आमचे अधिकारी हार पत्करणार नाहीत : आदित्य ठाकरे || Marathi news
२०२० या वर्षात अजून काय काय पाहायला मिळणार आहे काही सांगता येणार नाही हे वर्ष जणू मानवजातीसाठी जीवित हानी होणार ठरले आहे , नैसर्गिक आपत्तीने तोंड उघड केली आहे. अशातच हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे चक्री वादळ निसर्ग (Cyclone Nisarg ) किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी राज्यभरात किनारपट्टी भागात वास्तव्यास असणाऱ्या लोकांना अलर्ट दिला होता तसेच सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. पर्यावरण मंत्री Aaditya Thackerey यांनी या लोकांची करोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
आमचे अधिकारी हार पत्करणार नाहीत : आदित्य ठाकरे |
ट्विटर वर ट्विट करून आदित्य ठाकरे म्हणाले , “वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं दिसतात कि नाही यासंदर्भातील चाचण्या केल्या जाणार आहेत. करोना असो किंवा वादळ आमचे अधिकारी हार पत्करणार नाहीत ”. संकटाला घाबरून न जाता सर्वांनी एकमेकांचे अनुभव वाटून घेऊन काम करूया. आदित्य ठाकरे यांनी असं विधान केलं होतं.
मुंबईत चक्रीवादळामुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांची कोरोनाच्या लक्षणांसाठी तपासणी करण्यात येत आहे. चक्रीवादळ असो की कोरोना असो, आपले अधिकारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अविरत मेहनत घेत आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाहीत. pic.twitter.com/31YJyCE2nV— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 3, 2020
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले “मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या सुसज्ज तीन तुकड्या सध्या मुंबईत आल्या आहेत. शिवाय पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आणि सक्षम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठीशी ठाम आहेत. या संकटाला घाबरून न जाता सर्वांनी एकमेकांचे अनुभव वाटून घेऊन काम करूया”
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व रस्त्यांवर उन्मळून पडलेली झाडे , साचलेला कचरा साफ करण्यात BMC चे कर्मचारी आपले कार्य बजावत आहेत . तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर @mybmcwardKW मधील इरला पंपिंग स्टेशन, जुहू येथे भेट देऊन पुरासंबंधीत तयारी व उपाययोजनांचा आढावा घेतला.
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Click here Khasmarathi
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
हे तुम्ही वाचायला हवं :
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा