ठाकरे सरकारची दादागिरी संपली : किरीट सोमय्या || Marathi news


          अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police)वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Actress Rhea Chakraborty) केली होती. त्यावर न्यायालयानं आज निकाल दिला आहे.
ठाकरे सरकारची दादागिरी संपली : किरीट सोमय्या || Marathi news
ठाकरे सरकारची दादागिरी संपली : किरीट सोमय्या || Marathi news

          सर्वोच्च न्यायालयानं आज अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास  हा आता सीबीआय (CBI) करेल असा अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. याशिवाय सर्वच्या सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवावेत असे आदेशही न्यायालयानं  आज दिले आहेत. दरम्यान, या निकालाचे पडसाद राजकीय वर्तुळात लगेच उमटताना दिसले  या निकालानंतर लगेच भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली आहे असं म्हणाले.


          “सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा. मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर दाखल करून न घेणं हे दुर्देवी आहे. यातून ठाकरे सरकार काही बोध घेईल अशी आशा आहे. सुशांत सिंह राजपुतच्या कुटुंबीयांना आता न्याय मिळेल,” असं सोमय्या म्हणाले. ट्विटरवरून त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.


किरीट सोमय्या यांनी केलेले ट्विट :





          सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर (FIR) सर्वसमावेशक असल्याची नोंद सर्वोच्च न्यायालयानं यावेळी सांगितली. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश न्यायालयानं यावेळी दिले.


          या तपासात सीबीआयला संपूर्ण मदत करण्याचे आदेशही महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामार्फत  देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली मात्र कोर्टाने त्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने