आंध्रप्रदेश गॅस गळती ; काहींचा मृत्यू तर हजारो लोक गॅस च्या विळख्यात || Marathi news
एकीकडे कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असला तरी आता दुसरीकडून बातमी अशी Gas leakage visakhapatnam मधील ८ ते १० जणांचा मृत्यू झाला तर हजारोंच्या संख्येने लोक आजारी पडत आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्तिथी तेथे उत्त्पन्न झाली आहे . Andhrapradesh च्या त्या ठिकाणी सुरक्षा बल तैनात झाले असून लोकांना हॉस्पिटल करण्यात जुटलेले आहे. हि भारतासाठी खूपच चिंताजनक बाब आहे.
आंध्रप्रदेश गॅस गळती ; काहींचा मृत्यू तर हजारो लोक गॅस च्या विळख्यात || Marathi news |
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ( Vizag ) किनारपट्टी शहरातील एका कारखान्यात विषारी वायू गळतीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 9 - १० लोकांचा मृत्यू आणि ५ हजार पेक्षा जास्त लोक आजारी पडले आहेत. विशाखापट्टणममध्ये ज्या ठिकाणी गॅस गळत होता, त्या ठिकाणी 3 किलोमीटरच्या परिसरात घबराट पसरली. लोक विस्कळीत रस्त्यावर पडलेले आढळले. बर्याच लोकांना श्वास घेण्यात अडचण येत होती, तर बरेच जण शरीरावर पुरळ आणि डोळ्यांची जळजळ होण्याची तक्रार करत होते.
विशाखापट्टणमच्या नायडू थोटा भागात लोक झोपेत होते. अचानक काही लोकांना दम लागतो. श्वास घेण्यास मोठी अडचण होते . डोळ्यासमोर मरण दिसते . प्रथम असे वाटते की हवेमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असेल. लोक घाबरून गेली . जे छप्परांवर होते त्यांनी घरात प्रवेश केला. दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. तरी अधिकच गुदमरल्यासारखे झाले. हे सर्व घडले गॅस गळतीमुळे... !!
एलजी पॉलिमर प्लांटमधून झाली गॅस गळती :
दक्षिण कोरियन कंपनी एलजी पॉलिमरच्या प्लांटमधून हा गॅस गळती झाला. या प्लांटमध्ये पॉलिस्टीरिन बनविला जातो, ज्याचा उपयोग म्हणजे प्लास्टिक, जो खेळणी आणि इतर उपकरणे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हे प्लास्टिक बनवण्यासाठी प्लांटमध्ये स्टिरिन गॅसचा वापर केला जात होता. विशाखापट्टणम शहराच्या बाहेरील भागात हा प्लांट उभारला गेला आहे.
हा एक खूपच विषारी असा वायू असून त्याच्या संपर्कात आल्यानंतर, लोकांच्या फुफ्फुसांवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्यांना दम लागतो. नंतर या वायूचा मेंदू आणि पाठीचा कणा देखील प्रभावित होतो. यामुळे गॅसच्या संपर्कात आलेले स्थानिक लोक रस्त्यावर इतरत्र बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले तरी आरोग्य यंत्रणा त्यांचे कार्य उत्तमरित्या बजावत आहे.
आंध्रप्रदेश गॅस गळती पार्शवभूमीवर पायल रोहतगी यांचे Tweet :
Ram Ram ji 🙏 #VizagGasLeak 🙏 Sad Sad Sad ☹️ Bhagwan give shanti to all victims 🙏 pic.twitter.com/24VkmdqRqt #payalrohatgi— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (@Payal_Rohatgi) May 7, 2020
अशाच सर्वोत्तम News Updates मिळवण्याकरीता खासमराठी ला नेहमी भेट देत रहा ! काही अडचण असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका . तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे . धन्यवाद.... !!
टिप्पणी पोस्ट करा