खजिन्याचे टाळे खोला व गरजुंना मदत करा : सोनिया गांधी || Marathi news


          महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या स्थलांतरित मजुरांच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सूचित केले. जे काही स्थलांतरित मजुर होते त्यांचा विषय हाताळण्यामध्ये सरकार कमी पडले असे काँग्रेसचे मत आहे. मोदी सरकारने प्रवासी श्रमिक मजुरांच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष्य देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

खजिन्याचे टाळे खोला व गरजुंना मदत करा : सोनिया गांधी || Marathi news
खजिन्याचे टाळे खोला व गरजुंना मदत करा : सोनिया गांधी

          कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन करण्यात आला त्यामुळे मजुरांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या , उद्योग धंदे बंद राहिल्याने त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले, त्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले नाही असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.


          सोनिया गांधी म्हणतात ,“ मागच्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश अन्न आणि रोजगाराच्या गंभीर आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाखो मजूर उपाशीपोटी, कुठल्याही औषधांशिवाय शेकडो किलोमीटरची पायपीट करुन घरी परतण्यासाठी मजबूर आहेत” 

          “कोटयावधी लोक बरोजगार झाले आहेत , कारखाने बंद पडले आहेत. पण याची काहीच कल्पना कदाचित सरकारला नसावी. आमची केंद्रसरकारला विनंती आहे, खजिन्याचे टाळे खोला व गरजुंना मदत करा. कुटुंबांना दर महिन्याला ७,५०० रुपये रोख रक्कमेच्या स्वरुपात द्या आणि त्यात १० हजार रुपये तात्काळ द्या” अशी मागणी सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )


२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ


        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने