Telekinesis : एक अद्भुत शक्ती || Psychology
X Men Movie मधलं एक पात्र आहे Jane. तिच्याकडे अशी एक शक्ती असते, ज्याद्वारे ती वातावरणात असणारी प्रत्येक वस्तू तिच्या इच्छेनुसार बदलू शकते, किंवा Control करू शकते. हे बघितल्यावर आपल्याला पण कधी कधी वाटतं की, अशी एखादी शक्ती आपल्याकडे असती तर किती मजा आली असती..आणि तसलं काही बघून आपणही एखादा प्रयत्न तरी करून बघतोच..पण तशी शक्ती खरंच मिळवणं Possible आहे का? आणि खरंच जर ती मिळाली तर काय होईल ?
आपलं मानवी अस्तित्व म्हणजे निसर्गाने निर्माण केलेलं एक Complex Design... आपल्या अस्तित्वाविषयी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्याला उलगडलेल्या नाहीत. निसर्गाचे चमत्कार आपल्याला आपल्या शरीरातच दिसून येतात.
Telekinesis : एक अद्भुत शक्ती || Psychology |
आता हेच बघा ना, जेव्हा शरीरात ऊर्जा जास्त होते आणि Body Temperature वाढतं, तेव्हा शरीर थंड व्हावं म्हणून लगेच आपल्याला घाम येतो आणि घामामुळे शरीरातील पाणी कमी व्हायला लागते,तेव्हा लगेच तहान लागून आपण पाणी पितो. इतकं सगळं एका Systematic पद्धतीने आपल्या शरीरात सुरू असतं.
आता तुम्ही म्हणाल की यात नवीन काय ? हे तर Science सांगतेच, पण हा जो शोध लागलाय याचा कधीतरी मानवाने विचार केला, त्याचं एक शास्त्र बनवलं आणि म्हणून आज आपल्याला याबाबत माहीत आहे. अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल ही काळानुसार होत गेली आणि आज मानव या पदाला पोहोचलाय की या गोष्टींव्यतिरिक्त ज्या आपल्याला चमत्कारिक वाटतात अशाही गोष्टींचा शोध मानवाने घेणं सुरू केलंय.
मनात येणाऱ्या अकल्पनिय वाटणार्या गोष्टींचा शोध घेऊन त्या प्रश्नांची उकल करणे हा हेतू ठेऊन आज एक असं शास्त्र तयार झालंय ज्यात अशा असंख्य गोष्टींचा मानव शोध घेतो आहे. याच गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे Telekinesis .
🔅 काय आहे Telekinesis ?
Telekinesis ही एक अशी शक्ती आहे ज्याद्वारे वातावरणातील कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या Brain Power ने Control करू शकता. तुम्ही याबाबत कधीतरी Hollywood च्या Movies मध्ये बघितलं असेलच. याबाबत Clear Idea हवी असेल तर Hollywood मधला Chronicles हा Movie बघा, त्यात याबाबत बरंच काही दाखवलंय. पण आपला मुख्य मुद्दा Movies बद्दल नसून ही शक्ती काय आहे याबाबत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की या शक्तीबद्दल आज अनेकांना कुतूहल आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे म्हणून आज याबद्दल बऱ्याच ठिकाणी संशोधन सुरू आहे.
🔅 Telekinesis Possible आहे ?
अमेरिकन शास्त्रज्ञ Eric Haseltine सांगतात, "Making Things Move with Your Mind is Possible!"
याबाबत त्यांनी एक Research Paper मध्ये सांगितलंय की, आपण आपल्या Mind Power ने म्हणजे आपल्या विचारशक्तीने आपल्या सभोवतालच्या गोष्टी बदलू शकतो.त्याबद्दल थोडं जाणून घेऊया..
🔅 Quantum Superposition :
Eric सांगतात की, आपल्या वातावरणात Subatomic Particles असतात जे Electric Carriers असतात ज्यांना आपण Electrons म्हणतो. हे Particles एकाचवेळी संपूर्ण वातावरणात Available असतात.
याबाबत त्यांनी Computer चं उदाहरण दिलंय.आपण जे Computer वापरतो ते Basically Electronic Parts चं एक Machine आहे आणि त्या Machine मध्ये Transistors आहेत. ते Transistors विना Electrons काम करणार नाहीत आणि पूर्ण Computer सुरू करायचं असेल तर त्या प्रत्येक Transistor मध्ये Electrons एकाचवेळी जायला हवेत तेव्हा कुठे ते Computer सुरू होईल. यालाच त्यांनी Quantum Superposition असं नाव दिलंय.
🔅 Quantum Superposition आणि Telekinesis चा काय संबंध ?
जसं आधी सांगितलंय की Electrons हे Computer मध्ये एकाचवेळी जाऊन सुरू झाले की Computer काम करेल तसंच एक न एक Electron आपल्या वातावरणात आहे आणि तुमचा Mind हा एक प्रकारचं Transistor आहे.
जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या डोक्यात Electromagnetic Fields तयार होतात आणि ते तुमच्या डोक्यातील Electrons ला Activate करतात, त्यामुळे ते Activation तुमच्या डोक्याच्या आतल्या आणि बाहेरच्या वातावरणाला Affect करतं. जेव्हा तुम्ही एखादा Energy प्रक्षेपित करणारा विचार करता तेव्हा Electric Field तयार होऊन ती काही प्रमाणात Electrons ला मागे पुढे Push करते. यात एक Possibility आहे, ती म्हणजे जर तुम्ही ते Electrons Control केलेत तर तुम्ही Basically वातावरणातील कोणतीही गोष्ट Control करू शकता. Telekinesis नेमकी हीच Process आहे.
◾ Possibilities काय असतील ?
जर ही शक्ती तुम्हाला मिळालीच तर काही गोष्टी तरी खरंच Possible होऊ शकतील ज्यांना आपण Superpower म्हणू शकू. त्याबद्दल थोडंस.. ( हा फक्त एक अंदाज आहे )
1. वस्तू Control करणं :
ह्या शक्तीचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे वातावरणातील वस्तूचं Control घेणं, जर तुम्हाला ती शक्ती मिळालीच तर तुम्ही वातावरणातील सर्व वस्तूंचं Control घेऊ शकाल.
2 . Anti Gravity :
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या शक्तीवर चालत नाही. तुम्हाला जर ही शक्ती मिळालीच तर गुरुत्वाकर्षण तुमच्यावर काम करणार नाही त्यामुळे हवेत उडणं कदाचित Possible होऊ शकेल.
3 . Matter Control :
वातावरणातील जे काय Matter असेल, ज्यात Electrons आहेत असं सर्व च तुमच्या Control मध्ये राहू शकतं.
4 . Magnetism Control :
पृथ्वीवर Electromagnetic Waves आहेत जर तुम्ही ही शक्ती मिळवली तर Electromagnetic Energy तुम्ही Control करू शकाल आणि कदाचित त्यामुळे Possibilities Are Endless असं ते काम होऊ शकतं.
◾ अध्यात्म काय सांगतं ?
त्राटक, ध्यान साधना, किंवा एकाग्रता वाढवणाऱ्या गोष्टी तुम्हाला अशी सिद्धी मिळवून देण्यास फायदेशीर ठरू शकतात. पण त्यातून खरंच तसं काही मिळू शकते का हे शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःला च ते शोधावं लागेल. आणि त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.
◾ भविष्याचा वेध
आज जरी हे सर्व अशक्य वाटत असलं तरी भविष्यात असे काही Devices येतील ज्यामुळे आपण ही शक्ती विकसित करू शकू. जसं आज Bluetooth आहे तसंच पुढे Telekinesis वर संशोधन होऊन जर Mind Waves वाढवणारे Devices आलेत तर कदाचित Electron Control करणं शक्य होऊ शकतं आणि जर तसं झालं तर Telekinesis ही एक आज आपल्याला माहिती असणाऱ्या बऱ्याच Common गोष्टी सारखी एक गोष्ट होऊ शकते. पण Possibilities सुद्धा खूप आहेत आणि त्यावरच उत्तर वेळच देऊ शकेल.
थोडक्यात काय ज्या कधी काळी कल्पना वाटायच्या त्या कल्पना आज सत्यात उतरत आहेत. कदाचित भविष्यात ही एक कल्पना मात्र न राहता खरंच एक सामान्य गोष्ट होऊ शकते. याबाबत अनुभव घ्यायचा असेल तर एक च मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतः प्रयत्न करून बघा आणि जमलंच आणि ती शक्ती मिळालीच तर Possibilities are Endless !
लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan
◾ MA Psychology +Net
FB : Tushar Gopnarayan Or
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98
Instagram :
@gtushar111
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
◾ MA Psychology +Net
FB : Tushar Gopnarayan Or
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98
Instagram :
@gtushar111
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा