परप्रांतीयांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखणे गरजेचे : शरद पवार || Marathi news


          जगभर कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊनमध्ये मोठ्या संख्येने मजूर त्यांच्या गावी परत गेले आहेत. देशाची आर्थिक व्यवस्था डगमगली असून राज्यातील कंपन्या पुन्हा सुरू करण्यासाठी मजुरांना पुन्हा आणण्याची गरज आहे भासू लागली आहे.

मुंबई :

          भारतच नव्हे तर जगभरात कोरोनाचा ( Coronavirus ) कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. त्यात राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत नाहीये . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व मानवी गर्दी रोखण्यासाठी राज्यातील सर्व उद्योग धंदे ठप्प आहेत . त्यामुळे कामे करून खाणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

परप्रांतीयांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखणे गरजेचे : शरद पवार || Marathi news
परप्रांतीयांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखणे गरजेचे : शरद पवार || Marathi news

          गेल्या दोन महिन्यांपासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व कमाईचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने मजुरांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.  मोठ्या संख्येने मजूर, कामगार आपआपल्या गावी परत जात आहेत. मात्र यामुळे राज्यात विविध कंपन्यांना कामे करणे आता अवघड जात आहे कारण मनुष्यबळ कमी पडत आहे .


          केंद्रीय मंत्री शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी लॉकडाऊननंतर आर्थिक संकट सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आखण्याचे आवश्यक असल्याचे सांगितलं आहे. याबाबत त्यांनी ट्विटर वर ट्विट केलं आहे.



          शरद पवार त्यामध्ये म्हणतात , राज्य सरकार लॉकडाऊनची परिस्थिती शिथिल करीत आहेत. पण कामगार खेड्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे कारखाने पुन्हा सुरू करण्याच्या स्थितीत नाहीत. आपल्याला त्यांना परत आणण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे.



          दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की , राज्यांमध्ये नवीन गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी औद्योगिक विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरणांचा समावेश केला पाहिजे. आयात, निर्यात आणि अंतर्देशीय शिपिंग वाढविण्यासाठी उद्योगपती, उद्योजक आणि क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करण्याची गरज आहे.


          कोरोनाचे महाभयानक संकट डोक्यावर असताना अशी पाऊले उचलणे ठीक आहेत का ? अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी व महसूल मिळवण्यासाठी उद्योग धंदे सुरु केले तर कोरोनाचा वाढत संसर्ग कसा रोखता येईल ? अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने