Brain Potential - 100% : आत्मप्राप्तीचा मार्ग || Psychology


          Hollywood मधला Lucy हा Cinema बघितला तर आपल्याला दिसतात बऱ्याच Amazing अशा गोष्टी त्यात बघायला मिळतात. त्यांनी सुरुवातीलाच एक प्रश्न विचारलेला आहे की What if we Use 100% of our Brain? ( आपण आपल्या मेंदूचा 100℅वापर केला तर काय होईल ? ) या प्रश्नाची उत्तरं त्या सिनेमातून आपल्याला बघायला मिळतात. पण कधी तुम्हीही हा विचार केला असेल तर हा प्रश्न कधी ना कधी तुम्हालाही पडला असेलच, काय होईल जेव्हा आपण आपला 100℅ Brain Use करू ? Brain Potential - 100℅ : आत्मप्राप्तीचा मार्ग चला जाणून घेऊया...

➤ Lucy Movie बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा


🔅 Theory of Reality 🔅


          Psychology चा अभ्यास करताना आपल्याला अनेक अशा गोष्टी शिकायला मिळतात ज्या बऱ्याच अंशी आपल्या Life च्या अनुभवांवर आधारित असतात. ते येणारे अनुभव आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अभ्यास करून Psychology तुमच्या पुढे बरेच असे निष्कर्ष मांडते ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे सर्व आपल्यासोबत घडलंय.. आणि बऱ्याच अंशी ते खरं ही असतं. पण सर्व खरंच आपल्यासोबत घडत का ?


          जेव्हा आपण Brain ची Study करायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बऱ्याच Neurons नी मिळून आपल्या Brain ची रचना झालेली आहे, आणि जेव्हा ते Neurons एकत्रित पणे काम करणं सुरू करतात तेव्हा आपण आपल्याला हवे ते Results त्यातून मिळवू शकतो. ही एक Theory आहे, ज्यावर अजूनही बरंच संशोधन चाललंय आणि Maybe भविष्यात त्या रहस्याचा उलगडा होईल.


          जेव्हा जेव्हा आपण असं काही वाचतो, ऐकतो तेव्हा आपल्याला निश्चितच प्रश्न पडतो की आपण आपला brain वापरतो तरी कसा? आणि काय होईल जर आपला Brain आपल्या Control मध्ये असेल? आता तुम्ही म्हणाल की आमचा Brain हा आमच्या Control मध्ये च आहे आणि त्यामुळेच तर आम्ही रोजचे कामं करतो, पण कधी विचार केलाय का की जे विचार तुम्हाला येतात ते खरंच तुमचे आहेत का?


          येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या म्हणजे तुमचे Hormones आणि पृथ्वीची स्थिती.. जस की, जेव्हा तुमच्या शरीरात Adrenaline चे प्रमाण वाढते तेव्हा तुम्ही हिंसक वृत्ती दाखवता आणि जेव्हा Serotonin चे प्रमाण वाढते तेव्हा तुम्ही शांत होता, यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपले Hormones आपले विचार आणि वृत्ती Control करत असतात. त्याचव्यतिरिक्त, जेव्हा पृथ्वी एका विशिष्ट स्थितित येते तेव्हा आपल्या शरीरात काही Energies मध्ये बदल होतात त्यामुळेही आपलं वर्तन बदलायला लागतं. मग आता तुम्हीच विचार करा की खरंच आपले आहेत का?


          जेव्हा आपल्याला समजतं की आपले विचारही आपले नाहीत तेव्हा प्रश्न पडतो की मग हे सर्व जे आहे त्यातलं काय खरं काय समजावं? येथे Reality Theory काम करते. जी सांगते की तुम्ही आणि तुमचं अस्तित्व या दोन भिन्न बाजू आहेत. आता हे नेमकं काय प्रकरण आहे ते आधी समजून घेऊ..


          जसं की एखाद्यावेळी तुम्हाला एखादा चमचमीत दिसणारा पदार्थ खावा वाटतो , पण शरीरात चरबी वाढेल हा विचारही येतो म्हणून तुम्ही त्याची टाळाटाळ सुद्धा करता. पण होतं काय की मनात तेव्हाच एक दुसरा विचार येतो की आता खाऊन घेऊ नन्तर बघू काय ते, यावेळी Reality Theory नुसार इच्छा होणे म्हणजे ते तुम्ही आणि शरीरात Fat वाढण्याचा विचार देणारं तुमचं अस्तित्व अशा या दोन बाजू आहेत. या उदाहरणात ते खाऊन शेवटी तुम्ही च जिंकता कारण तुमचं शरीर आणि तुमचं मन तुम्हाला ते खाण्यासाठी प्रेरित करतं..तर सांगण्याचं तात्पर्य हे, की तुमच्या व्यक्तित्वाच्या दोन बाजू आहेत ज्या तुम्हाला Control करत असतात आणि तुम्हाला वाटतं की हे सर्व Thoughts तुमचे आहेत..


          आता मग हा प्रश्न पडतो की जर प्रत्येक गोष्ट आपल्याला Control च करते तर मग आपल्याला या सर्व गोष्टींचा Control कसा घेता येईल? जेणेकरून आपल्या Desires, Emotions,आपले Thoughts हे आपल्या Control मध्ये येतील आणि आपण आपलं एक व्यक्तित्व ठरवू शकू, तर याचवेळी 100 Percent Brain Usage ची Term लक्षात घ्यावी लागते. 
Brain Potential - 100℅ : आत्मप्राप्तीचा मार्ग || Psychology
Brain Potential - 100℅ : आत्मप्राप्तीचा मार्ग || Psychology

🔅 100 Percent Brain Potential 🔅


          आपलं शरीर हे खूप जटील असं Mechanism आहे याला समजण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरूच आहेत, पण आज या विषयावर संशोधन होऊन अनेक निष्कर्ष आपल्या समोर येत आहेत त्या निष्कर्षाची एक संभावना म्हणजे Lucy चित्रपट. त्यात बऱ्याच अशा गोष्टी बघायला मिळतात की त्यामुळे आपण थक्क होऊन जातो, पण या अशा चित्रपटांमुळेच आपणही या गोष्टीचा विचार करू लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीरात काही अद्भुत बदल  व्हायला लागतात आणि जेव्हा हे बदल ऐच्छिकरीत्या व्हायला लागतात तेव्हाच त्याला Awakening किंवा 100 Percent Brain Potential असं म्हणतात. आता  हे बदल होताना नेमकं काय होऊ शकतं हे देखील समजून घेऊ...अर्थातच त्या Movie मध्ये दखवल्यासारखे Super Human तुम्ही होणार नाही, पण बऱ्याच अंशी तुम्ही सामान्य माणसांपेक्षा थोडेतरी Different व्हाल.. तर ते बदल काय असू शकतात ते बघू..


◾ 1. Hormone Controlling :

          हा एक प्रकारचा चमत्कार च म्हणू शकता, कारण तुमचे Hormones च तुमच्या वर्तनास कारणीभूत असतात आणि जर तुम्ही ते Control करायला लागलात तर Possibilities are Endless !


◾ 2 . Perception Changes :

          तुमचं बऱ्याच गोष्टींबद्दल च Perception बदलू शकेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील तुमच्या लक्षात येऊ शकेल ज्यामुळे तुमचा विचार करण्याचा पैलू बदलून तुम्ही Reality समजू शकाल.


◾ 3 . Body Control :

          जर तुम्ही तुमचा Brain Unlock करू शकलात तर तुमच्या शरीराचं Remote तुमच्या हातात आलं म्हणून समजा. थोडक्यात काय, तर तुम्ही जितेंद्रिय व्हाल .

         वाचून थोडं Different वाटतंय ना, पण खरंच असं झालं तर तुम्ही एक असामान्य व्यक्ती म्हणून समोर याल. आता तुम्हाला वाटत असेल की हे सर्व खरंच करता आलं तर ? आता त्याबद्दल थोडी माहिती घेऊ..

         आपल्या भारतात बरेच असे व्यक्ती होऊन गेलेत ज्यांना जितेंद्रिय व्यक्ती म्हणत. जे आपल्या brain चा 100℅ वापर करू शकत होते.

          असं म्हणतात कि त्यांनी त्यांच्या सर्व इच्छा, भावना, आणि वासनांवर मात केली होती म्हणून ते असामान्य होते. पण जर तुम्हाला सांगितलं की तुम्हीही हे करू शकता तर ?

          यासाठी तुम्हाला त्यांच्यासारखं सन्यास घेऊन, जंगलात जाऊन बसायची गरज नाही फक्त काही गोष्टींचं पालन करावं लागणार आहे त्या गोष्टी पुढीलप्रमाणे :


◾ 1. ध्यान :

          अध्यात्मिक प्रगतीचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे ध्यान. तुम्ही रोज थोडं थोडं जरी ध्यान करणं सुरू केलं तर तुम्हाला काहीच दिवसात याचे अनुभव यायला लागतील आणि जे काही तुम्हाला आज गूढ वाटतंय त्याची उकल होण्यास सुरुवात होईल.


◾ 2 . Subconscious Designing :

          तुम्ही तुमच्या Subconscious मध्ये तुमची इच्छा एकदा Feed केली की तुम्हाला त्याचे Results मिळणं सुरू होऊन जातं, म्हणून Subconscious ला काही Affirmations देऊन आपण Design करू शकतो. जसं की रोज जेव्हा तुम्ही काही ही करता तेव्हा स्वतः Repeat करत रहा की , "मी जागा आहे"  यामुळे Subconscious Designing होऊन तुम्ही अतिरिक्त विचारांपासून दूर राहणं सुरू कराल आणि त्यामुळे Present Moment मध्ये राहणं सुरू होईल.


◾ 3 . Positive Thinking : 

          तुम्ही जेव्हा Positive विचार करणं सूरु करता तेव्हा त्या विचारांचा तुमच्या Body वर Positive परिणाम दिसणं सुरू होतं परिणामी तुम्ही खुश रहायला लागता. हे इतकं सोपं नाहीये पण Positive Affirmations देऊन तुम्ही हळूहळू ती विचारसारणी आत्मसात करू शकता.


◾ 4 . Mind Challenging :

          जेव्हा तुम्ही रोज आपल्या mind ला challenge द्याल तेव्हा तुमचा शारीरिक आणि मानसिक पातळीवर विकास होण्यास सुरुवात होईल. म्हणून रोज बुद्धीला चालना देणाऱ्या Activities करा.


◾ 5 . Exercise :

          रोज व्यायाम करणे सुरू करा, जेणेकरून तुमच्या शरीराला बळकटी येऊन तुम्ही एक Mind Body Balancing करू शकाल.

          या सर्व गोष्टी सुरू करून तुम्ही तुमचा Overall Intelligent Quotient Develop करु शकता आणि हळूहळू या सर्वच गोष्टी तुम्हाला एक असामान्य व्यक्तित्वाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतिल. थोडक्यात काय, की Spiritual Awakening म्हणा किंवा 100℅ Brain Potential म्हणा या गोष्टी मिळवणं शक्य आहेच कारण ज्यांनी ते मिळवलं ते ही तुमच्या आमच्या सारखे माणसंच होते. ते करू शकतात तर आपणही करू शकतो फक्त त्यासाठी लागते ती जिद्द आणि चिकाटी.


          सांगितलेल्या गोष्टी काही खूप अशा वेगळ्या नाहीयेत. ह्या गोष्टी आपण बऱ्याचदा वाचल्या/ ऐकल्या असतीलच, पण  या गोष्टींचा वापर आपण  कधी करत नाही आणि त्यामुळेच कदाचित जे असामान्य व्यक्ती आहेत त्यांच्यात आणि आपल्यात हा Difference राहतो पण जर तुमचा Brain हे सर्व करून खरंच 100℅ Active झाला तर... पुन्हा म्हणता येईल Possibilities are Endless ! आणि तो अनुभव फक्त तुमचाच असेल.. म्हणून जर खरंच काय होतं जे जाणून घ्यायचं असेल तर प्रयत्न करून बघा !



लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने