" त्या WHO ला काय कळतंय ? त्यांच्या नादी लागलो म्हणून... : संजय राऊत || Marathi news


          संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना जेव्हा त्यांना विचारले गेले कि "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीत त्यांना तुम्ही आरोग्य यंत्रणेबाबतच्या अभ्यासाबाबत विचारले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना १०-१२ सेकंद काही बोलता आले नाही , त्यांची इतकी अडचण का केलीत ?

" त्या WHO ला काय कळतंय ? त्यांच्या नादी लागलो म्हणून... : संजय राऊत || Marathi news
" त्या WHO ला काय कळतंय ? त्यांच्या नादी लागलो म्हणून... : संजय राऊत || Marathi news

          या प्रश्नाचे प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले " उद्धव ठाकरे यांचा मेडिकल औषध याचा अभ्यास खूप दांडगा आहे आरोग्य व्यवस्था, यंत्रणा कारण त्यांनी मुंबई महानगरपालिका , मुंबईमध्ये सातत्याने आजार येत राहतात " त्यावर त्यांना विचारले गेले पण डायरेक्ट WHO चे अड्वायसर ?


          त्यांनी त्यावर अशी प्रतिक्रया दिली "  त्या WHO ला काय कळतंय.. CBI सारखच आहे ते.. हे बघा जागतिक आरोग्य संघटना काय आहे , इकडून तिकडून गोळा केलेली माणसं आहेत , डॉक्टर असले म्हणून काय झालं मी डॉक्टर काढून कधी औषध घेत नाही मला माहितीये मी कंपाउंडर कढून औषध घेतो त्याला जास्त माहिती असत.


          उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरोग्य विषयक जे काम केले आहे त्याचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केलेय , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेय , धारावीची अवस्था तुम्ही पाहताय किती सुधारलीय ,मुंबईची परिस्तिथी सुद्धा हळूहळू सुधारतेय, तुम्ही त्यांना श्रेय का देत नाही या सगळ्याचे ?


          'WHO' कोण ? माझा परत सवाल आहे रशियात (Russian covid vaccine) कोरोनाची लस आली. त्याच्याही WHO विरोधात बोलली. पण तरीही पुतीन यांनी मुलीला लस टोचलीच.. ट्रम्प यांनी WHO ला मुर्खात काढलं त्यांचे निधीच बंद करून टाकले. 'जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नादाला लागूनच जगात Coronavirus चा प्रादुर्भाव वाढला आहे', असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.


          मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav thackeray) आरोग्याविषयी असलेल्या माहितीबद्दल कौतुक करत त्यांनी WHO लाही सल्ला घ्यावासा वाटेल असं ज्ञान असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. मुलाखतीचा हा भाग VIDEO meme म्हणूनही तेव्हा गाजला होता.


          आता एबीपी माझावर दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी थेट WHO वर निशाणा साधला . करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर त्यामुळे त्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.





➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने