मानवी शरीरातील अदभुत शक्ती : कुंडलिनी ( Kundlini ) || Psychology


          मनुष्य जीवनाचं रहस्य उलगडणारी एक अद्भुत अशी शक्ती म्हणजे कुंडलिनी. अध्यात्मिक अभ्यास करताना बऱ्याच वेळी ही संकल्पना आपल्यासमोर येते. आपल्याला असिमीत अशा काही शक्ती कुंडलिनी जागरण झाल्यावर मिळतात असे आपले शास्त्र सांगतात. पण खरंच ते सांगतात तसं काही घडतं का ? म्हणजे तुम्ही एखादी Superpower मिळवून काही चमत्कार करू शकता का? आणि हे जर सत्य असेल तर असं काय करता येईल की ती शक्ती आपल्याला मिळेल? चला जाणून घेऊया मानवी शरीरातील अदभुत शक्ती (The supernatural power in the human body) : कुंडलिनी ( Kundlini ).
मानवी शरीरातील अदभुत शक्ती : कुंडलिनी ( Kundlini ) || Psychology
मानवी शरीरातील अदभुत शक्ती : कुंडलिनी ( Kundlini ) || Psychology


◾ कुंडलिनी साधना :


          आपल्याला या शरीरात अशा अनेक गोष्टी दिसून येतात ज्या कधी कधी चमत्कारिक वाटतात. म्हणजे बघा शरीर तापायला लागलं की ते थंड करण्यासाठी घाम येतो. शरीरात पाण्याची कमतरता झाली की तहान लागते. शरीर थकायला लागलं की झोप यायला लागते किंवा बऱ्याचदा एखादी गोष्ट करताना अचानक पणे तुम्हाला अशी Energy मिळते की तुम्ही लवकरात लवकर ती गोष्ट करू शकता. 

हे सर्व जर निरीक्षण करून बघितलं तर असं वाटायला लागतं की ह्या सर्व गोष्टी तर एखाद्या विशिष्टप्रकारे चालणाऱ्या System  सारख्या आहेत.

          जेव्हा ही गोष्ट लक्षात यायला लागते, तेव्हा या शरीराचं अस्तित्व आणि यात चालणाऱ्या असंख्य गोष्टी बद्दल कुतूहल वाढायला लागतं. अशावेळी वाटतं की मी जो या शरीरात राहतोय ते शरीर माझ्या इच्छे प्रमाणे खरंच कार्य करायला लागलं तर काय होईल? म्हणजे जेव्हा आपण आपलं शरीर समजून घेण्यास सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की अशा बऱ्याचशा शारीरिक क्रिया आहेत ज्या आपल्या Control मध्ये नाहीत आणि जेव्हा हे समजतं तेव्हा कुठेतरी त्यांचं ही Control असावं असं वाटायला लागतं. मग सुरू होतो शोध आपल्याच अस्तित्वाचा आणि त्या शोधात आपण उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. 


          जेव्हा प्रयत्न सुरू होतात तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात पण समाधान होत नाही. मग अध्यात्म म्हणा किंवा मानसशास्त्र म्हणा यांचा आधार घेऊन काही चिकित्सक व्यक्ती स्व अस्तित्वाचा शोध घ्यायला लागतात आणि तेव्हा एक साधना त्यांना सांगण्यात येते ती म्हणजे कुंडलिनी साधना.
या साधनेबाबत बरंच काही साहित्य वाचायला मिळतं, नेमकं यातून काय होतं यावर अध्यात्मात उत्तरं दिलेली आहेत पण आज विज्ञान सुद्धा यावर संशोधन करत असून त्यावर भाष्य करण्यासाठी हा लेख..


◾ कुंडलिनी म्हणजे काय ? ( आध्यत्मिक आणि वैज्ञानिक पैलू ) : 


          मानवी अस्तित्वाची ओळख करून देणारी, तसेच मानवाला पूर्णत्वास नेणारी एक शक्ती म्हणजे कुंडलिनी अशी एक सामान्य व्याख्या करता येईल. पण यावर आज काही संशोधन सुरू आहे आणि त्यामुळे या संज्ञेचे दोन पैलू पडतात ते पैलू पुढीलप्रमाणे-


◾ अध्यात्मिक पैलू :


          याबाबत आधी आध्यत्मिक पैलू काय आहे हे जाणून घेऊ.
कुंडलिनी बद्दल अध्यात्मात बरंच काही सांगून ठेवण्यात आलेलं आहे. जसं की पारलौकिक अनुभव अज्ञाचक्र जगृत झाल्यावर येतात असं म्हणतात. हे तर फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलंय, वास्तविकतेत याही पलीकडे काही अनुभव येतात असं म्हणतात, पण ते अनुभव घेण्यासाठी साधना सांगितलेली आहे, त्यात योगाभ्यास, ध्यान, आणि तत्सम गोष्टींचा समावेश होतो.


          भारतात अनेक गुरू होऊन गेलेत ज्यांनी ही साधना करून स्व अस्तित्वाची ओळख करून घेतली. असं आपल्याला बऱ्याचदा वाचनात आलं असेल किंवा माहिती असेलच, पण त्या लोकांना जे काय मिळालं ते फक्त त्यांच्यापर्यंत च मर्यादित होतं असं आपण म्हणू शकतो. कारण ते सर्व मिळवण्यासाठी त्यांना स्वतः ती साधना किंवा ते तप करावं लागलं आणि ते जे काय आहे ते मिळवल्यावर सुद्धा सामान्य माणसाला ते समजेलच असं नव्हतं. पण तरीही शास्त्र म्हणा किंवा गुरू शिष्य परंपरेतून म्हणा ही साधना जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न झालेलाच आहे, पण तरीही या सर्व गोष्टी सामान्य लोकांच्या समजुतीच्या पलीकडे आहेत असं आपण म्हणू शकतो कारण त्यात बऱ्याच अलौकिक संकल्पना आहेत, पण आज विज्ञान सुद्धा या विषयावर संशोधन करून बऱ्याच रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता विज्ञान यावर काय भाष्य करतं हे बघूया..


◾ वैज्ञानिक पैलू :


          आज यावर संशोधन होऊन अशा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत ज्याद्वारे आपल्या शरीराची आणि मनाची स्थिती काय आहे आणि त्यावर या साधनेद्वारे कसं Control मिळवता येईल हे आज विज्ञान सांगतं. पण हे समजण्याआधी चक्र काय आहेत आणि आपल्या शरीरातील Glands याबाबत थोडं समजून घेऊया.

विज्ञान आज चक्र आणि Glands यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो यावर संशोधन करत आहे आणि संशोधनाअंती लक्षात यायला लागलंय की आपल्याला जे कुंडलिनी साधनेत चक्र सांगण्यात येतात त्यांचा आणि आपल्याला शरीरातील Glands चा संबंध आहे.



◾ चक्राची संकल्पना :


          कुंडलिनी साधनेत आपल्याला आपल्या प्राणिक शरीराच्या जाणिवेसाठी चक्र जागरण सांगतात. ते चक्र म्हणजे 

1. मूलाधार  
2. स्वाधिष्ठान  
3. मणिपूर  
4. अनाहत  
5. विशुद्ध  
6. अज्ञाचक्र आणि 
7. सहस्त्रार चक्र

          या चक्राना जागृत करण्याचा प्रयत्न कुंडलिनी साधनेत करण्यात येतो. याबाबत अधिक माहिती पुढे येणाऱ्या Blogs मधून तुम्हाला वाचायला मिळेलच. पण विज्ञान आज याविषयी जे सांगतं ते सुद्धा जाणून घेऊया. या चकरांप्रमाणे विज्ञान आज Glands बद्दल सांगतं, ते नेमके काय आहेत याबाबत जाणून घेऊ.


◾ Glands ग्रंथी :


         जेव्हा तुम्ही कुंडलिनी साधना करता तेव्हा ती तुमच्या ग्रंथींना प्रभावित करते असं विज्ञान सांगतं. म्हणजे तुम्हाला ज्या काय चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तुमच्या शरीराशी निगडित आहेत हे यातून समजतं.

आता बघा, तुमच्या शरीरातील Hormones या तुमच्या ग्रंथी द्वारे निघत असतात. 


जसं की , जेव्हा एखादी अशी घटना जेथे  Do or Die Situation होते तेव्हा तुमच्या Adrenal Gland मध्ये Adrenaline Secretion व्हायला लागतं आणि परिणामी तुम्ही त्या परिस्थितीतून  बाहेर निघून जाण्यासाठी धडपड करू लागता.


आता दुसरं उदाहरण बघू, एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद मिळतो, तो आनंद किंवा असं म्हणता येईल की आनंदाची भावना तुम्हाला एका Hormone च्या Secretion मुळे अनुभवच्या Secretion मुळे अनुभवायला मिळते त्याला Dopamine असं म्हणतात.


आता तुम्ही म्हणाल की याचा आणि कुंडलिनी चा काय संबंध ? तर हे जे काय अनुभव तुम्हाला येतात ते सर्व तुमच्या ग्रंथीतून निघणाऱ्या Hormones मुळे येतात आणि ते सर्व अनुभव तुम्ही कुंडलिनी साधनेद्वारे अनुभवू शकता. 
मानवी शरीरातील अदभुत शक्ती : कुंडलिनी ( Kundlini ) || Psychology
मानवी शरीरातील अदभुत शक्ती : कुंडलिनी ( Kundlini ) || Psychology

          जसं की आधी सांगितल्या प्रमाणे चक्र आहेत तसंच शारीरिक स्वरूपात जेव्हा याचा अभ्यास करण्यात आला तेव्हा वैज्ञानिकाना लक्षात आलं की आपल्या शरीरात ज्या ज्या ठिकाणी चक्राची Position सांगितली आहे त्या त्या ठिकाणी एक ग्रंथी आहे आणि त्या ग्रंथी आपल्याला विविध शारीरिक क्रियांमध्ये मदत करतात. जसे चक्र आहेत तशा या ग्रंथी आहेत. जशी चकरांची नावे आहेत तसंच या ग्रंथींचे नावं आहेत. जसं की, Pituitary Gland, Thyroid Gland, Adrenaline Gland, Pancreas, Hypothalamus, Testes Gland इ. 


  हे Glands आपल्याला वेळोवेळी असे Hormones देतात ज्याचा वापर करून आपण असं म्हणता येईल की Superhuman बनू शकतो. पण ते काही वेळेपुरतच असतं. 


          म्हणजे यावरून हे सिद्ध होतं की कुंडलिनी साधनेत जे चक्र सांगितले आहेत ते म्हणजे आपल्या ग्रंथी आहेत. अशावेळी मग प्रश्न पडतो जर ते थोड्यावेळासाठी Hormone Secretion करून आपल्यात बदल करू शकतात तर मग काय होईल जेव्हा आपण त्यांचा ऐच्छिक वापर करू शकू ? हे जाणून घ्यायचा सुद्धा एक उपाय आहे आणि तो म्हणजे कुंडलिनी साधना.


          याबाबत आपण ऐकलं वाचलं आहेच, पण खरंच या रहस्यमयी शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी याविषयी प्रयत्न करून बघणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर एखादं चक्र किंवा Gland Control करू शकलात तर तो अनुभव किंवा ती शक्ती तुमचीच असेल आणि तसं झालंच तर....?






लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने