" रिक्षातली ती... !! " || भाग १ || Auto वाली Love story
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहात . जिचं नाव आहे रिक्षातली ती... !! Auto वाली Love story जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .
" रिक्षातली ती... !! " || भाग १ || Auto वाली Love story |
🔅 भाग - 1 🔅
" Excuse me ! "
" थोडं पलीकडे होता का ? "
" मला तिथे बसायचं आहे ! "
असा मंजुळ आणि गोड आवाज कानी पडताच क्षणी झोप कुठे उडाली कळलंच नाही .
2nd shift आणि night shift करून डोळ्यात असलेली भरपूर झोप घेऊन नवीन Room करायची ते बघायला रिक्षाने जायचं ठरवलं,तसा stop वर आलो आणि रिक्षात बसलो,प्रवासी बाकी होते म्हणून थोडं बसावं लागणार होतं,
ती आली नि आल्यासरशी गोड आवाजात बोलली ...
मोकळे केस हवेबरोबर माळरणावरच नाजूक गवत उडावं तसे हळुवार उडत होते .
Perfume चा सुगंधी हलका वास हवेच्या नाजूक झुळुकी बरोबर येत होता,
प्रवास छान चालला होता, अचानक speed breaker आल्यामुळे रिक्षाचालकाने भसकन break लावला,फारशी घट्ट धरून नं बसल्यामुळे ती माझ्या अंगावर आदळली, मी थोडं हबकून बघितलं त्यासरशी ती थोडी ओशाळली, खालच्या मानेने हळूच गालातल्या गालात हसली,
अशा गोड आणि सुखकर प्रवासामुळे डोळ्यात दाटलेली झोप तर कुठल्या कुठे पळाली.
शिवाय चोरून चोरूनं बघण्या लाजण्याचा हा खेळ चालूच होता,अशातच पुन्हा तिचा गोड आवाज कानावर पडला !
" ओ किती वाजलेत आता ? "
माझ्या हातात मोबाईल आणि घड्याळ तर होतीच पण त्या लाजऱ्या परिच्या हातात देखील branded कंपनीचं घड्याळ असल्यावर सुद्धा तिने मलाच वेळ का विचारली असेल ? ह्याच विचारात मी मनाशी गुंतून गेलो .(खरं तर तिला म्हणावं वाटलं की "तुमच्या सोबतची हि वेळ निश्चितच आठवणींच्या रुपात साठवण करून ठेवण्यासारखी आहे ) अशा विचारात असताना हसलो. पुन्हा नं राहवून तिने विचारलं
" ओ मिस्टर तुम्हालाच विचारलंय मी 'वेळ किती झालीय ? "
त्यात एवढं हसून लाजण्यासारखं काय आहे लटकाच राग आणत ती बोलली,मी ओशाळलो ते बघून तिने चेहरा लपवला आणि ती सुद्धा हळूच गाली हसली. तसंच मी तीला वेळ सांगितली. Thank You ! म्हणत ती पुन्हा हाताची बोटे एकमेकांवर घासत बाहेर बघायला लागली....
कदाचित दोघांनाही वाटत होत हा प्रवास संपूच नये ..
दुधात मिठाचा खडा पडावा तसं चालकाचा आवाज आला
" ओ साहेब आला की तुमचा stop ! "
अन त्याच वेळेस सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला , ती दरवाजा कडून बसली होती मन नसतानाही उतरायचं नसतानाही मी तिला काही म्हणायच्या आतच ती खाली उतरून बाजूला झाली .
मी पाकिटातून 20 रुपयांची नोट काढली आणि त्या मिठाच्या खड्याच्या हातावर टेकवली.
एक रम्य अविस्मरणीय प्रवास संपला होता.तसाच उदास चेहरा घेऊन मी आपल्या मार्गाने निघालो ,ते अविस्मरणीय तो एखाद्या प्रिलाही लाजवेल असा नाजूक लाजणारा चेहऱ्या च्या आठवणीत मी आपल्याच धुंदीत निघालो होतो ,जाता जाता तो चेहरा पुन्हा एकदा शेवटचं बघावं म्हणून सहज मान वळवून मागे बघितलं आणि धक्काच बसला कारण ती रिक्षात दिसलीच नाही .........
क्रमशः.....
लेखन : ✍ गोविंद हिरडकार .
◾ 7709575552
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
◾ 7709575552
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Khasmarathi
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा