The power of Subconscious mind : अवचेतन मनाची शक्ती || Psychology


          नमस्कार मित्रमैत्रिणींनो , तुम्ही YouTube वर खूप सारे असे motivational videos पाहिले असतील ज्यामध्ये अवचेतन मनाची शक्ती ( Subconscious mind ) या शब्दांचा वापर सर्रास होतो पण त्याची खरी संकल्पना काय आहे हे कोणीच सांगत नाही. Even मानसशास्त्र ( Psychology ) च्या आपल्या भागात खूप वेळा Subconscious चा शब्दप्रयोग झाला . हि संकल्पना आपण या लेखातून पाहूया. 


          मानवी अस्तित्वाची सर्वात गूढ संकल्पना म्हणजे आपलं मन. असंख्य विचार, इच्छा, आकांक्षा या मनात  आयुष्य भर साठवल्या जातात. कधी कधी त्यांचा उपयोग सुद्धा करता येतो आणि कधी कधी त्या भावनांच्या स्वरूपात प्रगट होऊन विचारांच्या माध्यमातून आपल्याला त्रासदायक सुद्धा ठरतात. बहुतेक वेळा या भावना, विचार हे त्रासदायक च ठरतात मग कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की यांना Control करता येईल का? किंवा  जर आपण या मनाला हवं तसं वापरू शकलो तर काय होईल?  आणि जर तुम्हाला सांगितलं की अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला Transform करू शकते किंवा तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण करू शकते तर? चला जाणून घेऊया..
The power of Subconscious mind : अवचेतन मनाची शक्ती || Psychology
The power of Subconscious mind : अवचेतन मनाची शक्ती || Psychology


🔅 अवचेतन मन ( Subconscious Mind ) 🔅


          मानवी मनाचे दोन पैलू पडतात, ते म्हणजे चेतन मन आणि अवचेतन मन. चेतन मन म्हणजे तुमचा Conscious. अर्थात जे काय तुम्ही रोज अनुभव घेता ते सर्व त्या चेतन मनात साठवले जातात.


          उदाहरणार्थ, तुम्ही तुम्हाला आवडणारी एखादी Dish खाता तेव्हा त्याची Taste, त्याची Smell या गोष्टींचा जो अनुभव तुम्ही घेता तो तुमच्या चेतन मनात साठवल्या जात असतो. हा अनुभव काहीवेळ च असतो, जोपर्यंत तुम्ही ती Dish खात आहात तोपर्यंत तो अनुभव तुम्हाला येईल पण एकदा तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा पोट भरलं की मग तुम्ही ते खाणं थांबवता आणि तो अनुभव संपतो.


          याउलट अवचेतन मनाचं आहे. तुम्ही ती Dish खाल्ली तेव्हा तुमचा चेतन मनाचा अनुभव तर संपला पण पुन्हा ती खावीशी वाटणं हा अवचेतन मनाचा भाग होऊन जातो.


          उदाहरणार्थ, तुम्हाला आवडणारी Dish तुम्हाला का आवडते याचा विचार तुम्ही केलात, तर लक्षात येईल की त्याची एक छाप आपल्या अवचेतन मनात साठवल्या गेलीय आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा ते खाण्याची इच्छा होते आणि आपण म्हणायला लागतो की अमुक अमुक माझी Favorite Dish आहे.


          आपलं अवचेतन मन थोडं Mysterious आहे. आपलं व्यक्तित्व, आपल्या आवडीनिवडी यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्या अवचेतन मनावर अवलंबून असतात. आपलं अवचेतन मन हे चेतन मनापेक्षा अधिक Powerful असतं पण हे सुप्त अवस्थेत काम करत राहतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही की काही गोष्टी आपण का करतोय... तर आता मुख्य topic हा की, आपल्याला जर आपलं Subconscious Control करायचं असेल तर काय करता येईल? त्याबद्दल थोडसं..


Reprogram your Subconscious :


          असं म्हणतात की तुम्ही जर तुमचं अवचेतन मन Control केलंत तर तुमच्या साठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. पण नेमकं हे करण्यासाठी काय करावं लागेल ते बघू. Subconscious Reprograming साठी सुरवातीला काही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं असतं त्या पुढीलप्रमाणे-


1. इच्छाशक्ती :


          कुठलंही कार्य करण्यासाठी तुम्हाला इच्छाशक्ती ची गरज पडतेच. इच्छा ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला कुठलंही कार्य करण्यासाठी उद्युक्त करते. म्हणजे तुम्हाला सुरवातीला तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करून कार्य कारण भाव जागृत करावा लागेल. इच्छाशक्ती बाबत अधिक जाणून घेण्यासाठी आमचा मानवी मनाची रहस्यमयी शक्ती : इच्छाशक्ती हा Blog वाचा, म्हणजे तुम्हाला इच्छाशक्ती म्हणजे काय ते समजेल.


2. संकल्प :


          तुम्हाला ज्या कोणत्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या त्या क्षेत्रात प्रगतीसाठी संकल्प करणं अतिशय महत्वाचं ठरतं. Even आयुष्याचा कोणताही भाग असो तुम्ही जेव्हा संकल्प करता तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट दिशा मिळते आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं सुरू करता. Subconscious Reprogramming करतांना तुम्ही संकल्प करणं अपेक्षित असतं कारण त्यामुळे च एक Strict Routine तयार करून तुम्ही तुमचा Subconscious हवा तसा Program करू शकता.


3. ध्यान :


          जोपर्यंत तुम्ही शांतचित्त अवस्था प्राप्त करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही Achieve करायचं असेल तर त्यात अडथळा निर्माण होईल. शांतचित्त अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्वात उपयोगी Technique म्हणजे ध्यान. आयुष्यात काहीही करायचं असेल तर Focus हा महत्वाचा असतो म्हणून कुठलंही कार्य करायचं असेल तर ध्यान आवश्यक च आहे. ध्यानाचे अनेक फायदे आहेत. तुम्ही जर आमच्या Blog चे वाचक असाल तर तुमच्या लक्षात आलं असेलच की ध्यानाबद्दल बऱ्याच Posts मध्ये लिहिलंय, तर तात्पर्य हे की तुम्हाला काहीही करायचं असेल तर पाहिले ध्यान करणं शिका.
The power of Subconscious mind : अवचेतन मनाची शक्ती || Psychology
The power of Subconscious mind : अवचेतन मनाची शक्ती || Psychology


4. स्व संमोहन :


          स्व संमोहन करून सुद्धा तुम्ही तुमचा Subconscious Reprogram करू शकता. स्व संमोहनाद्वारे तुम्ही Directly तुमच्या Subconscious ला Command देऊन तुम्हाला हवा तसा बदल करू शकता. नेमकं स्व संमोहन काय व ते कसं करायचं याबाबत पुढच्या Blog मध्ये सविस्तर देऊच.


5. एकांतवास :


          दिवसाचा काही भाग तुम्हाला एकांतात घालवणं गरजेचं असतं. एकांतवासात तुम्हाला तुमची ओळख व्हायला लागते. आपल्या Mind आणि Thinking च्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही एकांतवासात जाता तेव्हा तुमचा Mind जास्त विचार करत नाही म्हणजे Basically तुमची Brain Activity कमी होते आणि परिणामी तुमची Energy वाचते. त्या Energy चा उपयोग तुम्ही तुमच्या दुसऱ्या एखाद्या कामात करू शकता.


          थोडक्यात काय तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल करून घ्यायचा असेल तर तुमची इच्छा होणे, त्याचा संकल्प करणे आणि त्याची अमलबजावणी करणे महत्वाचे ठरते. एकदा ही Process सुरू झाली की तुम्ही तुमच्या आयुष्यात हवा तसा बदल घडवून आणू शकता. तर आजपासूनच तुमचे Goal Set करा आणि त्या दिशेने तुमचा Subconscious reprogram करणं सुरू करा.




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने