" रिक्षातली ती... !! " || भाग २ || Auto वाली Love story


          नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहात . जिचं नाव आहे रिक्षातली ती... !! Auto वाली Love story जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .

भाग - १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
" रिक्षातली ती... !! " || भाग २ || Auto वाली Love story
" रिक्षातली ती... !! " || भाग २ || Auto वाली Love story

🔅 भाग - २ 🔅


          Room बघायची असल्यामुळे मित्राला भेटणं गरजेचं होतं पण त्याला कधी बघितलंच नव्हतं म्हणून कॉल करायचं ठरवलं ,पलीकडून आवाज आला 'मित्रा आलास होय रे !' मी हो म्हणाल्यावर त्याने Room चा रस्ता सांगितला "अमुक तमुक कॉलनी च्या फलकाजवळून थोडं सरळ चालत ये समोरच्या किराणा दुकान जवळुन डाव्या अंगाला वळलं की  'चार पावलं चालल्यावर मंदिरापाशी ये आणि समोरच्या बिल्डिंग ला 3 ऱ्या मजल्यावर ये !" तिथे गेल्यावर Room बघितली Advance दिला आणि राहायला लागलो .


          ठरलेल्या  Shift प्रमाणे कामाला जाणे जास्त ओळख नसल्याने वेळेत घरी येऊन Fresh झाल्यावर Batchelor असल्या कारणाने स्वयंपाक केउं थोडं मोबाईल चाळत झोपी जाणे, एवढंच दिनक्रम चालू होता ,Room मध्ये मोजकच किराणा ठेवत असल्याने किराणा संपला की मित्र अन मी जात होतो . असेच काही दिवस गेले. 


          एकदा गिरणीतून येताना अचानक तसाचं आवाज पुन्हा कानी आला ,त्यासरशी अचानक हृदय धडधड  करायला लागलं, कारण तो आवाज ओळखीचा वाटत होता ,कोण आहे बघावं म्हणून मागे वळुन बघण्याची सुद्धा हिम्मत होत नव्हती कारण इथे ओळखीचं कोणीच नव्हत ,क्षणभर त्या विचाराने डोक्यात काहूर माजलं होतं, पण मागे बघावं तर लागणारच म्हणून हिम्मत करून मागे बघितलं, तसं कोणीतरी चेहऱ्याला Scarf घालून मला म्हणाली 



" ओ ऐका ना, तो पिठाचा डब्बा  चुकून माझ्याच्याने बदली झाला .


माझ्याकडे हातातला डब्बा  देत म्हणाली,हा तुमचा डब्बा घ्या आणी माझा डब्बा घ्या !"  



मी थोडं उसनं हसू आणत डब्ब्याची अदलाबदल केली आणि सुटलो ,


अशा भावनेतून पुढे निघालो ,पण पुन्हा आठवण झाली त्या आवाजाची .....


आणि त्या रिक्षातला गोड चेहऱ्याची.


सतत मनात तिचाच विचार येत होता .. त्या दिवशी ती अचानक कुठे गायब झाली ....


कदाचित Scarf वाली हीच तर नसेल नं ...



लेखन : ✍  गोविंद हिरडकार . 
             ◾    7709575552


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi 


➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने