Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology


         मित्र आणि मैत्रिणींनो मानवी अस्तित्व चेतनेवर आधारलेलं आहे.  तुम्ही, तुमचं शरीर, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा Ego, सर्व चेतना असेल तर च काम करतं. थोडक्यात काय तर चेतनेला तुम्ही तुमचा जीव, आत्मा काहीही म्हणू शकता. पण जर हीच चेतना विभक्त केली तर? म्हणजे थोडक्यात तुमचा आत्मा काढून दुसरं एक प्रतिरूप तयार केलं तर? चला जाणून घेऊया Searching Consciousness शोध चेतनेचा..
Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology
Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology

          अध्यात्मात, चराचरात चेतना आहे असं म्हणतात. संपूर्ण सृष्टी ही चेतना च आहे असंही सांगण्यात येतं. म्हणजे आपण सुद्धा त्या चेतनेचाच एक भाग आहोत असं त्यावरून समजू शकतं. पण मग अशावेळी हा ही प्रश्न उद्भवतो की नेमकी ही चेतना आपल्या शरीरात आहे तरी कुठे?



          आता बघा...आपले विचार, भावना, आपलं व्यक्तिमत्व, हे सर्व शरीराच्या एकाच अवयवामुळे कार्यन्वित होत असतं. तो अवयव म्हणजे मेंदू. आता जर आपली चेतना त्या मेंदू मध्ये असेल तर Hemispherectomy केली तर आपण तेच व्यक्तिमत्व राहू का? असा प्रश्न उदभवतो. 
चेतनेवर भाष्य करण्याआधी Hemispherectomy काय प्रकार आहे ते जाणून घेऊया..


◾ Hemispherectomy :


          मानवी मेंदूचे दोन भाग पडतात, त्यांना Brain Hemisphere असं म्हणतात. आपण डाव्या हाताने काम करावं की उजव्या हाताने हे आपण मेंदूचा कोणता भाग वापरतो यावर अवलंबून असतं.


          Hemispherectomy ही एक अशी प्रक्रिया असते ज्यात  मेंदूचा एक भाग काढून टाकण्यात येतो. ही प्रक्रिया साधारणतः खूप कमी वय असलेल्या लोकांसाठी करण्यात येते. ज्यांना Seizures येतात त्यांच्या मेंदूचा एक भाग काढून टाकण्यात येतो. म्हणजे त्यांना तो त्रास होत नाही. तसंच कमी वयात ही प्रक्रिया केल्यामुळे त्यांचा मेंदू दोन्ही भागाचं काम Adopt करून घेतो.
Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology
Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology
          पण इथे काही प्रश्न उदभवतात. जर तुम्ही मेंदूच्या एका भागावर जिवंत राहू शकता, तर समजा एक भाग दुसऱ्या शरीरात टाकून त्याला जिवंत करता आलं तर? तेव्हा नेमकं तुमचं अस्तित्व काय असेल? म्हणजे तुम्ही, तुम्ही असाल जो तुमच्या शरीरात मेंदू आहे त्याचे अनुभव, त्याचं Perception हे तुम्हालाच कळेल, पण त्या दुसऱ्या भागाचं काय? कारण तो देखील तुमचाच मेंदू आहे. त्याचं काय अस्तित्व असेल? किंवा तुम्ही जे काय अनुभव करता ते खरंच तुम्ही आहात का? येथे तुमचा Consciousness काय हे समजायला सुरुवात होते.


◾ Consciousness :


तुम्हाला तुमची चेतना समजून घ्यायची असेल तर हे एक उदाहरण बघा...

          जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघायला लागलात आणि Feel केलंत तर तुमच्या लक्षात येईल, की आपण या हाड मास असलेल्या शरीरात आहोत आणि आपल्या डोळ्यांच्या साह्याने ती गोष्ट बघत आहोत. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण जे काय Feel करतोय किंवा जे काय आपल्यासोबत घडतंय, ते सर्व एका Point of View ने आपल्याला दिसतंय, म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही एका Perspective ने बघत असता. 


          तो जो अनुभव आहे किंवा ती जी काय भावना आहे जे तुम्ही शरीराच्या माध्यमातून घेता तेव्हा तुमचं अस्तित्वच वेगळं आहे असं तुमच्या लक्षात येईल आणि तेच अस्तित्व म्हणजे तुमची चेतना. आता जर तुमच्या मेंदू चा एक भाग दुसऱ्या शरीरात टाकला तर ते सुद्धा तुम्ही च असाल की ते एक वेगळं व्यक्तित्व असेल? हे समजण्यासाठी एखाद्या AI Program चं उदाहरण घेऊ..


◾ A I Program :


          आज आपल्याला Artificial Programming केलेले Programs दिसतात. Mobile मध्ये आजकाल Alexa, किंवा Google Voice सारखे Programs तुम्ही बघितले असतीलच. ते तुम्हाला काही Suggestion सुद्धा देतात. किंवा त्यांच्या Interactive Services चा वापर करून तुम्ही त्यांच्याशी बोलू सुद्धा शकता, पण ते जिवंत नसतात. म्हणजे Basically त्यांच्याकडे चेतना नसते. ते अपल्यासारखं Feel करू शकत नाहीत. किंवा त्यांच्याकडे त्यांचं अस्तित्व नसतं. ते आपल्याला उत्तरं देऊ शकतात कारण त्यांची तशी Programming केलेली असते.

          आता हा प्रश्न पडतो की जर ते चेतना रहित आहेत पण आपल्या समस्यांना उत्तरं देऊ शकतात तर त्यांना काय म्हणता येईल? किंवा आपल्या शरीराच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या शरीरात मेंदूचा दुसरा भाग टाकलाय ते नेमकं काय असेल? त्याचं अस्तित्व काय असेल? येथे Philosophical Zombie ची संकल्पना येते.
Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology
Searching Consciousness : शोध चेतनेचा || Psychology


◾ 
Philosophical Zombie :


          ही एक अशी संकल्पना आहे, ज्यात एक असा जीव असतो जो आपल्याला Suggestions देतो, मदत सुद्धा करतो आपल्यासारखाच सर्व काम करतो पण त्याला संवेदना नसतात. तो कुठलीही गोष्ट Feel करत नाही. तो मानवासारखाच असतो पण त्याचं अस्तित्व नसतं. तो फक्त एखाद्या Robot सारखा एका विशिष्ट कार्यपद्धती वर Respond करतो.आता हे असं का होतं याबद्दल विज्ञानाकडेही उत्तर नाहीये आणि कधी याचं उत्तर मिळेल हे सुद्धा सांगता येणार नाही. मानवी मानसिकतेचा अभ्यास करताना आपल्याकडे फक्त मानवी विकृतींचा आणि मानसिक समस्यांचा अभ्यास करणारंच शास्त्र उपलब्द्ध आहे ते म्हणजे मानसशास्त्र.


◾ भविष्याचा वेध :


          आता या विषयावर संशोधन सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे आपली चेतना आणि तिचं अस्तित्व या विषयी आज वैज्ञानिक शोध घेत असून, त्यामुळे आत्मा, चेतना, सूक्ष्म शरीर या सर्व बाबी हळूहळू समजयला लागल्या आहेत. आपली चेतना आपलं हे शरीर सोडल्यावर कुठे जाते किंवा तिच चेतना कुठे Transfer करता येईल का यावर आज प्रयोग सुरू असून भविष्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील अशी अपेक्षा. तोपर्यंत चेतना आणि त्याचं अस्तित्व समजून घ्यायचं असेलच तर अंतर्मुख होऊन स्वतः च शोध घेऊन पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं उत्तम असेल.




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने