ते दिल्ली बिल्ली तुझी लायकी नाही : निलेश राणे || Marathi news


मुंबई :      खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले जसे " मुंबईप्रमाणे कोरोनाचे भय दिल्लीत आहे, पण घरात किती काळ बसून राहायचे म्हणून कामधंद्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. दिल्लीतील अनेक केंद्रीय मंत्री व मोठे अधिकारी कोरोनाचे रुग्ण आहेत. केंद्रातले सहा मंत्री अमित शहा यांच्यासह कोरोनाच्या विळख्यात सापडले. रशियाने कोरोनावर ‘लस’ (Corona Vaccine) बनवून बाजारात आणली परंतु जागतिक आरोग्य संघटनेलाही (World Health Organisation) त्याबाबत विचारले नाही.
ते दिल्ली बिल्ली तुझी लायकी नाही : निलेश राणे || Marathi news
ते दिल्ली बिल्ली तुझी लायकी नाही : निलेश राणे || Marathi news

         संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. रशियाने बनवलेली ‘लस’ (Vaccine) बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुणांनाच टोचली व रशियात आत्मविश्वास निर्माण केला.  असे संजय (Sanjay Raut) राऊत म्हणाले.


          आळस दिल्लीच्या नसानसांत भरलेला दिसत आहे. आज देशात 14 कोटी लोक बेरोजगार झाल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले, पण देश चालवणाऱ्य़ा दिल्लीलाही काम नाही असे चित्र आहे. राजकीय आंदोलने नाहीत म्हणून कार्यकर्ते आळशी झाले. विरोधक थंड पडले म्हणून राज्यकर्ते लोळागोळा झाले. दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती. दिल्लीतही एकच आवाज गुदमरल्यासारखा घुमतो आहे, ‘‘आम्हाला काम पाहिजे ! असं संजय राऊत म्हणाले.


          संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्याला निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कडाडून टीकास्त्र सोडले , "ते दिली बिल्ली तुमची लायकी नाही , निदान एक तरी निवडणूक लढवून दाखवावी. एक मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या करता . " असे त्यांनी म्हंटले.


निलेश राणे यांचे ट्विट (Tweet)



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने