जीवनतंत्र - " पैसा ( Money ) " || वैचारिक
#जीवनतंत्र - ५. पैसातसं तर प्रेमाचा आठवडा आहे त्यामुळे खरं तर प्रेमावर लिहायला हवं होतं मात्र जीवनतंत्र series लिहिण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण कोणते असेल तर हा "पैसा" हाच तो विषय...त्यामुळे या आठवड्यात भाग ५ पैसा आणि भाग - ६ प्रेम असं समांतर लिहिणे सुरूच राहील !
नक्कीच तरुण वयात असलेल्या अनेक मित्रांना सतावणारा [मी सर्वोत्तम उदाहरण असेल याबाबतीत :p ] अथवा घडवणारा अनेकांना बिघडवणारा सुद्धा..... पैसा !!
जीवनतंत्र - " पैसा ( Money ) " || वैचारिक |
त्यामुळे या भागाचा आधीच्या भागांपेक्षा जास्तीत जास्त होईल तितका लाभ घ्यावा ही विनंती विशेष!!
#जीवनतंत्र च्या भाग 1 मध्ये तुम्हाला मी स्वतःची ओळख करून घ्यायला सांगितलं होतं..... अर्थातच तुम्ही करून घेतली नसेलच पण काही हरकत नाही आज मी तुम्हाला संपूर्ण जगाला धावतं ठेवायला भाग पाडणाऱ्या शक्ती विषयी सांगणार आहे..... अर्थ, पैसा, संपत्ती काहीही म्हणू शकता.....निदान याची तरी नीट ओळख करून घ्याच....जितक्या लहान वयात या गोष्टी समजतील तितकी तुमची आयुष्यात जास्ती प्रगती असेल हे लक्षात घ्या!!
उद्योजक असलेल्या लोकांसाठी, शेतकरी मित्रांसाठी, अर्थशास्त्राच्या अभ्यासाची आवड असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी .... नक्कीच वरील शब्दांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतीलच मात्र शैक्षणिक आयुष्य सोडून आपण व्यावहारिक जीवनाचं मर्म समजून घेत असल्याने सर्वांचा अर्थ एकच घ्यावा !
जगात कुठेही गेलात मग जंगलात जावा, की समुद्रात..... अथवा आकाशात अथवा मग अवकाशात, शहरात जावा अथवा खेड्यात .... माणसांत जावा अथवा प्राण्यांत..... प्रत्येक ठिकाणी असा 'एक विशिष्ट वर्ग' असतो ज्यांचा दरारा खूप असतो....या वर्गातील कोणत्याही सदस्याला त्यांच्या क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी ते कोणत्याही वेळी जाऊ द्या योग्य तो मान पान मिळतोच!
या विशिष्ट वर्गाला त्यांच्या क्षेत्रात मोलाचा आदर इतरांकडून कधी स्वेच्छेने तर कधी "दयावाच लागतो राव" म्हणून दिला जातो .....!
तो विशिष्ट वर्ग म्हणजे अर्थातच "श्रीमंतांचा वर्ग" .... !
आता कमी समज असणारे विचार करतील की प्राण्यांमध्ये अशी श्रीमंती असते का राव कुठे? तर भावांनो ....वरील प्रत्येक ठिकाणी नीट विचार करून बघाल तर त्या प्रत्येक क्षेत्रातील प्रचंड दरारा असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी मानपान मिळणाऱ्या व्यक्ती प्राणी पक्षी जलचर उभयचर यांच्याकडे काही गोष्टींची प्रचंड श्रीमंती असतेच ...अर्थातच आपल्या पुढील प्रत्येक लेखातील ही संपत्ती ही श्रीमंती म्हणजे हा "पैसा" असेल इतकंच लक्षात ठेवा !!
आता या भागाला आपण थोडेसे जास्ती सविस्तर पणे खालीलप्रमाणे पाहणार आहोत....
५.१ श्रीमंती म्हणजे काय?
५.२ पैसा का कमवायचा?
५.३ पैसा कसा कमवायचा?
५.४ पैसा कसा टिकवायचा ?
५.५ पैसा कसा वाढवायचा?
भेटू या मग पुढल्या भागात ...!
~ लेखक : S.J.
टिप्पणी पोस्ट करा