जीवनतंत्र - " प्रेम ( Love) " || वैचारिक

     #जीवनतंत्र - ६. प्रेम

          सामान्यत:  मराठी लोकांमध्ये, मराठी चित्रपटांमध्ये दोन गोष्टींचं प्रचंड वेड दिसून येतं.... (या दोनच गोष्टींच वेड आहे असा गैरसमज करून घेऊ नये....मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात केव्हा पण पुढेच असलेला नेहमी दिसतो! )

१. दोस्ती
२. प्रेम

          बॉलिवूड मूळे असेल म्हणा अथवा मराठी चित्रपटांमुळे प्रेम नावाची संकल्पना प्रचंड हृदयात घर करून जाते.... !


          मात्र भिन्नलिंगी असेल अथवा समलिंगी प्रेमापेक्षा स्वार्थ , वासना आणि फक्त  लैंगिक सुखाला हल्ली प्रेम नाव दिलं जात आहे!     
     
          खासकरून  पॉर्न च्या वाढत्या प्रभावामुळे तर सेक्स आणि प्रेम हे वेगळे नसून एकच आहेत असा अनेकांचा भ्रम होतोय....


          त्यात मागच्या काही वर्षांमध्ये जर अभ्यास केला गेला तर प्रमुख शहरांत दर दोन तासाला एका स्त्री वर बलात्कार होतो .....जरा विचार करा ही फक्त ज्यांची नोंद होते ज्या case पोलिसांपर्यँत जातात त्यांची आकडेवारी आहे.... 


          [यात पण माझ्या मते तरी विनयभंग सारख्या अनेक केस फक्त वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केल्या गेलेल्या असतात. ]


          बाकी विनयभंग ची आकडेवारी तर वेगळीच आणि महत्त्वाचं म्हणजे जी सर्वात प्रगत शहरे मानली जातात तिथे हे प्रमाण कित्येक पट जास्ती आहे ....


          यातसुद्धा  लोकांचा एक फार मोठा गैरसमज होतो तो म्हणजे अत्याचार फक्त स्त्री वर्गावरच होत आहेत ..... कित्येक लहान निष्पाप मुले आणि तरुण देखील यात बळी जात आहेत याची अनेकांना अजून देखील कल्पना पण नाहीये येत्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण कित्येक पटीने जास्ती वाढलेले दिसेल तेव्हाच लोकांना असं ही काही होतं र बाबा असं समजेल..... कारण आपल्या इकडची जुनी प्रथा आहे जोपर्यंत रोग मोठा होत नाही तोपर्यंत त्याकडे लक्ष द्यायचं नाहीच...!

जीवनतंत्र - " प्रेम ( Love) " || वैचारिक
जीवनतंत्र - " प्रेम ( Love) " || वैचारिक

   
          असो.... विषय प्रेमाचा आहे तर प्रेमाकडेच वळू... !


          तर सामान्य पणे तुमच्या कुण्याही मित्र मैत्रिणीला तुला gf/bf आहे का .... असं विचारण्याऐवजी का आहे हे जर विचारलं तर शेवट शारीरिक गोष्टींमध्येच दिसतो.....!


          हल्ली पोरींमध्ये एक ट्रेंड सुरू असलेला दिसतो मुलांमध्ये तसा जुनाच आहे म्हणा ..... की एखाद्या मैत्रिणीला bf आहे म्हणलं की विषय संपलाच तिला आहे मग मला पण असायला हवाच....!


          "पोरगी पटवायची.... आयटम बनवायची... gf असलीच पाहिजे... सगळे करतात मग आपण का नाही?" असे खूप सारे संवाद मुलांमध्ये दिसतात.....


          त्यात पण ज्याला gf आहे तो hero ज्याला नाही तो 0 समजला जातो....


          मात्र, या सर्व valentine साठी ... लोकांना दाखवायला....चारचौघीत मिरवायला....अथवा शरीरसुख घ्यायची आवड असलेल्या उत्साही तरुणी-तरुणांना  जर कोणी रोखठोक प्रश्न केलाच की ....भैय्या रे /ताई गं.... तुला bf/gf हवी आहे पण नेमकं कशासाठी?


          आणि याच उत्तर जर ते प्रेम देत असतील तर कुठेतरी फार मोठी गफलत होत आहे.... कारण जी गोष्ट हवी असते ती एक गरज असते.... आणि प्रेम हे कधीच करता येत नसतं ते आपोआप होत असतं...!

   
          जीवनतंत्र च्या या ६. प्रेम या भागात तुम्हाला पुढील गोष्टींबाबत सांगण्यात येईल :-

१. प्रेमात कधी 'पडायचं'  ?
२. शरीरसुख कधी-कसं घ्यायचं?
३. पॉर्न बघायचा की नाहीच?
४. पॉर्न ची सवय लागली असेल तर     
     कशी सोडायची!
५.  प्रेमातून बाहेर कसं पडायचं!


          वरील विषय कोणाला  चुकीचे अथवा कोणाला बरोबर पण वाटतील मात्र काळाची गरज आहे म्हणून सर्व विषयांचा समावेश या भागांमध्ये करत आहे!


#टीप - इतर कोणत्याही टॉपिक ची गरज वाटल्यास नेहमी सारखं Comment Box मध्ये कळवावे :)


~ लेखक : S.J.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने