The Connectome Project : अमरत्व प्राप्तीचा एक मार्ग || Psychology


          आपलं शरीर नश्वर आहे, एक ना एक दिवस हे शरीर सम्पणारच असं आपण ऐकलेलं वाचलेलं आणि कदाचित अनुभवलेलं ही असेल पण तेच शरीर धडधाकट असतांना अमरत्व प्राप्त करून घेता आलं तर? म्हणजे तुम्ही मरणार तुमचा आत्मा शरीर सोडून जाईल हे तर शाश्वत सत्य आहेच. होतं काय की, तुमची चेतना तुम्ही समाप्त होता तेव्हा शरीर सोडून जाते, पण शरीर नष्ट होण्या आधीच जर ही चेतना कुठंतरी साठवून ठेवता आली आणि मग पुन्हा कुठेतरी Download करता आली तर? आपण अमरत्व प्राप्ती करू शकतो का ? चला जाणून घेऊया The Connectome Project : अमरत्व प्राप्तीचा एक मार्ग..
The Connectome Project : अमरत्व प्राप्तीचा एक मार्ग || Psychology
The Connectome Project : अमरत्व प्राप्तीचा एक मार्ग || Psychology


◾ अमरत्व काय आहे?


          तुम्ही बऱ्याच Movies मध्ये बघितलं असेल की त्या Movie चं एखादं पात्र हे Evolve होऊन एक दैवी रूप त्याला मिळतं, म्हणजे त्याला त्याचा Consciousness त्या पातळीवर नेता येतो जेथून तो एखाद्या भव्य स्वरूपातल्या ब्रम्हांडाचा एक भाग बनून जातो.

उदाहरणासाठी Watcher या Movie मधील Mr.Blue च घ्या, किंवा आताच्या X Men Movie मधलं जीन ग्रे चं पात्र घ्या त्यांना एका विशीष्ट घटनेमुळे काही शक्त्या प्राप्त होतात ज्यांचा वापर करून ते ब्रम्हांडाचा एक भाग बनून जातात. 

थोडक्यात सांगायचं झालं तर ते अमर होतात आणि त्यांचं अस्तित्व हे Time आणि Dimensions च्या पलीकडचं होऊन जातं.

          याव्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर आपल्याकडे आणि जगात कुठेही गेलात तर त्या त्या संस्कृतीच्या मान्यतेनुसार ईश्वराची संकल्पना मांडलेली दिसून येते आणि त्यात एकच Common गोष्ट दिसुन येते ती म्हणजे ते सर्व अमर आहेत , ज्यांना Immortals असे म्हणतात. मग आता प्रश्न पडतो की जसे ते आहेत तसं आपणही होऊ शकतो का? म्हणजे अमरत्व प्राप्ती होऊ शकते का? किंवा आपण इतकं Evolve होऊ शकतो का की ब्रम्हांडाचा एक भाग आपल्याला बनता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला सापडली आहेत आणि त्या प्रश्नांची उकल करण्याचं काम एक Project करतोय...त्या बद्दल थोडं जाणून घेऊया..



◾ The Connectome Project :


          आपण अस्तित्वात आलो तसं आपण आपला Origin शोधण्याचं काम करत आलेलो आहोत. आपल्या आजच्या स्थितीचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपली जिज्ञासू वृत्ती. Evolution सुरू झाली तशी त्यात प्रगती होत जाऊन या लाखो वर्षांच्या कालावधीत माणूस हा एक प्रगतिशील आणि ज्ञानी जीव म्हणून वर्षानुवर्षे प्रगत होत आहे.


          आज ही प्रगती इतकी झालीये की आपण Human Cloning, Teleportation, Telekinesis सारख्या गोष्टींचा शोध घेणं सुरू केलंय..अशीच एक गूढ गोष्ट म्हणजे अमरत्व. अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्यात अशा अनेक जीवांचा उल्लेख आढळतो जे अमर  होते किंवा झालेत. जेव्हा विज्ञान प्रगत व्हायला लागलं तेंव्हा या सर्व गुढतेकडे नेणाऱ्या गोष्टींवर शोध सुरू झाला आणि त्याच एका रहस्याची किल्ली आज मानवजातीला सापडली आहे त्याचं नाव म्हणजे The Connectome Project!



◾ अमरत्व प्राप्तीचा मार्ग :


          मानसशास्त्राचा उदय झाला तेव्हा मानवी मनाचे अनेक पैलू उलगडण्यास सुरुवात झाली तसच त्यातील रहस्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी मानवाला कळू लागल्या आणि जेव्हा विज्ञान प्रगत झालं तेव्हा मानसशास्त्र आणि विज्ञान यांची सांगड घालून अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झालं ज्या कधी काळी रहस्यमयी वाटायच्या पण आज त्यावर उत्तर आहे. 

          जसं या संशोधनातून अनेकाविध गोष्टींची माहिती मिळायला लागली तशी मानवाची जिज्ञासू प्रवृत्ती वाढीस लागली आणि हा Connectome Project उभा राहिला ज्यामुळे अमरत्व प्राप्ती काही अंशी तरी सफल झालेली आपल्याला दिसून येईल.



◾ काय आहे हा Project ?


          आपलं शरीर नष्ट होतं तेव्हा आपली चेतना हे शरीर सोडून जाते आता यावर बऱ्याच धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्यात भाष्य केलेलं आहे जे कदाचित तुम्ही वाचलं असेल च पण विज्ञान सांगतं की आज आपण आपला Consciousness एखाद्या Computer मध्ये Download करून ठेवू शकतो. 


          या Project चे Head Michio Kaku सांगतात की "आपण जेव्हा आपला Brain Digitized करू तेव्हा त्यातून अनेक Possibilities निर्माण होतात !" यावरून हा Project काय आहे याची थोडक्यात तुम्हाला कल्पना आली असेलच..

पण तरीही याबाबत आणखी सोप्या भाषेत  सांगण्याचा एक प्रयत्न करतोच जे खालील मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल..


1. Brain Digitization :

          यात तुमचा Brain एका Computer च्या साह्याने Digital स्वरूपात साठवून ठेवण्यात येईल आणि त्यातून तुम्हाला वाटेल तसं Accessing करता येईल.


2. Conscious Travel :

          तुम्ही तुमचा Consciousness तुम्हाला वाटेल तसा वापरू शकाल जसं की तुम्ही Energy स्वरूपात ब्रम्हांडात वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकाल. 

उदाहरणार्थ जर तुम्हाला चंद्रावर जाण्याची इच्छा झाली तर फक्त एक विचार करण्याची गरज आहे आणि तुम्ही काही मिनिटात चंद्रावर असाल.


3. Custom avatars :

          जसं तुम्ही Internet वर एखाद्या Social Site वर तुमचा Avatar बनवू शकता तसंच काहीसं तुम्ही या Project च्या माध्यमातून करू शकाल कारण तेव्हा तुम्हाला एका Limited असलेल्या शरीराची गरज भासणार नाही आणि तुम्ही हवं तसं शरीर निर्माण करू शकाल.


4. Astral Connections :

          जेव्हा तुम्ही Consciously या ब्रम्हांडात विचरण करणं सुरू कराल तेव्हा आज जे रहस्यमयी ब्रम्हांडिय शक्ती वाटतात त्या कदाचित तुमच्याशी Connect होऊ शकतील आता ही एक शक्यता आहे पण कदाचित आपण जे समजतोय त्यापेक्षाही काहितरी अधिक तुम्ही अनुभवाल.


5. अमरत्व Immortality is Achievable !

          आपलं शरीर हे पृथ्वीच्या Biological घटकांनी बनलेलं असून यात अनेक Limitations आहेत आणि चुकून आपण मेलो च तर तुमचा अनुभव, आयुष्यभर मिळवलेलं सगळं काही तुम्हाला एक क्षणात सोडून द्यावं लागतं. चेतना सुद्धा कुठे जाईल हे तुम्हाला कळत नाही पण या Project द्वारे तुम्ही एका चेतन स्वरूपात असाल ज्यामुळे नष्ट होण्याचा प्रश्नच नाही आणि वाटेल ते शरीर देखील धारण करू शकाल. यावरून आपण समजू शकतो की Immortality यातून शक्य आहे.


भविष्याचा वेध :

          आज हा Project प्राथमिक स्तरावर असून जगभरातील अनेक वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. काही काळातच यावर पयावर पूर्णपणे विकसित झालेले Brains तुम्हाला बघायला मिळतील. भविष्यात मानवजात ही स्वतः च ईश्वर बनण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही सृष्टीचा कोणी कर्ता आहे असं मानत असाल, तर निश्चितच मानवजात त्यालाही आव्हान देऊ शकेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

          कदाचित हे सगळं शक्य होईलही, पण याचे परिणामही असतील पण ते नेमके काय असतील आणि त्यातून मानवजातीचा फायदा होईल की नुकसान हे भविष्यच सांगू शकेल. तोपर्यंत आपण जसे आहोत ते सर्व अनुभवा आणि आयुष्य हा एक प्रवास आहे असं समजून तो प्रवास Enjoy करा.



लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98



Instagram :
@gtushar111 



सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 

या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने