विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : 10th Dimension || String Theory || Psychology


          नमस्कार मंडळी या आधीच्या लेखात तुम्ही 0 ते 5 Dimension काय आहेत ? ते कसे चालतात ? Dimension Theory काय असते ?  याबाबत माहिती घेतली. आता 10th Dimension म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या अस्तित्वाशी काय संबंध आहे हे या Psychology - मानसशास्त्रच्या भागातून जाणून घेऊया..आधीच्या लेखात संगीतल्याप्रमाणे ब्रम्हांडात अनेक घटना घडतात आणि त्या घटना Dimensions मध्ये मोजण्यात येतात. आता पुढचे Dimensions कसे काम करतात तसेच String Theory याबद्दल माहिती घेऊ.. 

भाग १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 



🔅 भाग 2 🔅


विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : 10th Dimension || String Theory || Psychology
विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : 10th Dimension || String Theory || Psychology

◾ 6th Dimension :


          समजा तुम्ही 5th Dimension मध्ये आहात आणि दोन्ही Career मध्ये खूप मोठ्या Level वर गेलात.जर तुम्हाला असं वाटलं की Parallel Universe मधलं आपलं प्रतिरूप आपल्याला येऊन भेटावं किंवा आपण त्याला जाऊन भेटावं तर कसं करता येईल हा प्रश्न उभा राहतो. तर याचे 2 मार्ग आहेत.


          पहिला मार्ग म्हणजे तुम्ही Time Travel करून जेव्हा तुम्ही Career निवडत असाल तेव्हा च्या Timeline वर जाऊन त्या दुसऱ्या प्रतिरूप सोबत त्याचा प्रवास अनुभवाल तेव्हा एक वेळ अशी येईल की, तुमचं भविष्यातून आलेलं प्रतिरूप तुमच्या दुसऱ्या प्रतिरुपाला त्या मोठ्या level वर गेल्यानंतर भेटू शकेल.
पण यात खूप जास्त वेळ लागू शकतो.


          आता दुसरा मार्ग काय ते बघू, समजा तुमचं Parallel Universe मधलं प्रतिरूप Time travel न करता Directly एक मार्ग वापरून तुमच्या प्रतिरुपा पर्यंत येतं. तो जो मार्ग वापरेल तो मार्ग म्हणजेच 6th dimension. 



◾ 7th Dimension :


          जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्या या ब्रम्हांडात Dimensions आहेत आणि त्या अनंत आहेत. जसा  Time भविष्यात अनंत आहे त्याचप्रमाणे जर या Universe ची लांबी रुंदी बघितली तर ती सुद्धा अनंत आहे.


          आता कल्पना करा की आपलं हे अनंत ब्रम्हांड एक 0th Dimension बनलं जसं आधी 0th Dimension मध्ये सांगितलंय तसं झालं, म्हणजे हे अनंत ब्रम्हांड एका Point सारखं झालं आणि त्यात 6 Dimensions काम करत आहेत.


          आता समजा या Point सारखंच दुसरं आणखी एक अनंत ब्रम्हांड आहे त्यातही 6 Dimensions काम करतात. आता समजा पहिल्या Universe मधून आपल्याला या दुसऱ्या Universe मध्ये जायचंय आणि आधी सांगितल्या प्रमाणे त्यांना जर आपण Point A आणि Point B अशी नावे दिलीत तर Point A ला Point B सोबत Connect करण्यासाठी एक Line आखावी लागेल जेणेकरून त्यात एक Connection निर्माण होईल. ते जे Connection निर्माण होईल त्याला 7th Dimension म्हणतात. म्हणजे एका अनंत Universe मधून दुसऱ्या अनंत Universe मध्ये जाण्यासाठी केलेला मार्ग अशी थोडक्यात आपण त्याची व्याख्या करू शकतो.



◾ 8th Dimension :


          जसं की आपण 2nd Dimension बद्दल आधी माहिती घेतलीय की मागे पुढे जाण्यासोबतच 2nd Dimension मध्ये डाव्या उजव्या बाजूला देखील जाता येतं. याचप्रकारे 7th Dimension जसं दोन Universe ना एका सरळ रेषेत जोडतं तसंच डाव्या किंवा उजव्या बाजूला जाऊन एखाद्या तिसऱ्या Universe ला सुद्धा जाता येऊ शकतं आणि तो मार्ग म्हणजे 8th Dimension.



◾ 9th Dimension :


          ज्याप्रकारे आपण 3rd Dimension बद्दल माहिती घेतली  त्याच प्रकारे 8th Dimension मधले अनंत ब्रम्हांड जर आपण Connect केले आणि त्यात जायचं ठरवलं तर जो मार्ग आपण त्यासाठी वापरू त्याला 9th Dimension असं म्हणतात. 

          उदाहरणार्थ 2nd Dimension मध्ये डाव्या उजव्या बाजूला जाता येत होतं, 3rd Dimension मध्ये मागे-पुढे, डाव्या-उजव्या, वर-खाली अशा बाजूला जाता येत होतं तसंच हे 9th Dimension आहे. असंख्य ब्रम्हांड एकत्रित करून जर आपल्याला मागेपूढे, वरखाली, डाव्या उजव्या बाजूला जायचं असेल तर त्यासाठी त्यांना Connect करणारा मार्ग म्हणजे 9th Dimension.



◾ 10th Dimension :


          जसं 4th dimension मध्ये सांगितलंय की Time हा सरळ रेषेत चालतो पण आपण 4th Dimension मध्ये वेळेसोबत च बाकीच्या 3 Dimensions मध्ये मागेपुढे, डाव्या उजव्या वरखाली जाऊ शकतो तसंच 10 Dimension मधून आपण कोणत्याही 9 Dimensions मध्ये येणं जाणं करू शकतो. 

          आता प्रश्न पडतो की जर असं असेल तर मग अशी ही एखादी शक्ती असेल का की जी या सर्व Dimension मध्ये  ये जा करू शकेल ? किंवा हे सर्व Dimensions नियंतत्रित करू शकत असेल ? तर याचं Explanation देतांना एका शक्तीची संकल्पना देता येऊ शकते ज्याला तुम्ही God म्हणू शकता. याबाबत पुन्हा कधीतरी...

          मित्रानो या 10 Dimension बद्दल जाणून घेतल्यावर एक प्रश्न असाही येऊ शकतो की , फक्त इतक्याच Dimension आहेत की आणखी पण असू शकतात ? आणि याचा आपल्या अस्तित्वाशी काय संबंध ? आता याबाबत थोडं समजून घेऊ..



◾ String Theory  :


          या Theory नुसार ब्रम्हांडात जी कोणती घटना घडते किंवा असं म्हणता येईल की तुमच्या डोक्यात जो कोणता विचार येतो ती घटना ब्रम्हांडात कुठे ना कुठे घडत असेल Even ती घटना Physics च्या नियमाच्या विरुद्ध ही का असेना.. ती घटना ब्रम्हांडात कुठे ना कुठे घडत असते. थोडक्यात काय की या जगात जेवढे ही लोकं आहेत आणि ते जे ही विचार करत असतील त्या सर्व घटना 10th Dimension मध्ये घडत असतील.


          आता सर्वात मोठा प्रश्न हा की आपण त्या Dimensions मध्ये जाऊ शकतो का? तर याच उत्तर आहे नाही..तुम्ही त्या Dimension मध्ये जाऊ शकत नाही कारण आहे तुमचं 3 Dimensional शरीर. आपलं Structure च 3 Dimensional आहे त्यामुळे आपल्याला Dimensions मध्ये जाण्यासाठी Limitations येतात. Higher Dimensions मध्ये फक्त तीच गोष्ट जाऊ शकते जी 1 Dimensional असेल. आणि तशी एकच गोष्ट तुमच्या कडे असते ती म्हणजे तुमची चेतना.. ज्याला Consciousness म्हणतात. आता चेतना म्हणजे काय ? आणि त्याचा Spiritual Level वर काय उपयोग होतो याबाबत पुन्हा कधीतरी..




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने