विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : Dimension Theory || Psychology
नमस्कार मंडळी मानसशास्त्र ( Psychology ) च्या या भागात आपण विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : Dimension Theory बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये 0th Dimension ते 10th Dimension चा समावेश होतो.
आपल्या मनाची अवस्था एखादया लहान बाळासारखी असते. जसं एखाद्या लहान बाळाला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं तसंच अनेक गोष्टींच कुतूहल आपल्या मनाला असतं, त्यामुळे कधी कधी ब्रम्हांड, वेळ ,चेतना यासारख्या असंख्य गोष्टींचा शोध घेण्याची जिज्ञासा आपल्या मनात जागृत होते, पण तेव्हाच Reality आपल्याला लक्षात येते आणि ती उत्पन्न झालेली जिज्ञासा फक्त एक विचार म्हणून राहते, पण जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही जो विचार करताय तो विचार कुठेतरी सत्यात उतरतोय आणि तसंच खरोखर घडतंय तर?
🔅 भाग 1 🔅
◾ Dimensions Theory :
Dimension म्हणजे आयाम. ज्या प्रकारे आपण physics मध्ये एखादी गोष्ट मापतो, जसं की तापमान Kelvin मध्ये, लांबी Meter मध्ये, वेळ तासांमध्ये, आणि Current ला Ampere मध्ये. तसंच ब्रम्हांडात होणाऱ्या सर्व घटना या Dimensions मध्ये मापतात.
आपल्याला हे माहीतच आहे की हे ब्रम्हांड किती विस्तृत आणि विलक्षण गोष्टींनी परिपूर्ण आहे. अनेक विचारांच्या पलीकडच्या गोष्टी या ब्रम्हांडात आहेत, आणि जसाजसा माणूस विकसित होत गेला तसतसा तो त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागला आणि त्यातूनच अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. त्यात शरीर, मन, भौतिक ज्ञान, पर्यावरण अशा अनेक गोष्टींवर संशोधन होऊ लागलं आणि प्रत्येक गोष्टीसंबंधी एक शास्त्र विकसित व्हायला लागलं. अनेक विषयांवर शास्त्रे तयार व्हायला लागली आणि बऱ्याच गोष्टींचा शोध मानव घेऊ लागला. अशातच ब्रम्हांड आणि आपलं अस्तित्व याबद्दलही कुतूहल निर्माण व्हायला लागलं आणि सुरू झाला शोध मनात येणाऱ्या प्रश्नांचा..
विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : Dimension Theory || Psychology |
पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता रहस्य उलगडू लागले, तसेच आणखी प्रश्न देखील निर्माण होऊ लागले आणि त्यांची उत्तरे शोधताना एक अशी गोष्ट समजली, ज्या गोष्टीमुळे संपूर्ण ब्रम्हांड, आपलं अस्तित्व आणि मिळालेल्या ज्ञानाला पुन्हा एकदा पडताळून पाहण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच उत्पत्ती झाली Dimensions Theory ची...त्यात काही Theories समोर आल्यात त्या म्हणजे String Theory आणि em Theory. आता ही String Theory काय याबद्दल पुन्हा कधीतरी..पण ह्या Theories काय सांगतात ते बघू..
String Theory नुसार ब्रम्हांडात वास्तविकतेत 10 Dimensions असू शकतात आणि em Theory नुसार ब्रम्हांडात 11 Dimensions असू शकतात. मुख्यतः आपण आज हे Dimensions काय असतात आणि याचा Human Consciousness सोबत काय संबंध आहे ते बघणार आहोत.
◾ Types of Dimensions :
आपण अनेकदा कल्पनेच्या जगात वाहवत जातो. एखादी काल्पनिक गोष्ट आपल्याला आनंद देणारी असली की आपलं मन त्याबद्दल अधिकाधिक विचार करून त्यातून आनंद मिळवत असतं. हेच आपल्या मनातल्या दुःखाच्या बाबतीत ही घडतं. मन कधी Positive असतं तर कधी Negative..आणि आपल्याला ही कधी कधी वाटतं की आपण जो काय विचार करतोय ती आपली फक्त कल्पना मात्र आहे पण जर आपल्याला कळालं की आपण जो विचार करतोय तो खरंच कुठेतरी अस्तित्वात आहे आणि तसंच घडतंय तर ?
Actually जे काय तुम्ही विचार करताय Exactly तसंच ब्रम्हांडात कुठेतरी घडत असतं. जिथे ते खरंच घडतं ते फक्त आपल्या Approach च्या बाहेर असतं, पण विज्ञानच सांगतं की आपण तिथे Communicate करू शकतो, म्हणजे कुठेतरी ती घटना आपण खरंच बघू,अनुभवू शकतो. पण मग तशी घटना नेमकी घडते तरी कुठे? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो, तर त्याचं उत्तर आहे 10th Dimension.
10th Dimension एक असं स्थान आहे जेथे तुमच्या कल्पना, कल्पना राहत नाहीत. त्या अस्तित्वात येऊन खरंच तसं काहीं घडतं. आता नेमकं हे काय आहे हे समजण्यासाठी आधी Dimensions काय आहेत ते समजून घेऊया..
विचारांच्या पलीकडचं ब्रम्हांड : Dimension Theory ( सौर्स - Quora ) |
◾ 0th Dimension :
आपल्या अस्तित्वाची सुरुवात देखील शून्यापासून च होते तसंच काहीसं हे देखील आहे.शून्य म्हणजे Nothingness..यबद्दल थोडं जाणून घेऊ..
समजा, निर्सगाने तयार केलेला एखादा जीव आहे आणि तो 0 Dimension मध्ये आहे तर Nothingness नुसार त्याचा ना एक आकार असेल ना एक शरीर, तो फक्त एका ठिकाणी आहे आणि तो 0 Dimension मध्ये असल्यामुळे ना तो पुढे जाईल ना मागे. तो फक्त एका ठिकाणी आहे जे ठिकाण Stable आहे.
याला समजण्यासाठी एका Dot च उदाहरण घेऊ समजा एक Dot आपण एखाद्या कागदावर काढला, त्याला आपण 0th Dimension असं म्हणू..आता होईल काय की त्यात असणारा जीव हा पुढे-मागे, वर-खाली, किंवा जागेवर सुद्धा फिरू शकणार नाही.
आता पुढचं उदाहरण घेऊ ज्यात तुम्हाला हा नेमका मुद्दा लक्षात येईल..
◾ 1st Dimension :
आता कल्पना करा की, 0th Dimension चे 2 बिंदू आहेत, ज्यांना आपण Point A आणि Point B असं म्हणू. आता हे दोन Point काही अंतरावर आहेत असं समजू..त्या Point ला जर समोरासमोर ठेवलं, तर त्यांना Connect करण्यासाठी एक Line आखावी लागेल, त्यामुळे होईल काय की 0th Dimension मध्ये असणारा जीव हा त्या Line च्या आकारासारखा पूढे मागे जाऊ शकेल.याला 1st Dimension म्हणतात. जे मागेपुढे जण्याची क्रिया सुलभ करते.
◾ 2nd Dimension :
आता समजा त्या जीवाला मागेपुढे जाण्यासोबतच डावीकडे किंवा उजवी कडे जायचंय तर आपल्याला त्या उभ्या Line ला Cross करणारी एक आडवी Line काढावी लागेल. याला जर Axis म्हटलं तर लवकर लक्षात येईल. उभ्या Line ला y Axis आणि आडव्या Line ला x Axis म्हणू जसं Graph काढताना तुम्हाला x Axis आणि y Axis असतात अगदी तसंच.
तर ही आडवी Line म्हणजे 2nd Dimension. यामुळे जसा तो जीव मागेपुढे जाऊ शकत होता तसाच तो आता डाव्या किंवा उजव्या बाजूला जाऊ शकतो. जर तुम्ही Mobile वर सापाचा Game खेळला असाल तर थोडक्यात तुम्हाला 2nd Dimension लक्षात येईल, कारण तो Game 2nd Dimension मध्येच आहे. त्याला 2D Game देखील म्हणतात.
◾ 3rd Dimension :
आता समजा या Dimension मध्ये त्या जिवाऐवजी आपण स्वतः आहोत. आता तुम्ही समजू शकता की या Dimension मध्ये आपण मागे-पुढे, डाव्या-उजव्या बाजूला जाऊ शकतो तसंच वर-खाली देखील जाऊ शकतो. यालाच 3rd Dimension म्हणतात. आपलं जग, आपण, आपलं सर्व अस्तित्व याच Dimension मध्ये आहे.
◾ 4th Dimension :
हे Dimension आपल्या अस्तित्वाशी संबंधित आहे. आपलं अस्तित्व हे वेळेशी निगडित आहे. आणि हेच 4th Dimension आहे. थोडक्यात, 4th Dimension म्हणजे time, ज्यात आपण आहोत. Actually, आधीचे 3 Dimension आणि Time हे एकमेकांशी Connected आहेत. ज्याला Space Time असं म्हणतात.
आपण एका निश्चित Timeline वर चालत जात आहोत, जसं की आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एक विशिष्ट Timeline असते. आपण जन्म घेतो, वाढतो आणि शेवटी म्हातारे होतो. हा कालावधी वर्तमानाकडून भविष्याकडे जाणारा असतो, म्हणजे Time हा एका सरळ रेषेत पुढे जाणारा असतो, हा काळ म्हणजेच 4th Dimension.
◾ 5th Dimension :
आधी सांगितल्याप्रमाणे वेळ एका सरळ रेषेत पुढे जाते. पण पूढे जाण्यासोबतच जर आपल्याला डाव्या किंवा उजव्या बाजूला जाता आले तर? याला एका उदाहरणाद्वारे समजू...
समजा तुम्हाला एक Career Select करायचं आहे आणि तुमच्या कडे 2 Options आहेत. 1st Option आहे गायक बनणे आणि 2nd Option आहे Footballer बनणे. तसं बघायला गेलं तर या दोन्ही Options चा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
जर फक्त 4th Dimension च्या पद्धतीने विचार केला तर तुम्ही यापैकी फक्त एकच Option निवडून आयुष्यात त्याच Career मध्ये पुढे जाल. पण 5th Dimension मध्ये तुम्ही हे कामं एकाचवेळी करू शकता. म्हणजे Timeline वर पुढे जाण्यासोबतच तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळून तुमचं Career Change करु शकता. पण जर असं करायचं असेल तर या बाबतीत दोन Parallel Universe होतील. ज्यामध्ये एका Universe मध्ये तुम्ही गायक असाल तर दुसऱ्या Universe मध्ये तुम्ही Footballer असाल. यालाच 5th Dimension म्हणता येईल.
डोकं चक्रावून टाकणारा हा विषय आहे. जितकं समजून घ्याल तितकच क्लिष्ट होत जाणारं याचं स्वरूप आहे. आतापर्यंत आपण 5 Dimensions ची माहिती बघितली...
पूढील 5 Dimension कोणते ? ते कसे चालतात ? त्यांचा आणि आपल्या अस्तित्वाचा काय संबंध ? या प्रश्नांची उत्तरे ही पुढच्या लेखामध्ये पाहायला मिळतील तर संकेतस्थळास भेट देत राहा...
क्रमशः
लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan
◾ MA Psychology +Net
FB : Tushar Gopnarayan Or
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98
Instagram :
@gtushar111
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
◾ MA Psychology +Net
FB : Tushar Gopnarayan Or
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98
Instagram :
@gtushar111
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा