दल अधिकच जाणून घ्यायची इच्छा होते. जगाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत असे अनेक किस्से पाहायला मिळतात आणि त्याचे उत्तर अद्याप विज्ञानाला हि द्यायला जमले नाही. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खानू गावात घडली...


रत्नागिरी जिल्ह्यातील खानू गावात असे काही घडले आहे ते पाहून तुम्हाला नवलच वाटेल...  
घडला निसर्गाचा चमत्कार , एक अद्भुत नजारा... !!   


          हि गोष्ट Ratnagiri जिल्ह्यातील khanoo गावातील. तर हे गाव महाराष्ट्रातील पहिले सेंद्रिय गाव म्हणून ओळखले जाते आणि त्याला तस गौरवलं देखील जात आहे. शेती करणे हाच इथला प्रमुख उद्योग , हे भूमिपुत्रांचे गाव आहे. इथे कोणतेही रासायनिक खत किंवा पिकांवर कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. तर येथील भूमिपुत्र १००% सेंद्रिय पद्धतीची शेती करतात आणि म्हणूनच या गावाला ( khanoo organic farming first village maharashtra )महाराष्ट्रातले पहिले सेंद्रिय गाव म्हणून गौरविण्यात येते.

चमत्कार.. चक्क झाडाच्या आत लागली केळी.. || Marathi special
केळी झाडाच्या अंतर्गत भागात आढळला केळीचा घड

          रत्नागिरी तालुक्यातील खानू गावचे एकूण ९९८ हेक्टर क्षेत्रफळ असून, सर्व क्षेत्र सेंद्रिय आहे. या गावात १८५० पेक्षा जास्त शेतकरी बांधव आहेत. आंबा, काळी मिरी, कोकम ,काजू , नाचणी, भात, फणस लागवड करण्यात येते तर गावात नियोजित उद्दिष्टापेक्षा अधिक काजू लागवड करण्यात आली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी मातीचे प्रमाणीकरण करून घेतले आहे त्यामुळे इथले शेतकरी जगातील कोणत्याही बाजारपेठेत शेतीतील उत्पादने विक्रीसाठी पाठवू शकतात. खानू गावात पिकणारा लाल ,काळा तांदूळ स्वतःच्या ब्रॅण्डनेम ने बाजारात उपलब्ध असून त्याला प्रचंड मागणी आहे.


          खानू गावात अशीच एक आश्चर्य जनक गोष्ट घडली आहे . या गावाचे रहिवासी असणारे श्री.कृष्णा तानू सुवारे यांच्या घरी केळीच्या झाडात अंतर्भागात केळी लागल्या आहेत परंतु त्या केळीच्या घडला वाढायला अजून वेळ आहे. प्रत्यक्ष दर्शींकडून असे सांगण्यात येत आहे कि शेतकरी श्री कृष्णा यांनी केळीचे झाड लावले होते , ते मोठे झाल्यावर केळीच्या खोडाचा आकार वाढत चालला होता . काही काळानंतर खूपच वाढला त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी हा काय प्रकार आहे याची शहानिशा करायचे ठरवले .

वाढत्या केळीच्या झाडाचे रूप (source-facebook)

          वाढत्या केळीच्या झाडाचे हे रूप पाहून ते आश्चर्य चकित झाले होते. त्यांनी त्या झाडाला तोडण्याचा विचार केला . तसे केले असता त्यांना आढळले जे तुम्हाला हि पटणार नाही त्या केळीच्या झाडाच्या अंतर्गत भागात केळीचा घड निर्माण झाला होता ( छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे )..... !! हि बाब लक्षात येताच श्री कृष्णा यांनी शेजारच्यांना बोलावले. गावातील लोक हे केळीच्या झाडाचे रूप पाहून अचंबित झाले आहेत. आता असे घडण्यामागे काय प्रकार असेल हे तर्क लावूनच सांगता येईल.

रोज नविन updates साठी आमच्या YouTube channel ला subscribe करा. 




        आपला निसर्ग हा असाच विविधतेने नटलेला असून अनेक आश्चर्य त्याच्यात दडलेली आहेत. शेवटी निसर्ग आहे म्हणूनच जीवसृष्टी अस्तित्वात आहे. निसर्गाचा समतोल राखला गेला नाही तर काय आपत्ती येतात याचे उदाहरण सध्या आपण पाहतच आहोत. जसे मानवी हस्तक्षेपामुळे पसरलेला Corona Virus , अवकाळी पडणारा पाऊस , दुष्काळ... इत्यादी. त्यामुळे निसर्गाचा ह्रास होईल असं वागणे टाळायला हवे.



          मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? आणि पुढचे आर्टिकल तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान असतो . हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता. खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते धन्यवाद... !! . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने