Sixth Sense : पारलौकिक जगताची दिव्य दृष्टी || Psychology
नमस्कार मंडळी या आधीचे जे काही मानसशास्त्रा बद्दल ( Psychology ) चे लेख वाचले असतील तर नक्कीच तुम्हाला या पुढच्या येणाऱ्या लेखाबद्दल अधिक उत्सुकता लागली असणार. तर मंडळी आज आपण अशाच एका मानवाच्या अद्भुत शक्ती विषयी जाणून घेणार आहोत , Sixth Sense : पारलौकिक जगताची दिव्य दृष्टी.. हि शक्ती तुमच्या जवळ असते. Sixth Sense meaning म्हणाल तर त्याचा माणसाचे सहावे ज्ञानेंद्रिय असा उल्लेख करता येईल.
असं म्हणतात की मानवजातीच्या सुरुवातीच्या काळात मानवाला अशा काही गोष्टी, असे काही Senses अवगत होते, जे आपल्या ज्ञानेंद्रियांपेक्षाही खूप जास्त Advanced होते. त्या Sense मूळे त्यांना पारलौकिक अनुभव मिळत असत. जेव्हा हे आज आपल्याला माहिती होतंय तेव्हा साहजिकच त्याबद्दल जिज्ञासा वाढू लागलीय.. त्याबद्दल शोधही घेण्यात आलेत आणि त्यात काही असं मिळालंय ज्यामुळे आज आपल्याला समजतंय की त्यांना बरेच असे विषय माहीत होते जे आज आपल्याला गूढ वाटतील..जाणून घेऊया अशाच एका गूढतेकडे नेणाऱ्या विषयाबद्दल..
🔅 Sixth Sense 🔅
बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट घडण्याआधी त्याबाबद्दल एक अंदाज येतो, किंवा एखादी व्यक्ती सहज आपल्या डोक्यात Pop होते आणि थोड्यावेळात त्या व्यक्तीचा Call किंवा Msg येतो, किंवा कुणीतरी आपल्याला माणसांच्या गर्दीमधून बघतंय असं वाटतं आणि बऱ्याचदा ते खरंही होतं, किंवा एखादा निर्णय, जो तुम्हाला घ्यावाच लागतो पण समजत नाही की आपण का घेतोय, किंवा बऱ्याचदा एखादी घटना अनुभवल्यावर आपण म्हणतो की मला हे असं दिसलंय..
असे अनुभव आपण नेहमीच घेतो, पण ते आपल्या नकळत घडत असतात म्हणून आपण त्या अनुभवांवर जास्त लक्ष देत नाही आणि आपल्याला वाटतं की Coincidence असेल, पण खरंच ते Coincidences असतात का? कधी यावर विचार केलाय का की असं का होतं?
Sixth Sense : पारलौकिक जगताची दिव्य दृष्टी || Psychology |
जे काय अनुभव तुम्ही दैनंदिन जीवनात घेता त्यांची एक छाप तुमच्या Subconscious वर पडत असते आणि त्या सोबतच ते अनुभव तुमची Personality सुद्धा घडवत असतात. पण बऱ्याचदा आपल्याला असे अनुभव येतात जे तुमच्या Conscious आणि Subconscious च्या ही पलीकडचे असतात. जे आपण शब्दात मांडू शकत नाही, बऱ्याचदा आपल्याला ते एखाद्या स्वप्नासारखे वाटायला लागतात, किंवा बऱ्याचदा असंही वाटतं की खरंच आपले विचार सत्यात उतरत आहेत. पण आपण याबाबत विचारच करत नाही आणि हे अनुभव एखाद्या स्वप्नासारखे येतात तसे निघून जातात. पण तुम्ही जर थोडा विचार केला तर हे अनुभव अलौकिक वाटायला लागतात आणि हे अलौकिक अनुभव येण्यासाठी एक विशिष्ट भाग आपल्या मेंदू मध्ये कार्यरत असतो त्याला Sixth Sense असं म्हणतात.
असं म्हणतात की ज्याचा Sixth Sense जागृत होतो त्या व्यक्तीला जगातलं असिमीत ज्ञान प्राप्त होतं. जन्म,मृत्यू यांचं ज्ञान, तसेच हे Universe कसं काम करतं याचही आकलन होतं.यालाच दिव्य दृष्टी असेही म्हणतात. असा व्यक्ती वेळेच्या कितीतरी पुढे असतो. वाचायला थोडं गूढ वाटतंय ना! पण पुढे काही संशोधकांचे अनुभव देखील जे तुम्हाला या बाबीवर विचार करण्यास भाग पडतील..
◾ Magneto Reception :
2019 मध्ये Caltech Institute मध्ये जोसेफ कर्षविंक यांनी एक Article Publish केलं ज्यात Sixth Sense च्या Experiment बद्दल माहिती मिळते. त्यांनी सांगितलं की आपला Brain हा पृथ्वीच्या Magnetic Field ला Record करतो आणि ते सर्व अनुभव तुमच्या Sixth Sense मध्ये साठवले जातात. या Ability ला Magneto Reception म्हणतात.
त्यांनी या Term ची Study केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीवर अनेक पक्षी, जनावरें या Magneto Reception चा वापर दिशा दर्शक म्हणून करतात. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की आपला Brain सुद्धा या Technique चा काही प्रमाणात वापर करतो. त्यांच्या Research मध्ये त्यांनी सांगितलंय की पृथ्वी ची 6 ते 8 Hz Frequency असते आणि जेव्हा त्यांनी ती Frequency आपल्या Brain वर Use केली तेव्हा असं लक्षात आलं की आपला Brain सुद्धा त्याच Frequency वर React करतो.
निकोला टेस्ला च नाव तुम्ही ऐकलं असेलच, असं म्हणतात की तो व्यक्ती त्याच्या वेळेच्या कितीतरी वर्ष पुढे होता. आपल्या एका संशोधनात त्यांना या Frequency बद्दल समजलं होतं आणि त्यांनी सांगितल्यानुसार Human Brain च्या Frequencies या पृथ्वीच्या Frequencies सोबत जुळून येतात आणि जर ह्या Frequencies Electronically Control करता आल्या तर आपण संपूर्ण मानवजातीला Control करू शकतो.
आता काही वर्षांपूर्वी , पृथ्वीच्या Magnetic Field बद्दल Study करताना शोमोलोव नावाच्या एका रशियन वैज्ञानिकाला लक्षात आले की आपला मेंदू हा पृथ्वीच्या Magnetic Field सोबत React करतो. त्यांना संशोधनात लक्षात आले की जेव्हा पृथ्वीवर Magnetic Peak जास्त होतो तेव्हा त्याचा Negative परिणाम मानवी मेंदूवर होऊन त्या Peak Point च्या काळात आत्महत्या जास्त होतात.
जेव्हा या सर्व लोकांना हे कळलं की आपला Mind या सर्व गोष्टींसोबत Connected आहे आणि त्याचा परिणाम Sixth Sense वर होतो , तेव्हा उत्तरं मिळण्याऐवजी एक प्रश्न उभा राहिला की जर इतकं काही आपल्या Sixth Sense मध्ये घडतं तर इतकी सगळी Information आपला मेंदू वापरतो तरी कशी? तर याबद्दल एक Experimental Scientific Explanation वॉल्टर रॉस यांनी दिलं. त्यांच्या संशोधनात त्यांना लक्षात आलं की ही जी Energy Brain मध्ये असते जी Sixth Sense ला प्रभावित करते ती Energy आपल्या मेंदूमध्ये असलेल्या Pineal Gland च्या आजूबाजूला असते. तेव्हा त्यांना वाटलं की कदाचित Pineal Gland आणि Sixth Sense चा काही संबंध असू शकतो म्हणून त्यांनी एक Experiment केलं.
◾ The Ross Experiment :
रॉस ला Sixth Sense बद्दल संशोधन करताना काही अशा विशेष गोष्टी दिसल्यात ज्यामुळे त्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत झाली आणि त्यांनी Experiment करायला सुरुवात केली. त्यांनी एक डोक्यात घालायचा Mask तयार केला, ज्यात Magnets लावलेले होते आणि तो Mask ते Pineal Gland असलेल्या जागेवर घालायला लागले. पहिल्या आठवड्यातच काम करताना त्यांना काहीतरी विचित्र अशी अनुभूती झाली. जेव्हा त्यांना ती अनुभूती व्हायला लागली तेव्हा त्यांना एक विचित्र अशी आकृती दिसली..आणि क्षणार्धात ती अदृश्य झाली. त्यांनी ते Experiment सुरूच ठेवले आणि पून्हा दुसऱ्या आठवड्यात तीच आकृती दिसली पण यावेळी ती जरा बऱ्यापैकी Clear दिसायला लागली, तिने रॉस कडे बघितलं आणि पून्हा अदृश्य झाली. शेवटी तिसऱ्या आठवड्यात रॉस ला अनुभव आला की त्यांची खोली ही एका मोठ्या जंगलाच्या ठिकाणी आहे आणि त्यांना दिसलं की त्यांनी जी आकृती बघितली होती तिच्यासोबत आणखी एक आकृती होती आणि ते झाडाखाली बसले होते त्यांनी रॉसकडे बघितलं आणि क्षणातच रॉस ने ते Mask नेहमीसाठी काढून फेकलं. हे थोडं विचित्र वाटतं पण खरंच असं असेल का हा प्रश्न कधी कधी उपस्थित होतो..
◾ Pineal Gland :
Pineal Gland हा तुमच्या Brain मध्ये जेथे तुमच्या Brain चे दोन भाग पडतात तेथे असतो. Basically तुमच्या डोळ्यांच्या मध्यभागी याला दर्शविण्यात येते म्हणून याला Third Eye किंवा अज्ञाचक्र असेही म्हणतात. याचा आकार Pine सारखा असतो म्हणून याला हे नाव पडलं. Pineal Gland च काम आपल्या शरीरात Melatonin आणि Serotonin तयार करण्याचं असतं, ज्याचा उपयोग शरीराची Biocycle, झोप, शारीरिक वाढ, लैंगिक प्रेरणा, अन्न पचवण्याची प्रक्रिया आणि Hormones Develop करण्यासाठी होतो.
रहस्यमयीरीत्या विचार केला तर Pineal Gland असे Chemicals तयार करतो ज्यांना Beta Carbolines Neural Modulators म्हणतात. जे आपल्याला DMT सारख्या Psychedelic Drugs सारखे Effect देतात जे आपल्याला अलौकिक असे अनुभव घेण्यासाठी कारणीभूत असतात त्याबद्दल कधीतरी...
हे सर्व जाणून घेताना एक विचार असाही येतो की रोसने हे सर्व Effects आपल्या Magnetic Mask द्वारे तयार केले असतील का? हे एक गूढ च आहे.
या एका छोट्याशा भागात इतकी शक्ती आहे की ज्या शक्तीवर विज्ञानाला अजूनही पकड बनवता आलेली नाहीये. मिशिगन विद्यापीठाच्या Scientist जीमो सांगतात , "अजूनही आम्हाला या बद्दल पूर्ण माहिती मिळालेली नाही. कारण यात जे Chemical तयार होतात त्याबद्दल आम्हाला अजून तरी काही विशेष माहिती मिळालेली नाहीये."
जेथे विज्ञान कमी पडतं तेथे अध्यत्म सुरू होतं, आता हेच बघा आज या Topic वर जगात कितीतरी वैज्ञानिक संशोधन करत आहेत आणि आपल्या मानवी इतिहासात याचे अनेक पुरावे आढळून येतात. त्याबद्दल पुढे बघूया..
◾ History of Pineal Gland :
प्राचीन इजिप्त मध्ये आपल्याला याबाबद्दल पुरावे सापडतात . जसे की इजिप्त च्या राजांच्या ममी मध्ये आपल्याला त्यांच्या डोक्यावर कपाळाच्या मध्यात एक विशेष आकृती दिसते. ती विशेष अशी आकृती म्हणजेच 3rd Eye किंवा Sixth Sense आहे. त्या काळात तो एक यशस्वी राजाच्या कारकिर्दीचा एक Symbol असायचा.
The Eye of Horous हा एक प्राचीन ईजिप्शियन Symbol आहे जो Pineal Gland ला Represent करतो.
असेच अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात बघायला मिळतात. भारतात तर याचे अनेक पुरावे दिसतील. आपल्याकडे भगवान महादेवाच्या डोक्यावर तर तिसरा डोळा दखवण्यातच आलेला आहे. त्याव्यतिरिक्त ज्या प्राचीन Civilizations होत्या जसं की , ग्रीक संस्कृती, माया संस्कृती, रोमन संस्कृती या संस्कृतींच्या देवदेवतांच्या डोक्याच्या मध्यभागी आपल्याला एक चिन्ह दिसतं जे की 3rd Eye च प्रतीक आहे.
जगाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विज्ञानाच्या आवाक्या बाहेरच्या आहेत. जग जरी आज यावर संशोधन करत असलं, तरी प्राचीन काळातील लोकांकडे हा Sense होता, आणि त्याचा वापर करून ते अलौकिक अनुभव घेत असत. ते जे अनुभव घेत होते ते अनुभव ते ज्ञान आजही आपल्याकडे आहे फक्त आपल्याला काळानुसार त्याचा विसर पडलेला आहे . अशावेळी एक विचार येतो की आपल्यालाही हा अनुभव घेता आला तर...त्याबद्दल पुन्हा कधीतरी..
लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan
◾ MA Psychology +Net
FB : Tushar Gopnarayan Or
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98
Instagram :
@gtushar111
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
◾ MA Psychology +Net
FB : Tushar Gopnarayan Or
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98
Instagram :
@gtushar111
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला - Click here Khasmarathi
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
➤ Whatsapp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा