जीवनतंत्र - " बुद्धी ( Wisdom ) " || वैचारिक  

जीवनतंत्र - " बुद्धी ( Wisdom ) " || वैचारिक
जीवनतंत्र - " बुद्धी ( Wisdom ) " || वैचारिक

#जीवनतंत्र

जीवनतंत्र - ४. बुद्धी


🔅 भाग  2 🔅


एक छोटा प्रयोग


       नेमकं नाव घेऊन सांगता येणार नाही मात्र एक शास्त्रज्ञ होता ...     
      त्याच्याकडे शिकायला म्हणून एक विद्यार्थी आला !


     तर त्या शास्त्रज्ञाने त्याला एका  छोट्याश्या खोलीत नेहून तिथे फक्त aquarium ज्यात एक मासा होता आणि त्याचं निरीक्षण करता येईल आणि मांडता येईल असं साहित्य ठेवलेलं होतं....


     त्या शास्त्रज्ञाने त्या विद्यार्थ्याला फक्त तुला जितकं निरीक्षण करता येईल तितकं कर आणि 7 दिवसांनी मला सांग असं सांगितलं आणि महाशय निघून सुद्धा गेले!!


    पहिले 2 - 4 दिवस विद्यार्थ्याने असच एक भांड आहे त्यात मासा आहे त्याचा रंग सोनेरी आहे अशी वर वरची माहिती लिहिली..... 7 दिवसांनी गुरुला दाखवलं ...त्या शास्त्रज्ञाने इतकं पुरेसं नाहीये अजून 7 दिवसांनी मला भेट असं बोलून तडक निघून पण गेले..... विद्यार्थ्याची फारच निराशा झाली मात्र शिकण्याची तीव्र इच्छा असल्याने तो परत 7 दिवस तिथे बसला ...त्याने जिद्दीने मेहनत घेतली....आणि यावेळी मात्र त्याला खूप काही नवीन नवीन गोष्टी दिसून आल्या..... जसं की त्या माशाच्या शरीराची रचना फारच विशिष्ट प्रकारे केलेली आहे... त्याच्या श्वसन करण्याची पद्धत.... त्याच्या पापण्यांची रचना.... इथपासून सममिती मध्ये असलेल्या शरीराचा एक ना एक भाग .....

परत शास्त्रज्ञ आला आणि परत तो इतकं पुरेसं नाहीये अजून 7 दिवसांनी भेट बोलून निघून पण गेला....


जीवनतंत्र - " बुद्धी ( Wisdom ) " || वैचारिक
जीवनतंत्र - " बुद्धी ( Wisdom ) " || वैचारिक


  विद्यार्थी पण चिकाटीने मेहनत घेत होता .... मात्र तुम्हाला माहिती आहे का?? त्याला बऱ्याच नवीननवीन गोष्टी यावेळी दिसून आल्या....आणि जे पहिल्यांदा त्या माशाला बघताना त्याने साफ साफ miss केलं होतं ती प्रत्येक गोष्ट त्याला यावेळी समजून चुकली..... !


     या एका छोट्याशा प्रयोगाने त्याची संपूर्ण नजरच बदलून गेली होती.... नेहमीपेक्षा तो जास्त काहीतरी ग्रहण करू लागला होता !!


      तुम्ही पण हा प्रयोग आयुष्याच्या शाळेत नक्की कराच.... जी माणसं तुम्ही रोज बघता त्यांचं निरीक्षण करा.... शहरी भागात असाल तर गाड्यांची निरीक्षणे करा.... जितकं जास्तीत जास्त निरीक्षण कराल तितकं जास्तीत जास्त तुम्हाला दिसू लागेल.....

   
    कान नाक त्वचा अशा प्रत्येक इंद्रियांच्या  बाबतीत सुद्धा हाच नियम लागू पडेल हे वेगळं सांगायला नको..... !


    हे आपलं कौशल्य  खरं तर उपजतच आपल्या मध्ये असतं गरज  असते ती त्यांना योग्य दिशा देऊन सरावाने वाढवण्याची!!

   
     सर विश्वेश्वरय्या एकदा  रेल्वे गाडीने जात असताना त्यांनी अचानक उठून चेन ओढून गाडी थांबवली होती पोलिसांनी कारण विचारलं असता त्यांनी पुढे रेल्वेचे रूळ उखडलेले असतील आणि त्यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो म्हणून असं केल्याचं सांगितलं..... जेव्हा तपासलं गेलं तेव्हा हे सत्य असल्याचं दिसून आलं!!


    ही बुद्धीची ताकद आपल्या सर्वात आहेच फक्त जो जितका सराव करेल तितकीच जास्त ही ताकद वाढत राहिल हे समजायला हवं!


    पुढील काही भागात तुम्हाला Skills ( कौशल्ये ) , श्रध्दा ,  अर्थ (अर्थातच पैसा ), शिक्षण अशा काही गोष्टींवर सांगण्याचा प्रयत्न करेल.... तुम्हाला अजून कोणत्याही विषयावर ऐकायचं असेल अथवा यातील नेमकं कोणता विषय आधी घ्यायला हवा असं वाटतं ते comment करून नक्की कळवा !


~ लेखक : S.J.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने