ठाकरे सरकार अपयशी , राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; नारायण राणे || Marathi news
राज्यातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये कोरोना संकट हाताळण्याची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी राणेंनी राज्यपालांकडे केली.
ठाकरे सरकार अपयशी , राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; नारायण राणे || Marathi news |
नारायण राणे म्हणाले राज्य कसे चालवावे व उपाययोजना राबवाव्यात , पोलीस यंत्रणा कशाप्रकारे हाताळली जावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमलेले नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे तर रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हि चिंतेची बाब आहे. लोकडाऊनचे उल्लंघन होताना दिसतेय त्यामुळे ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते , अशी विनंतीही राज्यपालांना केली.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा.— Narayan Rane (@MeNarayanRane) May 25, 2020
ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. @maha_governor @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/poxG9iA7Tb
आतापर्यंत राज्याला जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. मार्ग शोधायचा सोडून टीका करणे हे एक प्रकारचं राजकारण आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना सुरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही, अशा शब्दांत राणेंनी सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात दिली तरच परिस्थिती सुधारेल,सगळा अनागोंदी कारभार राज्यात सुरु आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं.
राज्य कसे चालवावे, पोलीस यंत्रणा कशी हाताळावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते, अशी विनंतीही राज्यपालांना केली.— Narayan Rane (@MeNarayanRane) May 25, 2020
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Click here Khasmarathi
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
आपके आपस के मतभेदों से देशवासियों को आप लोग प्रताड़ित करने का मौका मिला उसका फल भोगना ही पड़ेगा जेसे प्रमोद महाजन जी ने जो कुछ ग़लत कीया उसकी कीमत मीली अब तो सुधरेगा भारत की बिक जाने के बाद आपको जागरूकता आयेगी सबके सब पालीटीकल गेम है बाकी कुछ नहीं
उत्तर द्याहटवाचुनाव जीतने के बाद भी उद्धव जी में जोश की कमी दिख रही है
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा