शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे : मुख्यमंत्र्यांचे कोव्हिड योद्ध्यांना भावनिक पत्र ! || Marathi news



         Corona Virus च्या पार्शवभूमीवर रुग्णांच्या सेवेसाठी कोव्हिड योद्धे म्हणून पुढे येण्याच्या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री Uddhav Thakare यांनी पुढे येण्याचं आवाहन  केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून 21 हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. त्या सर्वाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहिलं आहे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे मुख्यमंत्री म्हणून मला बळ मिळालं शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे असं ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे : मुख्यमंत्र्यांचे कोव्हिड योद्ध्यांना भावनिक पत्र ! || Marathi news
शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे

          आपल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहितांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राच्या मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात मागे हटत नाही तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक "सैनिक" बनून आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतूकास्पद आहे.

हे तुम्ही वाचायला हवं : या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

          हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करतांना दिसत आहे. आपणासारखे कोविड योद्धे आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ  मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपुजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे.  थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील.  हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत ?  ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रजू झाल्याशिवाय राहणार नाही.


२१ हजार ७५२ लोकांचे कोविड योद्धा म्हणून अर्ज दाखल झाले : 


          परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर, सामान्य स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिकल, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रांतून मुंबईसह महाराष्ट्रात २१ हजार ७५२ जणांनी ' कोविड योद्धा ' होण्यासाठी अर्ज केले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या १२ हजार १०३ आहे तर इतर क्षेत्रातील ९ हजार ६४९ इतकी आहे. यात ३ हजार ७१६ कोविड योद्ध्यांनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली आहे. कोविड योद्धा होण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ३७६६ अर्ज मुंबईसाठी आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या १७८५ आहे तर इतर क्षेत्रासाठी १९८१ अर्ज आले आहेत.काम करण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योध्यांना  बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही सुरु आहे.


काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योध्याना सलाम करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना व्यक्तिशः पत्र लिहुन आभार व्यक्त केले.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



हे आर्टिकल तुमच्यासाठी उपयुक्त आहे - नवीन मोबाइल घेताय मग या ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात. 



          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने