शरद पवार यांच्या बंगल्यातल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा || Marathi news
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने सुरु असून काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी कोरोनाचे हॉट स्पॉट (hotspot) तयार होताना दिसत आहेत. तसेच काही अंशी माणसे कोरोनाला चांगली टक्कर देऊन बरे होताना दिसत आहेत. कोरोनाच्या संसर्गाने राजकीय नेत्यांपासून ते अनेक दिग्गजांना आणि कलाकारांना देखील वेढलं आहे. अनेक मोठ्या पक्षातील नेत्यांना कोरोनाची झालेली लागण आपण पाहिली आहे.
शरद पवार यांच्या बंगल्यातल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा || Marathi news |
शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे (National Congress Party Chief) प्रमुख यांच्या बारामतीतल्या गोविंदबाग बंगल्यात (Govind Baug Bungalows) काम कर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी या चौघांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Test)आली असून तीन पुरुष आणि एक महिला कर्मचारी यांना करोनाची लागण झाल्याचे समजत आहे.
शरद पवार यांच्या या आधी मुंबई येथील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानावरच्या कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली असल्याची बातमी समोर आली होती. आता त्यांच्या बारामतीतल्या बंगल्यातल्या चार कर्मचाऱ्यांना (Domestic Help Workers) करोनाची बाधा झाली आहे. सिल्वर ओकमधल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तेव्हा शरद पवार यांचीही करोना चाचणी करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आली होती.
➤ सुशांत सिंह प्रकरणातील मोठी अपडेट; महेश भट्ट व रिया चक्रवर्ती यांचा व्हॉट्सअँप चॅट आले समोर
ANI ने यासंदर्भात अधिक माहिती व वृत्त दिले आहे.शरद पवार यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली होती तरीही ते सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले. आता त्यांच्या बारामती येथील गोविंदबागच्या घरातल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांच्या घरातील कुणालाही करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलेली नाही फक्त कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे .
➤ पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो ?
मुंबईतील सिल्वर ओक शरद पवार यांच्या या बंगल्यावरच्या कर्मचाऱ्यांची चाचणी जेव्हा पॉझिटिव्ह आली तेव्हा आरोग्य मंत्री (health minister) राजेश टोपे यांनी स्वतः शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून ते सेल्फ आयोसोलेशनमध्ये गेल्याचंही स्पष्ट केलं. आता त्यांच्या बारामतीतल्या गोविंदबाग या बंगल्यातील चार कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती एएनआयने (ANI) ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे.
ANI चे ट्विट (Tweet) :
4 domestic help workers working at NCP leader Sharad Pawar's bungalow in Govind Baug, Baramati have tested positive for #COVID19. Nobody from his family has tested positive yet: District Health Official, Baramati District, #Maharashtra— ANI (@ANI) August 21, 2020
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
🔅 हे तुम्ही वाचायला हवं :
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा