The Walk Movie : द वॉल्क || Movie Review
नमस्कार मित्रानो , मी आज तुमच्यासाठी एक अनोखी मूवी रिव्हिव्ह ( Movie Review Marathi ) घेऊन आलोय . मी नेहमीच अनोख्या, रहस्यमय आणि आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल अश्या चित्रपटांच्या शोधात असतो , असच काही दिवसांपूर्वी नेट सरफींग करताना मला एक चित्रपट निदर्शनास आला ज्याचं नाव आहे "द वॉल्क ( The Walk Movie )" आता मी याच पोस्टर वैगेरे पाहिलं नव्हतं त्यामुळे मी मनातल्या मनात कथा तयार केली कि काही तरी एखादा खेळाडू असेल किंवा त्याचा जीवनपट बस्स. आणि चित्रपट जुना असल्याने जास्त लक्ष हि दिले नाही. काही दिवसांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला.
मला तुम्हाला इथं सांगावेसे वाटते कि या चित्रपटाची कथा इतकी उत्कृष्ट आणि नायकाने केलेले स्टंट इतके अप्रतिम आहेत याला कशाचीच तोड नाही. प्रत्यक्षात आपण स्टंट करतोय असा फील येतो आणि हीच गोष्ट या चित्रपटाला मास्टर पीस बनवते. मला एक गोष्ट सांगायची आहे कि हा चित्रपट तुमच्यात १००% मोटिवेशन भरून टाकेल पण हे फार काळ टिकणारे नसते जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी पॉसिटीव्ह राहायला लागेल असाच काहीसा संदेश या चित्रपटातून मिळतो.
The Walk Movie : द वॉल्क || Movie Review (source-google) |
द वॉल्क हा चित्रपट एक बायोपिक आहे जो फ्रेंच स्ट्रीट परफॉर्मर फिलिप पेटिट यांच्यावर आधारित आहे , उंचावर बांधलेल्या एखाद्या दोरीवर किंवा मोठ्या वायरवर स्टंट्स करण्याचे स्वप्न ते पाहतात. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्स दरम्यान टायट्रॉपवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले. या चित्रपटाला IMDB वर ७.३ चे रेटिंग आहे तर गुगल च्या अहवाला नुसार ९०% लोक या चित्रपटाला पसंती देतात. हा चित्रपट ड्रामा आणि ऍडव्हेंचर प्रकारात मोडतो. २०१५ साली दिग्दर्शित झालेला हा चित्रपट २ तास ३ मिनिटांचा आहे. तसेच या चित्रपटाने खूप सारे अवॉर्डस जिंकले आहेत आणि बॉक्स ऑफिस वर एकूण ६. १२ करोड युएसडी कमावले.
चित्रपटाची सुरुवातच इतकी अनोखी आहे कि नायक आपली ओळख स्टॅचू ऑफ लिबर्टी पुतळ्याने पकडलेल्या मशाल मध्ये उभे राहून देतोय , चित्रपटातील नायक हा जादूचे., दोरीवर चालण्याचे खेळ किंवा लोकांना हसवणे असे प्रकार रस्त्यावर करून पैसे कमवून आयुष्य चालवतोय. एकदिवस नायक दाताच्या दवाखान्यात जातो तिथे त्याची नजर एक मॅगझीन मधल्या आर्टिकल वर पडले ते जगातील सर्वात उंच टॉवर पैकी एक असे दोन टॉवर बनणार असतात ते आर्टिकल फाडून घेऊन तो घरी परततो आणि चित्रपटाची खरी सुरुवात होते. नायक स्वप्न पाहू लागतो कि या ४१२ मी उंचीच्या दोन टॉवर(वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्स) वर वायर लाऊन त्यावर आपल्याला चालायचे आहे. ह्या गोष्टीने त्याला जंग जंग पछाडते त्यासाठी तो काहीतरी करायला तयार आहे .
The Walk Movie : द वॉल्क || Movie Review (source-google) |
खरंतर नायक ८ वर्षांचा असताना सर्कस पाहतो आणि तेथून त्याच्या कलाबाजीची सुरुवात होते. तो अथक प्रयत्न करून दोरीवर चालायला शिकतो. पुढे त्याला बाबा रुडी जे त्याकाळचे सर्कस व दोरीवर चालण्यात माहीर होते त्यांना भेटतो , पण नायकाच्या अहंकारामुळे बाबा रुडी त्याला खेळ शिकवायचे टाळतात , या खेळाने नायकाला इतके वेडे बनवलेले असते कि नायक आपले घर दार सोडून देतो . पुढे नायक एक गिटार वाजवणाऱ्या महिलेला भेटतो त्यांची मैत्री होते. नायक आपल्या स्वप्नाबद्दल तिला सांगतो.
फिलिप ची व्यक्तिरेखा साकारताना नायकाने आपले १००% प्रयत्न दिलेले दिसतात . पुढे नायकाला कश्या परिस्तिथी शी सामना करावा लागतो , तारेवरची कर्तबगारी दाखवताना संकटांचा सामना करावा लागतो , त्याचे मित्र त्याला कसे सहकार्य करतात , वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्स वर कसे वायर लावतात , शेवटच्या क्षणी कसे त्याचा मनात नेगेटिव्हिटी येते आणि त्यावर तो कशाप्रकारे मात करतोय , त्याचे मित्र त्याला वेडा समजायला लागतात , पायात जखम झालेली असताना सुद्धा मागे न हटणारी व्यक्ती कशाप्रकारे आपले स्वप्न साकारते हे पाहताना अंगावर शहारे आणून सोडतात. एकंदरीतच इतक्या उंचीवर तो दोरीवर चालत असतो पण आपला जीव कावरा बावरा होतो. खरच हा चित्रपट मास्टर पीस आहे परिवारासोबत बघायला हरकत नाही. मला चित्रपटाची स्टोरी रिव्हिल नाही करायची त्यामुळे इतकच लिहितोय.
The Walk Movie : द वॉल्क || Movie Review (source-google) |
या चित्रपटातून मला काय शिकायला मिळाले :
जस कि मी सुरुवातीलाच सांगितलं कि हा चित्रपट तुमच्यात १००% मोटिवेशन भरून टाकेल . पन त्याहून हि मला एक गोष्ट या चित्रपटातून समजली कि मोटिवेशन हे फार काळ टिकणारे नसते तुम्ही तुमच्या मतावर ठाम असाल आणि पॉसिटीव्ह गोष्टींचा विचार करत असाल तर तुच्यासोबत त्याच पॉसिटीव्ह गोष्टी घडतील चुकूनही तुम्ही नेगेटिव्ह विचार करायला लागलात तर मग तुमचे काही खरे नाही.
आता या पॉसिटीव्हिटी गोष्टीचा विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते , तुम्हाला YouTube वर अनेक विडिओ पहायला मिळतील त्यात पॉसिटीव्ह गोष्टीचा समावेश असेल अथवा फार फार वरचढ गोष्टी सांगितल्या जातील . एक सोपा आणि सरळ मार्ग सांगतो पॉसिटीव्हिटी मिळवण्याचा या संकेतस्थळावर मानसशास्त्र ( Psychology ) भागात काही लेख आहेत त्याच अनुकरण कराल तर तुम्ही पॉसिटीव्हिटीने भरून जाल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल याची मी खात्री देतो.
Rating By Shubham - 8/१०*
लेखन ~ शुभम सुतार .
मित्र आणि मैत्रिणींनो आपण The Walk movie review पाहिला . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते....
धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा