The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology


          नमस्कार मंडळी , प्रत्येकाला वाटतं, आपलं एक छानसं आयुष्य असावं, एकदम असं Perfect . ना कसली चिंता ना कसला त्रास फक्त एक साधं सुरळीत, समस्यारहित आयुष्य आणि त्यात असावी आपलीच एक दुनिया.. कल्पना केली तरी किती आल्हाददायी वाटतं ना हे सगळं आणि तिच कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो, पण खरंच ते गरजेचं असतं का ? किंवा आपण जे काय करतोय ते खरंच आपल्यासाठी असतं का ? कधी विचार केलाय? नसेल केला तर आम्ही आहोत ना सांगायला... The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास जाणून घेऊया .
The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology
The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology

          21व्या शतकात मानवतेने पाऊल ठेवलं आणि आपल्या आयुष्याशी निगडित असणाऱ्या नितिनियमाना एक Update मिळालं. जेथे आधी फक्त मूलभूत गरजा होत्या तेथे आता अशा बऱ्याच गोष्टी यायला लागल्यात ज्यांची एक गरज मानवाला भासू लागली. त्या गोष्टी ज्यांना मिळल्यात त्यांना सम्पूर्ण मानव समजल्या जाऊ लागले. लोकं त्यांच्यासारखं आयुष्य जगता यावं म्हणून प्रयत्न करू लागले आणि त्यातूनच निर्मिती झाली एका अशा विकृतीची ज्याला Perfectionist Paradox असं म्हणता येईल.


          आज आपण अशा युगात वावरतोय ज्यात  एक सुंदर आयुष्य अशाच व्यक्तीचं मानलं जातं जो धनवान आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, भौतिक सुखाच्या सर्व वस्तू आहेत.  उदाहरणासाठी, कोणताही एखादा  सिनेमातील नट घ्या, आजकाल च्या Hero लोकांकडे बघून आपल्यालाही कधी तरी वाटतंच की, अशी Life हवीय, म्हणजे होतं काय की आपण आपलं अस्तित्व त्या व्यक्तीच्या पुढे फार छोटं समजायला लागतो. आपल्याला वाटतं की त्यांची Life किती Perfect आहे. तेव्हाच आपण या आयुष्याच्या शर्यतीत धावणं सुरू करतो...


          एक प्रकारे त्यांना आदर्श मानून त्यांच्या सारख्या आयुष्यासाठी प्रयत्न करणं हे चांगलंच आहे. पण याच Perfect Life साठी प्रयत्न करताना आपण आपलं अस्तित्व हरवत चाललो आहोत, असं कुठेतरी लक्षात यायला लागतं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला एखादी विशेष गोष्ट मिळालीय ती बघून आनंदित होणं चांगलंच, पण मला ही ती गोष्ट मिळावी म्हणून मी माझं सर्वस्व गमावून त्या गोष्टीच्या मागे लागणं कितपत योग्य असतं?
आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही अशी अपेक्षा करूच नये का?


          तर असं नाही, तुम्ही निश्चितच प्रयत्न कराच. जीव तोडून मेहनत घ्या. तुम्हाला हव्या त्या गोष्टीच्या मागे इतकी मेहनत घ्या की ती गोष्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे. आता जसं आधीच सांगितल्याप्रमाणे एखाद्या Hero सारखं जगायला मिळत असेल तर नक्कीच प्रयत्न करायला काही हरकत नाही, पण तसं मिळत नसेल तर कुठेतरी वास्तविकता समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अधिक बरं असतं.


आयुष्याची वास्तविकता :


          कोणाचंच आयुष्य Perfect नसतं. प्रत्येक माणसाचे काही ना काही दोष असतात. प्रत्येक जण जेव्हा एका Perfect आयुष्याची कल्पना करतो ना तेव्हा त्याला सर्व च गोष्टी एकदम चांगल्या आणि त्याच्या इच्छेनुसार व्हाव्यात असं वाटतं , त्यासाठी तो इतके कष्ट घेतो की त्याला त्याचं अस्तित्व हरवत चाललंय हे सुद्धा कळत नाही.


           एक Perfect आयुष्य जगण्याची इच्छा घेऊनच तो या जगाचा निरोपही घेतो , तरी त्याला ते कधी कधी मिळत नाही. त्याला आपण काय करतोय याचं भान राहत नाही. जे सर्व करतायेत तेच तो करायला लागतो आणि सुरू होते शर्यत एक Perfect आयुष्य जगण्याची..


The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology
The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology


आयुष्याचे गमक :


          बऱ्याच लोकांना आपण काय करतोय? आपण येथे का आलोय याचं भान ही राहत नाही फक्त दुसऱ्याचं चांगलं दिसतंय म्हणून मग आपणही तसंच करावं ही इच्छा कुठंतरी तुमचं अस्तित्व मिटवण्यास सुरवात करते आणि तुम्ही आयुष्य एका शर्यती सारखं जगायला लागता. आपल्याला संगण्यातही येते, की Life is a Race! तुम्ही पुढे जाणार नाही तर कोणीतरी दुसरा तुमच्या पुढे जाईल.. पण एकदा तरी विचार करा हे मी का करतोय? मला याची खरंच गरज आहे का? आणि फक्त दुसऱ्याला त्यातून आनंद मिळतोय हे बघून मी ही तसं करणं योग्य आहे? 


          हे विचार डोक्यात यायला लागतील तेव्हा तुम्हाला आयुष्याचं खरं गमक कळेल. आयुष्य एक शर्यत नसून ती एक कला आहे आणि ज्याला ती कला जमली तो सुखी होतो.


आयुष्य जगायला शिका :


          एका Perfect Life ची अपेक्षा करणं बरोबरच आहे, पण त्यासोबतच आपलं आयुष्य कसं आहे? आपण कसे आहोत? या सर्व गोष्टींचा विचार करणंही तेवढंच गरजेचं असतं. Perfect आयुष्याच्या शर्यतीत आपण आपलं अस्तित्व विसरत तर चाललो नाहीये हे लक्षात घ्या. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद घेणं सुरू करा. आज जे आहे ते उद्या नसणार आहे हे लक्षात घ्या. वर्तमानात जगणं सुरू केलं म्हणजे आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं सुरू केलंत असं म्हणता येईल.


          बरीच लोकं आयुष्य कधी जगतच नाहीत. आले काम केलं एक ना अनेक इच्छा उराशी बाळगल्यात आणि त्या इच्छांच्या पूर्तीसाठी सतत प्रयत्न, असं केलं म्हणजे आयुष्य झालं असं नाही. तर खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर अपूर्णतेत पूर्णता आणून ते आयुष्य समजून जगता आलं पाहिजे.


          इतकं सगळं वाचून तुम्हाला वाटत असेल की हे तर आलंय लक्षात की आयुष्य जगा वगैरे पण नेमकं काय करायचं ?
The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology
The Perfectionist Paradox : आयुष्य जगण्याचा अट्टाहास || Psychology

त्यासाठी काही टिप्स..


1. चिंता सोडा. :

          आपल्याला एखादी गोष्ट मिळेल की नाही याची चिंता आधी सोडली पाहिजे. मग ते काहीही असो, तुमची मानसिक Stability महत्वाची असते म्हणून होईल तेवढं चिंतामुक्त जगण्याचा प्रयत्न करा.


2 . आयुष्य म्हणजे शर्यत नाही. :

          आज पर्यंत जी एक Perfect Life तुम्हाला सांगितली जाते तिला मिळवण्यासाठी तुम्ही धावता पण ती खरंच गरज आहे का? हे लक्षात घेणं गरजेचं ठरतं.


3 . सोडून द्यायला शिका. :

          एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल, मग तो व्यक्ती असो किंवा एखादी घटना असो किंवा आणखीही काही असो, सोडून देणं शिका.


          एकदा का या सर्व गोष्टी जमायला लागल्यात की आपल्याला आपली Perfect Life कळायला लागते आणि मग आपण दुसर्यांना मिळतंय म्हणून आपणही करावं असा अट्टाहास सोडून  देतो आणि या Perfectionist Paradox मधून बाहेर येण्यास सुरुवात करतो. म्हणून आयुष्य जगायची कला शिकून घ्या आणि या Perfectionist Paradox मधून बाहेर या 


लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने