लष्कर संघटनेचे तीन आतंकवादी जेरबंद || Marathi news
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील ( Jammu - kashmir ) सुरक्षा दलाला दहशतवादविरोधी दिनाच्या ( Antiterrorist day ) दिवशी मोठे यश आले आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे तीन अतिरेकी ( terrorist ) पकडले ( arrested ) गेले आहेत तर पकडलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरूच आहे. हे ऑपरेशन लष्कराच्या 28 आरआरने यशस्वी केले. हे दहशतवादी पकडल्यानंतर अनेक महत्त्वाचे खुलासे बाहेर पडण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, या तिन्ही दहशतवादी लष्करशी संबंधित आहेत, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सांगण्यात येत आहे की गेल्या महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले आहेत आणि बरेच सैनिकही ठार झाले आहेत.
लष्करचे संघटनेचे तीन आतंकवादी जेरबंद || Marathi news |
श्रीनगरमधील पंडक चौक भागात बीएसएफच्या गस्ती घालणाऱ्या दलावर आतंकवाद्यांनी बुधवारी 37 व्या बटालियन जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक ठार झाले. शहीद झालेले सैनिकांची नावे राणा मंडोल आणि झियाउल हक आहेत.
दरवर्षी 21 मे रोजी साजरा करण्यात येणारा दहशतवादविरोधी दिन या वर्षी घरी राहूनच साजरा करण्यात येईल. या दिवशी कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परिपत्रकानुसार 21 मे रोजी सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर सार्वजनिक संस्थांमध्ये दहशतवादाचा निषेध करण्याचे वचन देण्यात आले आहे.
Three newly recruited terrorists have been arrested by joint forces at Sogam of Kupwara district. Further investigation underway: Jammu and Kashmir Police pic.twitter.com/mEapV90XI1— ANI (@ANI) May 21, 2020
अशाच सर्वोत्तम News Updates मिळवण्याकरीता खासमराठी ला नेहमी भेट देत रहा ! काही अडचण असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका . तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे . धन्यवाद.... !!
टिप्पणी पोस्ट करा