चालू घडामोडी : 31 जुलै 2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021

  
                                 नमस्कार मित्रांनो, 1 ऑगस्ट 2020 पासून आपण दररोज स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा चालू घडामोडी अर्थात Daily Current Affairs जे 2020 असेल अथवा 2021 मधील कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यात 20 ते 25 गुणांसाठी हमखास विचारला जाईल असा भाग इथे घेणार आहोत! आमच्या आजवर च्या अनुभवातून आपण इथे घेत असलेल्या चालू घडामोडींचा फायदा  MPSC, UPSC, BANKING, RAILWAY, RRB, TALATHI, PSI-STI-ASSISTANT, तसेच कनिष्ट लिपिक पासून अगदी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला होईल ! त्यामुळे "खासमराठी सोबत चालू घडामोडींचा अभ्यास" याला एक सवयीचा भाग बनवा ! दररोज अगदी एकही दिवस न चुकता #चालू घडामोडी या आमच्या विभागाला भेट देत रहा!


टीप : दररोज 5 ते 10 मिनिटे खासमराठी चालू घडामोडी या विभागावरील शब्द न शब्द वाचून यावरील नोट्स 
        बनवल्या आणि या नोट्स चा तुमच्या परीक्षेच्या एक दोन दिवस आधी सराव (Revision) केला तर याचा 
        फायदा तुम्हाला खूप होईल!

चालू घडामोडी : 31 जुलै 2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021

                   

अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे रवाना



  • अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेने (National Aeronautics and Space Administration) त्यांचे आजवरचे सर्वात मोठे व चौथे रोव्हर मंगळ ग्रहाकडे रवाना केले.
  • ‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) {Perseverance} या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल.
  • मंगळ व पृथ्वी परस्परांच्या सर्वाधिक जवळ येण्याचा काळ सध्या सुरु असून, त्याचा फायदा घेऊन गेल्या आठवडाभरात संयुक्त अरब अमिरात व चीनपाठोपाठ मानवाने मंगळाकडे सोडलेले हे तिसरे यान आहे.
  • फ्लोरिडा राज्यातील केप कॅनेव्हेराल अंतराळ तळावरून ‘अ‍ॅटलास-५’ अग्निबाणाने  ‘पर्सेव्हरन्स’ला कवेत घेऊन उड्डाण केले. 
  • हे रोव्हर साडेसहा महिन्यांनी मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर मंगळाच्या पृष्ठभागावरील ‘झेझेरो’ नावाच्या विशाल विवरात १८ फेब्रुवारी रोजी उतरविण्याची योजना आहे.

गणितज्ञ शकुंतलादेवी यांच्या विक्रमाची गिनिज बुकात नोंद


  • देशातल्या थोर गणितज्ञ आणि वेगाने आकडेमोड करण्यासाठी प्रसिद्द असलेल्या दिवंगत शकुंतलादेवी यांना त्यांनी चाळीस वर्षापूर्वी लंडनमध्ये केलेल्या विश्वविक्रमासाठीच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवी दिल्लात झालेल्या या कार्यक्रमात त्यांची कन्या अनुपमा बॅनर्जी यांनी हे प्रमाणपत्र स्विकारले.
  • 18 जुन 1980 या दिवशी लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शकुंतला देवी यांनी 13 आकडी दोन संख्यांचा गुणाकार केवळ 28 सेकंदांमध्ये केला होता.
  • त्यांच्या जीवनावर येत असलेल्या चित्रपटाच्या प्रर्दशनाच्या आधल्याच दिवशी हा कार्यक्रम झाला. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे.

जागतिक क्रमवारीतील ‘नंबर १’ अ‍ॅशले बार्टीची US Open मधून माघार



  • जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणारी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू अ‍ॅशले बार्टी हिने यंदाच्या अमेरिकन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेतून (US Open) माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान न्यूयॉर्कमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
  • बार्टीने एप्रिल २०१० मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. मात्र, तिला पहिलं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले. २०१० पासून तिने ८ स्पर्धांची विजेतेपदे मिळवली आहेत पण त्यात एकाच ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा समावेश आहे.
   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने