महाराष्ट्रात अंदाजापेक्षा कमी करोना रुग्ण - मु. उद्धव ठाकरे || Marathi news
महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूच्या संसर्गाचे वाढते आकडे पाहून चिंताग्रस्त झाले आहे , तरीही महाराष्ट्र सरकार लागेल ती मदत करण्याच आवाहन करत आहे. तसेच केंद्र सरकार कडूनही मदत येत आहे. आज दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येवून जनतेला काही गोष्टी सूचित केल्या .
मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख रुग्ण असतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होता. दरम्यान ४७ हजार १९० ही करोना रुग्ण संख्या असली तरीही ३३ हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. उर्वरित १३ हजारांच्या आसपास रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. १५७७ मृत्यू हे करोनामुळे झाले आहेत ही बाब निश्चितच दुर्दैवी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
महाराष्ट्रात अंदाजापेक्षा खूपच कमी करोना रुग्ण - मु. उद्धव ठाकरे || Marathi news |
पुढचे काही महिने मास्क लावावा लागणारच ,आपले हात वारंवार धुत रहाणे ,एक विशिष्ट अंतर राखूनच काम करणं, सॅनिटायझर सातत्याने वापरणं ,स्वच्छता बाळगने या सगळ्या गोष्टी करणं म्हणजेच करोनासोबत जगणं असा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समजावून सांगितला. पुढचे काही महिने हे आपल्याला करावं लागणारच आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की करोनाचं संकट नष्ट होवो अशी दुवा करा. लॉकडाउन केला आणि आपण त्यातून काय साधलं याची कल्पना देतो. काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही. याचा अर्थ काय? ते तुम्हाला समजलं असेल. मास्क सक्तीचा का? हात का धुवायचा? या संदर्भातले बॅनर्स लावले आहेतच. करोनासोबत जगायचं म्हणजे काय ? ते मी सांगतो आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पुढचे काही दिवस आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार आहे.
रक्तदान करण्याचं आवाहन :
राज्यात ८ ते १० दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्ताची गरज भासणार आहे . याआधी जेव्हा रक्तदानाचं आवाहन केलं होतं तेव्हा तुम्हाला थांबा असं सांगावं लागलं होतं. आता स्वतःची पूर्ण काळजी घेऊन रक्तदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. रक्ताचा साठा ८ ते १० दिवस पुरेल इतका आहे. मात्र येत्या काळात रक्तदान करा, ते करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
The fight against COVID19 is going to be tougher now but there is no need to panic as we are prepared with extra health facilities: Maharashtra CM Uddhav Thackeray as positive cases cross 47,000 in the state— ANI (@ANI) May 24, 2020
The number of active patients is 33,786 and over 13,000 have recovered. pic.twitter.com/siCrEZcPjn
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Click here Khasmarathi
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
हे तुम्ही वाचायला हवं : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा